आयुष्यात एकदा तरी
तिला मधेच थांबवत ,ते सर्व ठीक आहे ग. पण खर सांगू मला तर जीवनात एकदा तरी, असा पाऊस पडताना मस्त एक सिगरेट चा झुरका मारण्याची इच्छा आहे. मस्त धुराची वलय काढायची व हवेत विरत जाणारी ती वलये बघण्याची मजा लुटायची आहे.[ अर्थात ती मैत्रीण ख्रिश्चन आहे ] तिची ती इच्छा पुरी झाली का नाही माहित नाही . पण सांगावयाचे काय की कशा-कशा प्रकारच्या इच्छा माणसाच्या मनात असतात. असो.
बालपणात बाल मना प्रमाणे तर तारुण्यात त्या काळा प्रमाणे इच्छा होत असतात . सिने सृष्टीत बर्फात खेळणारे हिरो व हिरोइन पाहून खरच एकदा तरी बर्फाळ प्रदेशात जावयास हवे . पूर्वी सिनेसृष्टी काश्मीर श्रीनगर ,सिमला कुलू पर्यंत सीमित असावयाची , पण आता सिनेसृष्टी समृद्ध झाली म्हणा वा राहणीमान सुधारले म्हणा, आता युरोप, इजिप्त जपान वगैरे परदेशा मधून शुटींग होत असल्याने तेथील सुंदरता दृष्टीस पडते. व त्यामुळे तेथील पण सुंदरता निहाळावी, पर्यटनास जाऊन, एकदा तरी तेथील निसर्ग पहावा. तेथील आधुनिकता पहावी अशी इच्छा साहजिक होते. आणि आता तर टूर कंपनीतून परदेश टूर करणे अगदी सुलभ व सोयीचे झाले आहे. तशा मी खूपच परदेश टूर केल्या आहेत . अगदी युरोप , इजिप्त,चीन , जपान पासून अमेरिका, कॅनेडा,सिंगापोर पालथे घातले आहे .सध्या तर सिंगापोर, मलाच काय प्रत्येकास शनि- सिंगणापूर इतके सामान्य झाले आहे. पण आयुष्यात एकदा तरी "अंदमान" ला जावयाचेच ही मनापासून ची इच्छा होती व ती केल्यावर सर्व परदेश च्या ट्रीप समोर अंदमानच्या ट्रीप चे पारडे नक्कीच वरचे ठरले .
अंदमानच्या celluer jail मध्ये प्रवेश केला. तेव्हा धन्य ते लोक ! की ज्यांनी स्वातंत्र्य प्राप्ती साठी किती यातना सहन केल्या. तेथे जाऊन त्यांच्या स्मृती जागृत झाल्या . जेल मध्ये प्रवेश करताच डाव्या हाताला असलेले जुने झाड, जे अजून जतन केले आहे . त्या झाडा खालूनच सर्व सत्याग्रही आत यावयाचे. sound & light show मध्ये ते झाड सांगतंय, बोलताय असे दाखविले आहे कीं माझ्याच फांद्यान खालून सर्व कैदी आत यावयाचे . मी या सर्व सत्याग्रहींच्या यातना वेदना पहिल्या आहेत. मी त्याच्या भूतकाळाचा साक्षीदार आहे . तो show पाहून अंगावर रोमांच उभे राहतात . जेल ची रचना पण अशी की एका ची पाठ दुसऱ्यांचे तोंड की कोणी एकमेकांना पाहू शकत नव्हते . सावकारांचे भाऊ त्याच जेल मध्ये असून शेवट पर्यंत भेटू वा पाहू शकले नाहीत . सावरकरांची खोली शेवटची आहे . तिला तर खास २-२लोखंडी जाळ्या व दोन्ही जाळ्यांना भक्कम कुलुपे होती . जेल च्या मध्यभागी फाशीची देण्यात येत असे की सर्व कैद्यांना दिसावे की आपले पण असेच हाल होणार आहेत . किती क्रूरपणाची वागणूक होती .मी सावरकरांच्या खोलीत प्रवेश केला . त्यांच्या देशप्रेमाच्या भावनेने मन भरून आले. आदराने भक्तीने त्यांच्या तेथे लावलेल्या तसबीर ला पुन्हा पुन्हा वंदन केले . त्या खोली तील जमीन, भिंती सर्वाना आदराने वंदन केले, कारण याच खोलीत ते महान पुरुष राहिले होते. त्यांनी भिंतीवर लिहिलेले काव्य आता नाही, व्हाईट वॉश करून टाकले आहे. त्यामुळे ते पहावयास मिळाले नाही याची मनाला फार-फार खंत वाटली .सावरकरांच्या खोलीत सर्वत्र आदराचा हात फिरवून मानसिक शांती मिळविली जेल चा प्रत्येक काना कोपरा पाहिला . सत्याग्रही कडून तेल काढून घ्यावयाचे ती तेलाची घाणी ,अमुक इतके तेल रोज काढावेच लागे ती जागा , तसेच त्यांना खावयास देण्यात येणारी लोखंडी भांडी पाहून मन भरून आले. काय काय यातना सहन करावयास लागल्या असती याची कल्पना करून प्रत्येकाने अपोआपच त्यांना शतशा वंदन केले गेले व प्रत्येक जण आदराने नतमस्तक झाला . मी अंदमानची ट्रीप झाल्याने मनात इच्छापूर्तीचे समाधान अनुभविले . अशा रीतीने माझी जीवनातील मनात घोळत होती ती इच्छा पूर्ण झाली.
तशीच अजून एक इच्छा आहे .काय आहेन , की आयुष्य आहे तोवर इच्छा संपत नाही . आता इच्छा आहे ती स्वरसाम्राज्ञी लता बाईंना यांना भेटण्याची . पहाते तो योग कधी येतो .
चित्रहार वर गाणे चालू होते "जीवनमे एक बार आना सिंगापोर "गाणे पाहता पाहता मी विचारात गुंग झाले. खरच, प्रत्येकाच्या मनात जीवनात 'एकदा तरी" अशी इच्छा ,कल्पना ,विचार येतोच व असतोच नाही का? की एकदा तरी असे करावे ,अथवा असे घडावे , असे व्हावे ,असे वाटत असते
मी पण असेच एकदा पावसाळ्याचे दिवस होते . मस्त रिमझिम पावसाच्या सरी येत होत्या . आम्ही मैत्रिणी ऑफिसात , रीसेस मध्ये हातात चहाचा कप व जोडीला डाळ वड्याचा आस्वाद घेत होतो .तेव्हा आमच्यातील एक मैत्रीण पावसा कडे पहात म्हणाली , असा रिमझिम पाऊस पडत असताना " चहा / कॉफीचा हातात कप, पुस्तक, व बाजूला गरमा गरम भज्यांची डिश , तसेच मधुर संगीत,असावे .तिला मधेच थांबवत ,ते सर्व ठीक आहे ग. पण खर सांगू मला तर जीवनात एकदा तरी, असा पाऊस पडताना मस्त एक सिगरेट चा झुरका मारण्याची इच्छा आहे. मस्त धुराची वलय काढायची व हवेत विरत जाणारी ती वलये बघण्याची मजा लुटायची आहे.[ अर्थात ती मैत्रीण ख्रिश्चन आहे ] तिची ती इच्छा पुरी झाली का नाही माहित नाही . पण सांगावयाचे काय की कशा-कशा प्रकारच्या इच्छा माणसाच्या मनात असतात. असो.
बालपणात बाल मना प्रमाणे तर तारुण्यात त्या काळा प्रमाणे इच्छा होत असतात . सिने सृष्टीत बर्फात खेळणारे हिरो व हिरोइन पाहून खरच एकदा तरी बर्फाळ प्रदेशात जावयास हवे . पूर्वी सिनेसृष्टी काश्मीर श्रीनगर ,सिमला कुलू पर्यंत सीमित असावयाची , पण आता सिनेसृष्टी समृद्ध झाली म्हणा वा राहणीमान सुधारले म्हणा, आता युरोप, इजिप्त जपान वगैरे परदेशा मधून शुटींग होत असल्याने तेथील सुंदरता दृष्टीस पडते. व त्यामुळे तेथील पण सुंदरता निहाळावी, पर्यटनास जाऊन, एकदा तरी तेथील निसर्ग पहावा. तेथील आधुनिकता पहावी अशी इच्छा साहजिक होते. आणि आता तर टूर कंपनीतून परदेश टूर करणे अगदी सुलभ व सोयीचे झाले आहे. तशा मी खूपच परदेश टूर केल्या आहेत . अगदी युरोप , इजिप्त,चीन , जपान पासून अमेरिका, कॅनेडा,सिंगापोर पालथे घातले आहे .सध्या तर सिंगापोर, मलाच काय प्रत्येकास शनि- सिंगणापूर इतके सामान्य झाले आहे. पण आयुष्यात एकदा तरी "अंदमान" ला जावयाचेच ही मनापासून ची इच्छा होती व ती केल्यावर सर्व परदेश च्या ट्रीप समोर अंदमानच्या ट्रीप चे पारडे नक्कीच वरचे ठरले .
अंदमानच्या celluer jail मध्ये प्रवेश केला. तेव्हा धन्य ते लोक ! की ज्यांनी स्वातंत्र्य प्राप्ती साठी किती यातना सहन केल्या. तेथे जाऊन त्यांच्या स्मृती जागृत झाल्या . जेल मध्ये प्रवेश करताच डाव्या हाताला असलेले जुने झाड, जे अजून जतन केले आहे . त्या झाडा खालूनच सर्व सत्याग्रही आत यावयाचे. sound & light show मध्ये ते झाड सांगतंय, बोलताय असे दाखविले आहे कीं माझ्याच फांद्यान खालून सर्व कैदी आत यावयाचे . मी या सर्व सत्याग्रहींच्या यातना वेदना पहिल्या आहेत. मी त्याच्या भूतकाळाचा साक्षीदार आहे . तो show पाहून अंगावर रोमांच उभे राहतात . जेल ची रचना पण अशी की एका ची पाठ दुसऱ्यांचे तोंड की कोणी एकमेकांना पाहू शकत नव्हते . सावकारांचे भाऊ त्याच जेल मध्ये असून शेवट पर्यंत भेटू वा पाहू शकले नाहीत . सावरकरांची खोली शेवटची आहे . तिला तर खास २-२लोखंडी जाळ्या व दोन्ही जाळ्यांना भक्कम कुलुपे होती . जेल च्या मध्यभागी फाशीची देण्यात येत असे की सर्व कैद्यांना दिसावे की आपले पण असेच हाल होणार आहेत . किती क्रूरपणाची वागणूक होती .मी सावरकरांच्या खोलीत प्रवेश केला . त्यांच्या देशप्रेमाच्या भावनेने मन भरून आले. आदराने भक्तीने त्यांच्या तेथे लावलेल्या तसबीर ला पुन्हा पुन्हा वंदन केले . त्या खोली तील जमीन, भिंती सर्वाना आदराने वंदन केले, कारण याच खोलीत ते महान पुरुष राहिले होते. त्यांनी भिंतीवर लिहिलेले काव्य आता नाही, व्हाईट वॉश करून टाकले आहे. त्यामुळे ते पहावयास मिळाले नाही याची मनाला फार-फार खंत वाटली .सावरकरांच्या खोलीत सर्वत्र आदराचा हात फिरवून मानसिक शांती मिळविली जेल चा प्रत्येक काना कोपरा पाहिला . सत्याग्रही कडून तेल काढून घ्यावयाचे ती तेलाची घाणी ,अमुक इतके तेल रोज काढावेच लागे ती जागा , तसेच त्यांना खावयास देण्यात येणारी लोखंडी भांडी पाहून मन भरून आले. काय काय यातना सहन करावयास लागल्या असती याची कल्पना करून प्रत्येकाने अपोआपच त्यांना शतशा वंदन केले गेले व प्रत्येक जण आदराने नतमस्तक झाला . मी अंदमानची ट्रीप झाल्याने मनात इच्छापूर्तीचे समाधान अनुभविले . अशा रीतीने माझी जीवनातील मनात घोळत होती ती इच्छा पूर्ण झाली.
तशीच अजून एक इच्छा आहे .काय आहेन , की आयुष्य आहे तोवर इच्छा संपत नाही . आता इच्छा आहे ती स्वरसाम्राज्ञी लता बाईंना यांना भेटण्याची . पहाते तो योग कधी येतो .
पण कम नशिबी मी . ती इच्छा माझी पूर्ण नाही झाली. माझ्या मिस्माटरांकडे
तिच्या फोटोवर तिने स्वाक्षरी दिलेला फोटो आहे .मी मनी खूप आशा धरुन होती
पण ती इच्छा जीवनी अधुरीच राहिली.
वैशाली वर्तक
अहमदाबाद