शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४

अबोला तुझ्या माझ्यातला

सिद्ध साहित्यिक समूह आयोजित 
उपक्रम क्रमांक 573
विषय .... अबोला तुझ्या माझ्यातला
शीर्षक..  देना मनाचा विसावा 

लावूनिया प्रीत वेडी
दाविलीस रे माया
 सोडून मज एकटीला
गेला कुठे माझा  राया

किती वाट पाहू तुझी
कशी साहू  रे दुरावा
येना जवळी माझ्या
देना  मनाचा विसावा

दोन शब्द ते वदले
तर केवढा कहर.      
जणू घोर अपराध          
हरविला प्रेम बहर ?

वाटे मनी  तूची सदा
मज समीप असावा
नको धरुस अबोला
कर दूर  हा दुरावा

जोडी  जणू तुझी माझी
शशी चांदणी नभीची
रोजच येउनी नभी
ओढ लागे ती भेटीची

रात्र  वैरीण सदाची
येत नाही  का माझी कीव
अंत नको पाहू आता
 तळमळे सदा जीव

क्षणभर न पटता ही
जोडी आपुली आगळी 
जन  वदती कौतुके
जोडी तुमची जगा वेगळी


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४

विचार वणवा

सिद्ध साहित्यिक समूह आयोजित
उपक्रम
विषय .. विचार वणवा

होते बसले निवांत
 मनी माजले काहूर
 सुरू  थैमान विचारांचे
  झाला  मेंदूचा चक्काचूर 

 किती किती हा भ्रष्टाचार
 लहानांपासून मोठे सारे
 सर्व क्षेत्रात माजलेलाच
 रूप प्रत्येकाचे न्यारे

 सारे व्यवहार चालती
 टेबलाच्या खालूनी  सदा
 निती नियमांची नसे चाड
 स्वतःचा फायदा पाहती सर्वदा

कधी, कसे, केव्हा थांबणार
  जाळे  हे भ्रष्टाचाराचे 
जो तो  सांगे येथे विचार 
आपल्याच मोठेपणाचे

विचार करून करुन
पेटला वणवा विचारांचा
सांगा उपाय कसा मिळवू
मनी विचार ,निवांतांचा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

आभाळ माया. मायेची पखरण


मोरणा कवी कट्टा समूह सांगली पश्चिम महाराष्ट्र 
आयोजित साप्ताहिक स्पर्धा उपक्रम क्रमांक 21
27/11/24
विषय ...आभाळमाया
शीर्षक... मायेची पखरण


माया असते आईची
नाही होऊ देत आबाळ 
अहोरात्र तिज चिंता 
सुखी राहो तिचा बाळ.

आभाळाची विशालता
कशी करणार मोजणी
भाव मातेचे प्रेमळ ,मायेचे
अशक्यची, शब्दांत मांडणी .

माता असो पशू पक्ष्यांची
माया उरात आभाळभर
जरी ,गगनी घेतसे भरारी
मायेची नजर पिलावर .

गुरू शिष्याचे प्रेम 
असतेच मनी खास 
अर्जुन शिष्यास, कृष्णाने
विश्वरूप दाविलेच ना हमखास!.

निर्मिले एकची आभाळ 
विधात्याचे, असे ते वरदान 
सारे विश्व एकची कुटुंब 
समतेची देत शिकवण महान.

आभाळ माया ईश्वराची 
किती वर्णावी तिची महती
लिहीता संपेल जीवन काळ 
शब्द ते   तोकडे भासती.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...