शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१

सहाक्षरी सोबत क्षणांची

उनाड वारा साहित्य  परिवार
सहाक्षरी     26/2/2021
विषय -- सोबत क्षणांची

सोबत क्षणांची
स्मरते मनात
गंध आठवांचा
उसळे क्षणात

मिळता सोबत
सेवनात ध्यान
गुंगतो भ्रमर
विसरुनी भान

क्षण सोबतीने
दिधला आनंद
जीवास लागला 
भेटण्याचा छंद

सोबत क्षणांची
देते आठवण
स्मृतींची झालीय 
मनी साठवण

नसती जगती
कोणीही कुणाचे
नका करु खंत
सोबती क्षणाचे


सोडुनिया जाती
प्रवासी जगती
सह प्रवासी ते
क्षणाचे सोबती

वैशाली वर्तक






उपक्रम
सहाक्षरी
* *नभात चांदणे**

काळ्या  काळ्या  नभी
मोहक चांदण्या
भासे जणू दिवे
लाविले शोभण्या

शशी संगे येते
शुक्राची चांदणी
सर्वात  शोभून 
दिसे नभांगणी

चांदण्याचा चाले
नभांगणी खेळ
वाटे मजा पहा 
काढुनिया वेळ

चांदण्या रात्रीत
शशी चांदण्यांचा
 रास चाललाय
दिसे गंमतीचा

रातराणी पहा
बहरली कशी
नभीच्या तारिका
उतराव्या जशी

वैशाली वर्तक


गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

षडाक्षरी ....माझी शब्द फुले

स्पर्धेसाठी
शब्दरजनी साहित्य  समूह
प्रथम  वर्धापन दिना निमित्त  आयोजित 
भव्य राज्य स्तरीय  महास्पर्धा षडाक्षरी रचना

विषय - माझी शब्द फुले

 शीर्षक --  शब्द उधळण


मी माझ्या  शब्दांचे
करिते स्वागत 
शब्द गुंफण्याची
कला अवगत                 1

माझी  शब्द फुले
सुगंधी असती
सदा साहित्यात 
शोभून  दिसती               2

मोजून मापून
शब्दांचा  वापर
फापट पसारा 
नकोच खापर                 3


 मनीचे विचार 
 शब्दांची  सोबत    
 होतेची तयार
 छान मनोगत                   4


विचार कल्पना 
मनी उमलता   
शब्द फुले माझी  
दिसे बहरता                     5

शब्द फुले माझी
विविध रंगात    
सुख धैर्य भाव
दावी साहित्यात              6

 
शब्दफुले अशी
हृदयाच्या ठायी
वाहते तयांना
शारदेच्या पायी                7


वैशाली वर्तक
अहमदाबाद  24/1/2021

कथा .... अनुभव शत शब्द कथा

एकदा शेजारच्या काकू   घाब- या घुब-या होऊन आल्या व आजीस तिच्या मुलास 
बरे वाटत नाही  ...अमुक तमुक होत आहे म्हणू लागल्या ..
आजीने लगेच घरगुती औषध सुचविले .तसेच औषध 2/3 दिवस देत होती. असेच तिच्याकडे सोसायटी च्या ब-याच काकू येत  व ती औषध देई वा सुचवी ..आणि.. गंमत म्हणजे ती पोरे पण ठीक ठाक होता असत .
   हे निखील तिच्या   नातवाने पाहिले.व त्याने आईस प्रश्न केला ..आपली आजी आधी डाॕक्टर होती का? कारण तिला सारे जण आजारावर विचारावयास येतात व ती त्यांना सल्ला तसेच काही औषध सुचविते. व सारे जण.. गंमत अशी की ठीक पण होतात. एवढेच काय मला वा तुला पण  लहान मोठ्या दुखण्याला ती काही घरीच औषधे देते .म्हणून विचारतो...
 तर आजीच उत्तरली. बेटा मी डाॕक्टर नाही ,.हे सारे  आहेत अनुभवाचे बोल ...
अनुभवाचे डोस आहेत .तुझे बाबा ,काका ,आत्या यांना लहानपणी आजारी होता 
वा बरे न वाटता... तुझ्या  बाबांची आजी औषध द्यावयाची .आता मी तुम्हाला  देते ..हे   माझे अनुभवाचे बोल आहेत बेटा.

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

भाज्यांची गंमत

प्रेमाची अक्षरे  बालगीत
विषय - भाज्यांची गंमत

गेले होते मंडईत
बडबड  ती भाज्याची
मीच कशी ती महान
हेच सर्वा सांगण्याची

 आला  पुढे  बटाटा
 मी पहा कसा छान
घेतो सा-याशी जुळून 
माझी  वेगळीच शान

 कांद्याची शान वेगळी
उग्रपणा दावतो सदा
पण चविष्ट जेवणात
विसरु नका मला कदा

गोल मोठे जांभळे वांगे
शेकून काढा मजला मस्त 
मस्त तयार भरित
जेवण सारे होईल फस्त 

पालक मेथी अंबाडी
दिसती पहा हिरवी
जीवनसत्वे भरपूर
खाण्यास सदा बरवी

फूल कोबी पत्ता कोबी
आमची ऐट जोर दार
बहरतो थंड मोसमात
जेवण होते बहरदार

मिरची कोथिंबीर आल
आम्ही  रहातो  हजर
आमची  स्वयंपाकघरात 
भासते सदाची गरज

वैशाली वर्तक

अष्टाक्षरी ....सारे सुखाचे सोबती

अ भा म सा प समूह आयोजित  उपक्राम 
ओळ काव्य लेखन
ओळ -- सारे सुखाचे सोबती
 
आहे तंतोतंत खरे
*सारे सुखाचे सोबती*
जेव्हा शीते , येती भुते   
 उगा का जन म्हणती      1

येता कठीण समय
  नाही कोणी फिरकत              
निवारण होता कष्ट
  येण्या नाही  बिचकत           2


मजा लुटण्यात साथ
 येती आनंदात दारी   
संकटात नसे कोणी
तेव्हा वाटे दुःख भारी      3

म्हणूनच म्हणतात 
सुख वाटावे जनात
दुःख  आपण आपले
सदा  सहावे मनात          4

भेट देण्या होती गोळा   
येता आनंदाची    लाट    
करी मजेचा सोहळा.
संकटात    दावी पाठ             5


रीत  आहेच जगाची
दुरुनच मजा पाही
नसे त्यात नवीनता 
 कोणी कुणाचेही नाही             6

वैशाली वर्तक 
अहमदाबाद   20/2/21





सुखाचे सोबती

जगी या  सोबती सारे , जाणा सुखाचे कोण ती
येतो संबध सर्वांचा     गोड  सारेची   बोलती

       होता जन्म नाते जुळे पिता माता करी माया
       सारे प्रेमाचे   सोयरे     करती प्रेमळ छाया
       कधी  पाण्यात राहूनिया  वैर  नको सांगती
       येतो संबध सर्वांचा गोड सारेची बोलती


          जग बाजार स्वार्थाचा टाक जपून पाऊल 
           स्वार्थ भावे भरलेला घेत तयाची चाहुल
           दावी खोटीच माया गुणी जन सारे नसती  
           येतो संबध सर्वांचा गोड सारेची बोलती





रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१

सहाक्षरी.....सूर हे छेडिता\ क्षणिक

शब्दरजनी साहित्य  समुह
उपक्रम   काव्या लेखन
विषय - सूर हे छेडिता


सूर  हे  छेडिता
 मन वेडावले
आठवात तुझ्या 
आज भारावले

सहज स्वरांनी
मनी फुले प्रीत
ओठात उमटे
तुझ्या साठी गीत

पहा  स्वरातून
गीत साकारले
मनी हर्ष होता
लयीत गायले

भाव अंतरीचे
तुज उमगले
माझिया मनात
चांदणे हसले

वैशाली वर्तककल्याण डोंबिवली महानगर २
आयोजित 
काव्य लेखन
विषय.. क्षणिक



शब्द क्षण एक 
असे महत्वाचा
मिळुनिया क्षण
भाग आयुष्याचा

ठेवुया हिशोब
प्रत्येक क्षणाचा
असे आपणास
जीवनी मोलाचा

क्षणिक आनंद
देतसे उभारी
पुढच्या कामात
यश देई दारी

फुल उमलते
आनंद लुटते
जीवन क्षणिक
खंत न करणे

राखुया ध्यानात
शब्द तो क्षणिक
असे जीवनात
सदाची मौलिक


वैशाली वर्तक
अहमदाबाद

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...