झाली अवचित भेट
भरलास तू मनात
नकळता ओढ जीवा
लागे तुला बघण्यात
पुन्हा पुन्हा पाहताना
मन तुझ्यात गुंतले
वेड जीवास लागले
तुज स्वप्नात रंगले
वाटे नयनी ठसावे
तव चित्तात उरावे
मनीं तुझ्यात रमावे
वाटे तुलाच पहावे
भाषा माझिया प्रेमाची
वाटे तुला उमजावी
नाव कोरिता हृदयी
कळी माझी खुलावी
एकांतात मी रमते
शब्द सुमने गुंफते
वाटे नयनी ठसावे
तव चित्तात उरावे
मनीं तुझ्यात रमावे
वाटे तुलाच पहावे
भाषा माझिया प्रेमाची
वाटे तुला उमजावी
नाव कोरिता हृदयी
कळी माझी खुलावी
एकांतात मी रमते
शब्द सुमने गुंफते
हात हातात देऊनी
तुझ्या स्वप्नात रंगते
सुख स्वप्ने संसाराची
रंगविली मनोमनी
तुज स्वप्नात रंगले
होऊनीया अर्धांगिनी
वैशाली वर्तक.
सुख स्वप्ने संसाराची
रंगविली मनोमनी
तुज स्वप्नात रंगले
होऊनीया अर्धांगिनी
वैशाली वर्तक.
सिद्ध साहित्यिक समूह
उपक्रम ३८१
विषय - प्रेम कविता
प्रेमाचे तराणे
होता नजरा नजर
भरलीस तू मनात
काय केलीस जादू तू
उमजेना त्या क्षणात
तव मोहक रुपाने
लावलीस मनी आस
अन् लागला एकची
तुला भेटण्याचा ध्यास
तुझ्या मधाळ हास्याने
वेड लाविले जीवाला
कधी भेटशील सांग
माझ्या अधीर मनाला
बघ झुकल्या पापण्या
साथ तुझीच मागाया
आकर्षलो ग पाहता
गुज मनीचे कथाया
प्रीत अबोल जागली
नको उगाच बहाणे
धुंद होऊनी प्रेमात
गाऊ प्रेमाचे तराणे
वैशाली वर्तक
अहमदाबाद
अ भा म सा प मध्य मुंबई क्र २
आयोजित
उपक्रमासाठी
विषय - पहिली भेट
षडाक्षरी
पहिली भेट
आठव आपली
पहिली ती भेट
भावली हृदयी
माझिया तू थेट
लाडिक बटांना
भावली ती अदा
तू सावरतांना
झालो मी फिदा
न उमजे मला
कसा भावनिक
तुला भेटण्यास
झालो आगतिक
वेड ते जीवास
तुलाची पाहणे
नित्य विचारात
शोधीले बहाणे
घडे योगायोगे
भेट अवचित
न सुचे बोलणे
तुज कदाचित
साधिला संवाद
डोळ्यांनी क्षणिक
मला न उमजे
झालो भावनिक
अजूनी स्मरते
भेट सदा मनी
तुझ्यात गुंतले
कळले त्या क्षणी.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
माझी लेखणी साहित्य समूह
विषय - मी फक्त तुझी
गुंतता हृदय हे
कधी अशी मी गुंतले
माझे मलाची कळेना
काय अशी तुझी जादु
केलीस तू मला उमजेना
आवडे रमणे तुझ्यात
तव विचाराचा ध्यास
होते बावरी तुला बघताच
सदा भेटण्याची आस
गंध विलसतो फुलात
मी वसते तव अंतरी
एकरुप होते मनात
राहीन समीप निरंतरी
जैसे शशी येण्याची नभी
वाट पहाते चांदणी सदा
तीच ओढ मनी माझ्या
मी फक्त तुझीच सर्वदा
वैशाली वर्तक
अहमदाबाद