शनिवार, १९ डिसेंबर, २०२०

... लेख बळ हवे पंखात

अ.भा म सा प  स्वप्नगंध  समूह 
उपक्रम लेख लेखन

**बळ पंखात हवे*
       मानवास देवाने मेंदू बहाल करुन खूप  उपकार केले आहेत . त्या मेंदुला विचार  शक्ती चे बळ दिले आहे. त्या बळावर तो आज चंद्रावर  पोहचत आहे ..
तर सांगायचे हेच की .....मनात इच्छा शक्ती असेल तर मानव काही करु शकतो उगाचच का म्हटले आहे .?.जगात अशक्य असे काही नाही ..प्रयत्न  व जिद्द  , इच्छा शक्ती हवी.  हे सारे असले की पंखात बळ येतेच. 
       साधे पहा जनावर पिल्लास जन्म देतात. त्यांचे ते पिल्लास पुसतात त्यांच्या त्यांच्या बळाने.. ते पिल्लू पायावर उभे रहाते व चालत पुढे  जाते.  त्यांच्या मेंदूच्या आकलना प्रमाणे..
        मग आपण तर मानव.. आई वडील बालपणात त्यांच्या संस्कार  व संगोपनात कमी न पडू देता मनाची उभारी देण्याचे काम करतच असतात...पंखात बळ भरतच असतात. हे सारे थोर पुरुष त्यांनी जिद्दीने  महेनत करुन कोणी... शास्त्रज्ञ  तर कोणी उत्तम  खेळाडू .... तर  कोणी स्वातंत्र्य  सेनानी.. तर काही समाज सुधारक .....मग किती संकटे आली तरी पर्वा न करता अंगातील बळाचा उपयोग करुन मोठे झालेच ना. !
तर पंखातील बळाचा योग्य  उपयोग करून मानव आपले ध्येय साध्य करु शकतो.
त्या साठी आधी केलेची पाहिजे. अंगी बळ मनोवृत्तीने एकवटले पाहिजे. 
       थाॕमस एल्वा एडीसन जगात बल्बचा शोध लावणारा..  मनात ध्येयवृत्तीने झपाटलेला....  बळ त्याच्या अंगात ,पंखात भरलेले म्हणून पूर्तता  मिळवू शकला. 
शिवाजी राजे...  हिंदवी स्वराज्य  स्थापन करायचे ह्या ध्येयाने झपाटलेले..बळ अंगात साठवून  कामास लागता  यश पदरी आलेच. 
       तर प्रत्येकाने आपल्या शक्ती नुसार   ध्येय पूर्ती साठी  बळ हवे तसे पंखात भरले तर इच्छा पूर्ती होतेच

वैशाली वर्तक
अहमदाबाद 
गुजरात

पुस्तक

रोही पंचाक्षरी समूह आयोजित 
रोही पंचाक्षरी काव्य स्पर्धा

विषय - पुस्तक

करा वाचन
सदा पठण
ते अज्ञानाचे
करे हरण          1


ज्ञानाची खाण
अगाध छान
पुस्तकातील 
घ्यावे हो ज्ञान       2

वाचावे ग्रंथ
सांगती संत
मिळवा ज्ञान
मिळे सुपंथ         3

मनीची आस
हवा हो ध्यास
वाचनालय
त्यासाठी खास      4

नसे लहान
असे महान
पुस्तकं देते
जगी सन्मान      5

असे सोबती
करी गंमती
वाचनासाठी
नको संमती        6

मनोरंजन
बुध्दी व्यंजन
ज्ञान वर्धन
मानती जन           7

येताची घरी
पुस्तक  करी
आनंद वाटे
तो क्षणभरी    8

वैशाली वर्तक

अक्षरांच्या बाजारात

नक्षत्र वेल आयोजित  आजचा उपक्रम
विषय -- अक्षरांच्या बाजारात

अक्षरांच्या बाजारात
मारला फेर फटका सहज
किती  त-हा अक्षरांच्या
वाटले ,मला आहे यांची गरज

काही अक्षरे रोजचीच
निवडली मी आवडीने
पाहून त्यांना आली दुसरी
मनी म्हटले, घेऊ त्यांना सवडीने

असे करिता मनी साठली
गर्दी  अनेक अक्षरांनी
उचंबळलेल्या भावनांना
वाट करुन दिली शब्दांनी

एक -एक शब्दफुले गुंफता
झाली कवितेची तयारी
मन माझे आनंदून म्हणाले
 बरे झाले,आली अक्षर बाजारी


वैशाली वर्तक

गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

ओढ तुझी संपत नाही

ओढ  तुझी संपत नाही.

      वाफे च्या रुपात वा-याच्या सहाय्याने वर वर जाते. इतकी वर की तेथे माझे रुप बदलते.... नाव पण बदलते.   नावा बरोबर ओळख पण बदलते...मेघ,  जलद   ढग   वगैरे नावे ओळखली जाते.
 अती उंचावर जाते .वरील थंड वातावरणात माझ्या आकारात रंगात पण परिवर्तन होते. 
....पण मनी ओढ पुन्हा  तुझ्या  कडे येण्याची सदैव असतेच. 
आणि  जन कल्याण करणे हा ध्यास असतोच ना मनी!...तुझ्या पासून दूर दूर आली असते.  पण मनी ध्यास  तुझ्या  कडे येण्याचा ...तुझी अंतरीची ओढ कधीच संपत नाही. 
    सारे जग माझ्या वर विसंबून असते. उंचावर आल्यावर डोंगरावर जलदांची मस्ती चालते.... त्यात पुन्हा  पाण्याच्या रुपात येते. मला जशी सागरा तुलाभेटण्याची... कधी न संपणारी ओढ असतेच ना...... जशी चातक माझी  वाट पहात असतो ......धरती डोळे लावून बसली असते  बळीराजा पण माझी  वाट पहात असतो.  ओढ तीचअसते  ..  मला जशी सागराला भेटण्याची ,...सागर मिलनाची अंतरी असते. 
     डोंगर माथ्यावरुन अल्लड पणे धावत  धावत खाली येते .मला सरिता नावे जन ओळखू लागतात. लोकांना  जीवन देत ...बळीराजाला खूश झालेला पहाते... मनी आनंदते. त्याचे हिरवे डौलते शिवार पाहून माझे मन आनंदते. माझे पाणी अडवून 
बांध बांधून जन... जल आडवून त्यांना वीज बनविण्यात मदतीस येते. 
किती रस्त्यात संकटे आली तरी सागरास   येऊन भेटण्याची मनी ओढ सतत असते.
 ही जगरहाटी चालू आहे तोवर माझी ओढ अनंत काळ रहाणारच

वैशाली वर्तक.

बुधवार, १६ डिसेंबर, २०२०

जीवनाच्या वाटेवर ....जीवन वाट

अ भा म सा परिषद स्वप्न गंध समूह 
आयोजित उपक्रम
विषय -- जीवनाच्या वाटेवर
अष्टाक्षरी रचना


     *जीवन वाट*

नसे सदा हिरवळ
 कधी खडतर  घाट 
तर कधी ती सुखद
अशी जीवनाची वाट 

पेलावीत  ती आव्हाने 
टाका खंबीर पाऊल    
सुखरुप होता वाट 
लागे यशाची चाहुल

मस्त आनंदे जगता
कधी  तरी पहा मागे
अनुभव सांगे स्वतः
जोडा त्याचे नीट धागे

 नसे जीवनी सदाची
 सुख समान ती फुले
फुले पण काट्यातच
हसतच सदा डुले

जीवनाची वाटचाल
जरी असता बिकट
भाव सकारात्मकाचे
यश येते ते निकट

सुखा सुखी मिळते का
जीवनात ते सहज
प्रयत्नांच्या शिकस्तीची
हवी असते गरज

वैशाली वर्तक 16/12/20
अहमदाबाद

रविवार, १३ डिसेंबर, २०२०

सप्त सूर ( जीवनात गाणे)

अखिल भारतीय मराठी साहित्य  चळवळीचे मुख्य केंद्र 
मराठी साहित्य  मंडळ
काव्य लेखन स्पर्धा 
विषय -- सप्त सूर

     *जीवनात गाणे*

इंद्रधनुष्यी  रंग सात
स्वर सात  संगीतात
सप्त वसती आरोही
अन् तेच अवरोहात

जीवन जगा सप्तसुरांत
 घेत साथ संगीताची
म्हणजे उजळे जीवन
येई मजा जगण्याची
 
येता रवी राजे नभी
ऐका सुरेल भुपाळी
होते मनही प्रसन्न 
सूर ऐकता सकाळी 

संगीतात असे जादु
दूर  होई मनाचा थकवा
रहा निरोगी निकोप
सप्तसूरे रोग पळवा


वनस्पती सूरांनी बहरती
सप्त सूरांची महती जाणा
पडता सुमधूर स्वर कानी
जनांच्या डोलती माना

वैशाली वर्तक



वरचीच कविता नवाक्षरी

काव्य निनाद साहित्य मंच पुणे 
आयोजित उपक्रम नवाक्षरी
उपक्रम क्रमांक ५२५
विषय .. संगीत 

इंद्रधनुष्यी  रंग सात
स्वर ही सात  संगीतात
सप्त वसतात आरोही
अन् तेच अवरोहात

 जगु आयु सप्तसुरांत
 घेऊया साथ संगीताची
म्हणजे उजळे जीवन
येईल मजा जगण्याची
 
येता आदित्य राजे नभी
ऐकावी सुरेल भुपाळी
होतेची मनही प्रसन्न 
सूर ऐकताच सकाळी 

संगीतात असते जादु
सारितो   मनाचा थकवा
राखतो निरोगी निकोप
सप्तसूरे  रोग पळवा


रोपे सूरांनी बहरती
संगीताची महती जाणा 
येता मधूर स्वर कानी
जनांच्या डोलताती माना

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...