शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

मुलांच्या सांगोपनात जडण घडण व संस्काराचे महत्त्व

खरच दिवसेंदिवस मुलांचे सांगोपन. हा विषय सर्वत्र चर्चिला जातो. व तो तितकाच कठीण  पण होत चालला आहे. नोकरी निमित्ताने  वा  मतभेदाने वाद नकोत म्हणून पण ,आपल्याही पिढीने विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारली.  वेगळे राहून मुलांना घरी बाई ठेवून वा पाळणा घरात ठेवून पण, मुलांना संस्कृती व संस्कार देण्यात  कसून नाही पडू दिली.. होते जरी कठीण,.. तरी पण ती धुरा उचलली.    दोन वा तीन मुलांना पण संस्कार संस्कृतीचे पाढे  दिले. पण आता मात्र जडणघडण  करण्याची फारच बिकट वाट आहे.
      आधीकाळात टेलीव्हीजन हे प्रलोभन होते. मुले सतत टीव्ही पाहतात ही प्रलोभनाची बाजू..तरी बरे तेव्हा ठराविक वेळे नंतर कार्यक्रम नसतं. पण आता मात्र 24तास व मोबाईल ने तर कहरच केला आहे.लहान तान्ही बालके पण पहात बसतात हट्ट करतात. 
       त्यातून एकमात्र एकमेव बालक जन्माला येते.त्यामुळे त्या बाळाला पाल्याला जे मागेल ते हजर करणे
व त्यांचे लाड पुरविणे ...हे तर सहज श्वास घेतल्यातगत वा पापणी लवण्यागत पालक लाड पुरवत  असतात.
 दोघे नोकरी करणारे. अर्थात ,आपल्या काळात पण दोघांची नोकरी होती. पण , नाही म्हटले तरी प्राधान्य 
पुरुषांच्या नोकरीस असायचे. स्त्रिया तेवढ्या स्वतः चे अस्तित्व वा  तेव्हा *स्पेस* ची कल्पना जास्त प्रमाणात नव्हती वा करीअर सांभाळताना, कुटुंबाला पण प्राधान्य देत होत्या.वेळ पडली तर करीअरला,  पाल्यांसाठी बाजूला करण्याची प्रवृत्ती होती.आता  तशी नाही असे  मुळीच नव्हे.
        पण पैसा पण तितकाच महत्त्वाचा व घेतलेलं शिक्षण व पुढील प्रगती या विचाराने  घरी पाल्याकडे थोडे दुर्लक्ष होतेच. तरी बरे आजकाल work from. home facility आहे. तेवढे च पाल्याला आईचा सहवास लाभतो. पण मग स्वतः कामात असल्याने पाल्यास मोबाईल दिला जातो.आधी पालकांची कामात व्यत्यय नको म्हणून पाल्याला दिलेला मोबाईल त्याचा चाळ होता होता छंद होतो.   लहान मुलांना जेवण भरवताना कसली तरी गोष्ट सांगत वा संवाद साधून त्याला खायला देण्या ऐवजी मोबाईल वा टीव्ही लावून जेवण भरवितात. मग ते जेवण चालते मंद गतीने. वा भरवणारीच्या हातात घास वा   मुलं स्वतःच्या हाताने खात असेल तरी लक्ष खाण्यापेक्षा डोळ्यासमोर हलणाऱ्या चित्राकडे असते. 
      अशावेळी मायभाषेतून गोष्टी सांगून वा बालगीते बोलून त्याला रिझविले तर मायभाषेची गोडी वाढेल व संवाद साधता येईल . जो मोबाईल ने कमी होत आहे. त्यातून मोबाईल वर गेम दाखवून त्याला त्या गेम खेळण्याची चटक लागणार नाही. पुढे वय वाढता सध्या आपण पहातो तर सतत गेम खेळत  असतात.
त्यांचे त्यांना वेड लागतेय ,शेवटी अभ्यासाला वेळ न देता मोबाईल वर गेम वा इतर पहाणे ह्याचं व्यसन होते.आई बाबांचा मोबाईल शिफारशीनुसार घेऊन स्वतः चा छंद पुरे करतात .मग बोलणीखाणे आहेच . आईची चिडचिड,वाद विवाद , हे सारे ओघाने आलेच.आणि मग पती पत्नीत वाद होतात. त्यात आजी आजोबा असतील  घरात तर चांगलेच, ते काम आज्या पाहू शकतात. पण आजकाल  कामवाल्या बाया सांभाळायला असतात .  
          कुटुंबाची  जवाबदारी वरिष्ठांना सोपवावी,पण तेथे पण सध्या तरुण पिढीला वरिष्ठांची लुडबुड मधे नको असते. व आम्ही आमचे  सक्षम आहोत. आम्ही करू त्यामुळे सध्या समंजस वरिष्ठ पण जेवढयास तेवढे ठेवून  फार उपदेश देत नाही. त्यांच्या त्यांच्यात व्यस्त रहातात. त्यामुळे वळण लावणे, शिस्तीतता लावणे
कमी पडते.
  आजकाल शाळेत जाण्यास ,शाळेच्या वा ठरविलेल्या व्हॅन असतात .शाळा पण लांब असल्याने गत्यंतरच नसते. नाहीतर कुटुंब प्रमुखाला काम सोपविले तर दोन पीढीत वरिष्ठ व कनिष्ठ यांत सख्य रहाते. बोलणे होते हसत खेळत प्रेमळ शिस्तता लाभते, दोघांनाही फायदा होतो, वरिष्ठांना काही काम सोपविण्यात आल्याने त्यांचा वेळ जातो व नातवाला पण संस्कार संस्कृती चे पाढे दिले जाऊ शकतात.
     सहज बोलता बोलता येणा-या सणांची माहिती, आपल्या घरी कसे सण साजरा व्हायचा सांगून
सणवार रीती रिवाज सांगितले जातात.  प्रत्येक बालकाला आपली आई वा बाबा जसे सण साजरे करायचे 
ऐकण्यात मजा वाटते व तुमची पण आई तसेच करत आहे  हे आजी आजोबा कडून ऐकता आईबाबाचा आदर वाढतोव अभिमान जागृत होतो. हे असे कुटुंबात राहून कुटुंबाकडून सहज संस्कृती संस्कार प्रदान केले गेले पाहिजेत.
        सकाळी फिरायला जाणे तर सध्या. आरोग्याच्या दृष्टीने करत आहेत,  मुलांना सकाळी सुर्याची नावे शिकवून सूर्य नमस्कार शिकवले तर नियमितता व व्यायामाची गोडी लागेल.बाकी कराटे टायपोंडो वगैरे चे क्लास तर लावताच. तसेच सकाळी मंद आवाजात भक्ती संगीत लावले तर वातावरण पण प्रसन्न रहाते पण सध्या तर , सकाळी "कराग्रे वसते लक्ष्मी" ऐवजी सरळ हात सर्वांचाच  मोबाईल कडे जातो. मग आपण काय मुलांना सांगणार.अशी विचित्र परिस्थिती उद्भवली आहे. आई बाबांना कामाचे फोन असतात पण हे मुलांना नाही कळत ना  ! त्यामुळे सकाळ पासुन नतमस्तक होऊन जो तो चहा, दूध ,नास्त्या
खाली मोबाईल चाळत असतात. त्यात आईने काही सूचना दिल्या तर त्या कानावर पडतात,पण किती
पर्यंत मनाने ऐकण्यात आल्या यावर पण सकाळी वाद होतात.उठल्यापासून सुरू. असे म्हणत चहा पाणी होते. 
   वाचन तर मागेच पडत आहे, आवड पण कमी होत आहे. ३६५ दिवस मात्र साजरे होतात, नुसते मोबाईल वर संदेश देऊन. आज मैत्री दिवस ,उद्या गुलाब डे, तर काय चाॅकलेट डे,तर आज कविता डे तर उद्या कसला तरी डे साजरे. होत असतात.   खरं पाहिले तर आपल्या संस्कृतीत प्रत्येकाच्या उपकाराची जाण म्हणून दिवसाला महत्त्व देत  दिवस साजरा करण्यात येतो.  जसे बैल..बैलाची ,त्यांच्या कष्टाची जाणीव म्हणून बैलपोळा, दिवा... तिमीर अंध:कार दूर सारणारा म्हणून दिव्यांची अमावास्या, पर्यावरण ची जाण म्हणून वड पौर्णिमा ,  तसेच एक दिवस मातृदिन असे दिन विशेष आहेत.
   पण हे सारे सोडून पाश्चात्य संस्कृतीचे डे साजरे करण्याचे स्तोम फार वाढले आहे.    
कळत नकळत आपण पाश्चात्य संस्कृतीचे अनुसरण करत आहोत . चांगले असेल ते घ्यावं पण आपले आहे ते सोडू नये.
   आता खाण्या पिण्यात ही तेच.. आपले भारतीय खाणे मग ते पंजाबी, राजस्थानी, बंगाली, पदार्थ पण चविष्ट असतात, आता तर सर्व पदार्थाची छान सारे जण अनुभव घेत असतो . हे सारे असताना,आता  फास्ट फूड चे वेड आहे. जे पदार्थ आरोग्यास हितकारक नसतात पण मुले वा सर्व जण  चवीने खातात. मैदा शरीरास हानिकारक त्यासर्व पदार्थात तोच असतो, पीझा पास्ता न्यूडल वगैरे. 
     तेव्हा रहाणे. वागणे, ते वावरणे या सर्वच बाबतीत मुलांच्या सांगोपनात जडण धडणात बदल केले पाहिजेत.
      


        




बुधवार, ३१ जुलै, २०२४

मन झाले ओले चिंब


*स्पर्धेसाठी*
तृतीय वर्धापनदिन स्पर्धा 
शोध अस्तित्वाचा साहित्य समूह 
विषय...मन झाले  ओले चिंब 
मुक्त छंद प्रकार 

 शीर्षक...आभार विधात्याचे

बसले होते एकटीच
समुद्राच्या तटी
पहात होते 
सागर लाटांचा खेळ .

एका नंतर एक लाटा
येत होत्या उसळत
भेटण्या किनाऱ्याला ,

पण येताची किनारा 
लाजून चूर चूर होत 
पसरत होत्या किना-याशी 
अलगत.

खेळ पहाता पहाता 
मन रमले निसर्गात
किती देतो आपणास निसर्ग 
कुठे नदी, जलशय तर 
कुठे उंच गिरी शिखरे, पठार.

आहे सारी किमया तयाची 
आणि त्या विश्वंभराची
केली तयार अद्भुत सृष्टी 
पहा तरी किती,

वरती निळे अंबर
त्यात सूर्य, चंद्र ,तारे ग्रह महान
या विश्वंभराच्या करणीला
 कशाची नसे तोड.

विचारात मन माझे झाले 
ओले चिंब चिंब 
मनात मानीले शतदा आभार
सहजतेने जोडले गेले मम
दोन्ही कर विश्वंभरास.
मन ओले झाले चिंब 
नसतानाही पाऊस.


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

पुण्य

 


व्यसनाला आळाघाला

मोरणा कवी कट्टा समूह सांगली पश्चिम महाराष्ट्र 
आयोजित 
उपक्रम दि 29/7/24
प्रकार पारंपरिक 
विषय ...व्यसनाला आळाघाला
शीर्षक ..सुदृढ सशक्त भारत

नका जाऊ आहारी व्यसनाच्या
सेवावे सात्विक अन्नपाणी
वाईट गोष्टी त्यजता शरीरास
येणार नाही आणीबाणी 

व्यसनाधीन होणं वाईट
 करी घरादाराची रांगोळी 
 हवा सदैव मनावर काबू 
 मग सुखाच्या गाऊ ओळी

 
 गडक-यांनी दिला संदेश जनांना
 चांगली माणसे असती भवती
आठवा एकच प्याला ची  नायिका
व्यसन मुक्त असता होते प्रगती .


बनेल सृदृढ सशक्त भारत
 शिकवण दिली पूर्वजांनी 
संभाळून जतन करावी
हीच धुरा पुढच्या युगानी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, ३० जुलै, २०२४

मनाचा हळवा कोपरा आंगण

शब्द शिल्प कलाविष्कार संघ 
आयोजित उपक्रम 
 विषय...मनाचा हळवा कोपरा 
 शीर्षक.. माझे अंगण

  रोज आवडे मजला
  माझ्या  अंगणी बसणे  
  वाटे कितीही बसले
तरी समाधान नसणे

 एक एक चहाचा घोट
घेते बसून खुर्चीवर
कानी येते किलबिल 
भासे गोड क्षणभर 

 दावित तिची चपळता
जाई मधूनच  खार
एका बाजूला मी गुंफते 
अंगणातल्या फुलांचे हार

मंद झुळूक वाऱ्याची 
मनाला असते सुखावत
सकाळची भक्ती गीते 
ऐकून मन माझे रमवत

अशी रम्य सकाळ 
वाटे कधी न संपावी 
अशातच सहजची
 मम लेखणी झरावी .


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, २८ जुलै, २०२४

कटु सत्य अनुभव


*स्पर्धेसाठी* 
मोरणा कवी कट्टा समूह सांगली, पश्चिम महाराष्ट्र 
आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन स्पर्धा.
दि २८\७\२४
विषय ..कटु सत्य अनुभव 
शीर्षक..  सद्य जीवनशैली 

जग झालय प्रगत
एक फोन केला तर
 मिळे सारेची सहज
हवी ती वस्तू  हजर

सध्या मित्रांची गणना
किती करावी, ती कमी 
पण गरजेच्या वेळी 
कामी येण्याची न हमी

बोलण्यास भेटण्यास 
वेळ नसे कोणालाही 
फोन वर संवादात
आनंदाची मजा नाही 

दोन शब्द बोलायला 
आजी आजोबा तृषित
एका घरात  राहून 
सदासाठी उपेक्षित 

पुढे मागे मोठी  बाग
असे  घर शानदार 
 सुख उपभोग घेण्या 
वेळ कोणा नाही फार

येती मनात विचार 
असे आहे हेची सारे
कटु आहे पण सत्य
वरवर दिसे न्यारे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
८१४१४२७४३०

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...