बुधवार, ६ मे, २०२०

कट कारवाया

स्पर्धेसाठी
विषय- कट कारवाया
 शिर्षक-

राजकारणात चाले
कट कारवाई खेळ
सत्ता मिळविण्यासाठी
सदा येतेच ती वेळ

शिवबांचा होता कावा
सदा गमिनीचा तेव्हा
सुटलेत आग्राहून
सही सलामत जेव्हा

महाभारतात आहे
भरलेले कारस्थान
खूप   केले कौरवांनी
पांडवाचे अपमान

आनंदीचा होता कट
नारायण मारण्यात
केला ध शब्दाचाच मा
 वंश अंत करण्यात

असे भरलेले कट
 जीवनात क्षणोक्षणी
किती जपून टाकावी
सदा पावले जीवनी

वैशाली वर्तक

रविवार, ३ मे, २०२०

माळरान हायकू / माळरान कविता/ निसर्ग

यारिया साहित्य कला समुह आयोजित महास्पर्धा
महास्पर्धा क्र 5
विषय- माळरान
हायकू रचना

    **जमला मेळ**

आवडे मज
हिंडणे माळरानी
म्हणत गाणी

ऐकता गाणी
फिरली सा-या रानी
मी अनवाणी

होते काटेरी
झाडे झुडपे फार
काटे अपार

फुले रंगीत
रानफुले सुंदर
ती मनोहर

फुले वेचली
ओंजळ ही भरली
माथी माळली

वृक्षची वृक्ष
 शीतल मोठी छाया
निसर्ग माया


जमला खेळ
माळरानात वेळ
सुंदर मेळ

वैशाली वर्तक
अहमदाबाद


माळरान                        8/2/2021
   
पहा कसे   रमणीय
दिसतय माळरान
लहान  खुरटी झाडे
पसरली आहेत छान

माळरानात फुलली
पहा छोटी रानफुले
मंद  वा-याच्या संगतीत 
तालावरी  हळुच डुले

हिंडण्या फिरण्याची 
मौज वाटे माळरानी
किती पक्षी पहा उडती
ऐकू तयांची गोड गाणी

मोठ्या झाडाच्या खाली
आहे घनदाट छाया
रवंथ करत करत
गुरे  आली  बसाया

झालीय कृपा वरुणाची
उजाड माळरान बहरले
सर्वत्र  दिसे हिरवळ
पाहून मन आनंदले





अभा म प सा धुळे जिल्हा
चित्र  काव्य
हायकु लेखन
हायकु



 तुझे हसणे
 भासे चित्ता  मोहक 
 मना वेधक   १

  लोभस हास्य
 जणु चांदणे  फिदा
मोहीत अदा २

नको अडवू
हास तू मुक्त पणे
भासे  चांदणे ३

हसतमुख
चेहराची हासरा
पहा नखरा       ४


 मनी हासणे
 शीतलता भासणे
रूप पहाणे

वैशाली वर्तक







खरे पहाता
निसर्ग हाची देव
अमुल्य ठेव        1

देवे निर्मीला
निसर्ग  मनोहर
आहे सुंदर            2


निर्मीले देवे
सुंदरची  आकाश
देण्या प्रकाश        3

भास्कर  रवी            
अविरत नेमाने                                     
नित्य क्रमाने         4                             

 निसर्गा तुझी
 ठेव रे कृपा दृष्टी 
चालण्या सृष्टी         5

समतोलता
राखण्या  निसर्गाची
घेउ दक्षता               6

रवी शशी ते
उगवतात नित्य
सृष्टीचे सत्य            7

लाविता वृक्ष 
निसर्गची हिरवा
 रम्य बरवा              8

नदी सागर
देवाचे वरदान     
सुखी  घागर           9






क्रांती

क्रांती

अन्यायाला वाचा फोडण्या
उठते वादळ वैचारिक
सुरु होतो तयात लढा
नसतो तो कधी औपचारिक

क्रांती घडली ईतिहासात
त्यात झाली बलवानांची जीत
हाच नियम निसर्गाचा
चालत आलेली जुनी रीत

निसर्गाचा असे नियम
डार्वींगने लावला शोध
बलवान तो टिकणार
उत्क्रांती नावे दिला बोध

इंग्रजाच्या जाचाला त्रासून
क्रांती केली मिळविण्या स्वराज्य
स्वातंत्र्य वीरांनी केले बलिदान
घडविले भारतात सुराज्य

मिळेल जर योग्य औषध
ज्याची संशोधकांना नाही भ्रांती
मिळता औषधोपचार घडेल
 महामारी दूर करण्याची क्रांती

वैशाली वर्तक

नाते निसर्गाचे/वृक्षारोपण




मानव व निसर्ग                                                                              
  निसर्गाचे व मानवाचे नाते अगदी त्याच्या जन्मापासूनचे असते.बाळाच्या पाळण्यावर त्याची नजर इकडे
तिकडे फिरावी म्हणून रंगीबेरंगी खेळणे लावतात .हे रंग आपणास त्या निसर्गातूनच मिळालेले असतात .
त्या रंगाकडे पाहून बाळ खेळते,हसते,मोठे होते. पुढे शाळेत गेल्यावर पण या निसर्गाची म्हणजे सूर्य,तारा,
नदी ,डोंगर याची चित्रे काढू लागतात .त्यातूनच कळते माणसाचा व निसर्गाचा किती निकट संबध आहे .
मानवाचा जन्म पण याच निसर्गाच्या पंच तत्त्वातूनच होतो. व त्या पंचतत्त्वातच विलीन होतो.तेव्हा आपले
व निसर्गाचे अतूट नाते आहे आपण या निसर्गात जन्मतो,वाढतो,व विलीन होतो. त्यामुळे या निसर्गाचे
जतन करणे ,पोषण करणे त्याची वृद्धी करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.

        निसर्ग आपला गुरु आहे .त्याचे आपले नाते गुरु शिष्याचे आहे. तसेच तो आपला मित्र आहे एवढेच काय निसर्ग  आपणास डॉक्टर सारखा आहे .डॉक्टर रोग्याला औषध देवून बरे करतात तेच काम निसर्ग पण करतो.म्हणूनच तर आजकाल निसर्गोपचार पद्धतीकडे कल झुकत चालला आहे इतकेच नव्हे तर उपचाराची   चिकीत्सालये निसर्ग रम्य स्थळी बांधत आहेत की निसर्गात राहून , रोगी वा आजारी माणसाच्या तब्बेतीत सुधारणा लवकर होते .
  तसेच याच निसर्गाचा कसा विपरीत परिणाम होतो.. हे देखील दिसते ....जसेअति थंड प्रदेशात दिवस लहान असतो.त्यामुळे म्हणजे सूर्य प्रकाश कमी,त्यामुळे मानसिक रोगाचे प्रमाण फार आढळते..जे आपल्या भारतात बारा महिन्यात सहा ऋतू आढळतात .त्यामुळे निसर्गाचे संतुलन राहते .
        निसर्गाने आपणास ब-याच गोष्टी दिल्या आहेत अन्न ,वस्त्र व निवारा ...या मुलभूत गरजा पुरविणारा हा निसर्गच आहे . आपले पालन पोषण संवर्धन हा निसर्गच करतो. रोजचे भू तलावरील प्राणीमात्रांचे जीवनच त्यावर अवलंबित असते म्हणूनच आपण सकाळी  उठल्यावर जमिनीवर पाय ठेवण्या अगोदर आपल्या संस्कृतीत सांगितल्या प्रमाणे पृथ्वीचे जे निसर्गाच्या पंच तत्वातील एक तत्व त्या भुमीचे आभार मानून... व तुझ्यावर पाय ठेवतो त्याबद्दल क्षमां  मागतो. हे मान्य करित

 समुद्र वसने देवी पर्वते स्तन  मण्डले   I                                                                                                                      विष्णू पत्नी नमोतुभ्यम पाद् स्पर्शेक्षमस्वमे II

            हा श्र्लोक म्हणत उठण्याची पद्धत आहे .कारण ह्याच निसर्गातून आपणास सुजलाम सुफलाम भूमी आपणास मिळते.प्राप्त होते.
        निसर्गाकडून आपणास ब-याच गोष्टी शिकावयास मिळतात .जसे फुलांकडून काट्यात राहून (संकटात राहून ) पण हसणे , झाडांपासून सज्जन माणसांसारखे सदा दुस-यांना उपयोगी पडणे ,म्हणूनच तर झाडांना सतपुरुषाची उपमा देतात ....नदीपासून कितीही अडचणी आल्यात ,अडथळे आलेत, तरी सदा वहात रहाणे,खळखळ करीत पुढे जाणे व जाता जाता आजूबाजूच्या दोन्ही तटांना सुपीक व सर्व प्राणीमात्रांना , जीवांना जीवन देत जाणे.म्हणजे येथे निसर्ग गुरु समान ठरतो. व मानवास घडवितो.
         निसर्ग हा रम्य आहे. खोल खोल द-या, खो-या ,घनदाट जंगले ,उंच उंच बर्फाच्छादित शिखरे ,उतुंग पर्वत निर्मळ झरे,रम्य अथांग सरोवरे ,बेफाम समुद्र , कमळांनी भरलेली तळे,हिरवीगार वां-याच्या झुळ्केवर डोलणारी शेते ,नारळी पोफळीच्या बागा झाडे,डोंगरा अडून उगवणारा सूर्य व त्याची सोनेरी तर मधेच आकाशात गुलाल उधळणारी सूर्य किरणे ,हे सर्व पहिले की वाटते ,ही नयन  रम्य चित्रे कोणी काढलीत.तर हा निसर्गच  खरा चित्रकार आहे .ती रम्य चित्रे पाहून आपण त्याचे चित्रण करतो. म्हणजे निसर्गच आपला गुरु नाही का ? तो स्वत: चित्रकार आहे व आपणास चित्रकार बनविण्याचे स्फुरण देतो प्रेरित करतो.
            निसर्ग आपणास भर भरून देतो तो आपला दाता व आपण त्याचे याचक आहोत. पण याचकाची म्हणजे आपली पण काही कर्तव्य आहेत. दात्याकडून आपणास हवे तितकेच घेतले पाहिजे.इतर जीवमात्रांना पण मिळेल याचा विचार प्रत्येक नैसर्गिक वस्तूत (पाणी ,जमीन )ज्यात वाढ होणे शक्य नाही त्याचा विचार केला पाहिजे.
       याचकावरून बरी आठवण झाली. लहानपणीची आठवण आहे .लहानपणी उद्या हरितालिका म्हटले की आदल्या दिवशी सर्व मैत्रिणी मिळून, हातात पिशवी घेवून पुजेसाठीची पत्री झाडाची पाने आणावयास जायचो व बागेतून वनस्पतींची पांच पांच पाने तोडण्या ऐवजी हवरटासारखी हवी त्या पेक्षा जास्त पाने तोडयचो, तोडणे कसले वनस्पतींना ओरबडून पाने  घ्यावयाचो .ते घेताना फुले पण अधाशासारखी तोडायचो.व त्या बरोबर कळ्या पण यावयाच्या.अशा कळ्या तोडल्याने उद्या ज्या कळ्यांची फुले होणार असावयाची त्या निसर्ग सृष्टीचा अंत व्हायचा. मग घरी आल्यावर आई ओरडायाची ,"की पत्री आणलीत कां झाडे उपटलीत ? पण मग समजू लागले की वनस्पतींना  किती हळूवार स्पर्शले पाहिजे .कळ्या न तोडता कळ्यांची झाडावर फूले उमलू दिली पाहिजेत कांरण फूले झाडांची ,बागेची,निसर्गाची शोभा आहे.तो निसर्ग उद्ध्वस्थ करू नये .एवढेच काय ही जमीन सर्वात धनाढ्य आहे. ..झेंडू पासून
गुलाब मोग-या पर्यत सुगंध देणारी ..माती तीच पण किती रंगात विविधता .. कुठे खनीजे तर कुठे खाणीतून रत्ने.. देणारी अशी सर्वात धनाढ्य माता आहे.
         तसेच हाच निसर्गच मनास प्रसन्नता देतो.ग्रीष्मा  नंतरची पहिल्या पावसाची सर, रिमझिम पडणारा पाउस  पहिल्या पावसानंतर मातीचा येणारा सुगंध,ज्या सुगंधा समोर सर्व अत्तरे,परफ्युम फिकी वाटतात.असा तो मातीचा सुगंध मनास सुखावतो. तसेच थंड वा-याची झुळूक .....त्या झुळूके बरोबर येणारा फुलांचा सुगंध , उन्हाळ्यात हीच झुळूक मनाला जीवाला अल्हादकारक वाटते. त्या नैसर्गिक थंड झुळुके समोर चार बंद भिंतीतील वातानुकुलच्या झुळूकेचा गारवा फिका वाटतो.समुद्राच्या लाटा, पक्षांची किलबिल ,सकाळची सूर्याची कोवळी किरणे , सूर्यास्ताच्या वेळीस तांबूस होत जाणारे आकाश ,सर्व -सर्व काही निसर्गाची किमया जादू, कृपा आहे. निसर्गाने दिलेले दान आहे .त्या दानाचे आपण ऋणी आहोत .याची जाणीव सदैव ठेवली पाहिजे.

         निसर्ग मनास अध्यात्मिक  शिकवण देतो .काळ्या कुट्ट ढगातून लख्खकन चमकणारी वीज अंधाररुपी  दु:खात आशेची किरण चमकवून जाते. म्हणूनच म्हणतात्त ना every black  cloud  has
siverlining...  इतकेच काय रात्र संपून दिवस होणे अथवा उन्हाळ्यानंतर पावसाळा वा ( ग्रीष्मा नंतर वर्षा ) हे निसर्गाचे ऋतुचक्र पण जाता जाता दु:खानंतर सुख येतेच असा संदेश देत जातात .

             ह्याच निसर्गाच्या रात्रीच्या अंधारात आकाशाचे ता-यांचे सौंदर्य असते.  रात्री प्रवास करतांना गाडीच्या खिडकीतून बाहेर आकाशाकडे पाहिले अथवा खेडेगावात रात्री आकाशाकडे पहिले तर
 ता-यांनी भरलेले लुकलुकणारे तारे काळ्या कुट्ट आकाशात ,चंद्र व त्याचा शीतल प्रकाश दिसतो. पण हे रजनीचे आकाशाचे सौंदर्य सध्या शहरात विजेच्या ,दिव्याच्या झगझगीत प्रकाशात आकाशाचे सौंदर्य लोपले जात आहे .ते सौंदर्य पहाण्यासाठी खेडेगावाकडे धाव घ्यावी लागत आहे .इतकेच काय लहान मुलांचा चंदामामा पण उंच उंच इमारती मुळे दिसत नाही .चतुर्थीला कालनिर्णय वा  पंचाग  याच्या द्वारे आधारे चंद्रोदयाची वेळ पाहून, चंद्र  दर्शनाची वेळ साधावी वा पहावी लागते आहे. ही सिमेंटची जंगले निसर्ग सृष्टीला आड येत आहेत . तसेच पोटातील पाणी पण हलणार नाही असे गुळगुळीत वहातुकीचे रस्ते व त्यावर धावणारी पेट्रोलची वहाने जी  निसर्गात प्रदूषण वाढवून निसर्गास हानि पोहचवितात.पाण्याचे जमिनीत खोलवर मुरणे व जी माती, पाण्याचे शोषण करते त्या शोषण करण्याच्या शक्तीला आळा बसत आहे.त्यामुळे पाण्याचे सिंचन अथवा पाणी जमिनीत मुरणे कमी  होण्याने  पाण्याची टंचाई भासत आहे. तसेच झाडे ही जमिनीतून पाणी शोषून,हेच पाणी पर्जन्य रूपाने ढगाद्वारे पाणी पोहचवितात त्यात  अडथळा येतो. व  पर्जन्य सृष्टीला परिणाम होत आहे .

            या निसर्गाचे रौद्र रूप पण आपणास पहावयास मिळते .कारण आपण प्रगतीच्या पथावर जात असता कित्येकदा निसर्गाच्या विरुद्ध जातो. त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडते .त्यामुळे सुनामी सारखी समुद्री वादळे अथवा खोल खोल खनिज प्राप्ती साठी , खाणी  खणण्याने   भूर्गभास भूकंपाचे धक्के हे सारे हाच निसर्ग आपणस दाखवितो. व कधी कधी नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे रौद्र रूप पहावयास मिळते. अतिवृष्टीने नद्यांना पूर येऊन शहरेच्या शहरे नष्ट होतात .तर भूकंपाने हजारो घरे जमीनदोस्त होतात .अथवा अति गर्मीने जंगलात झाडे  दावांनलाने पेटतात व वनश्रीचा  नाश होतो.  तेव्हा निसर्गाचे संतुलन ठेवले पाहिजे .कारण आपले मानवाचे व निसर्गाचे अतूट नाते आहे .
   या निसर्गाचे संवर्धन करणे हे आद्य कर्तव्य मानले पाहिजे. आपले जीवन च त्यावर अवलंबून आहे तर
त्याची काळजी घेणे प्रत्येकाची जवाब दारी आहे


        वैशाली वर्तक

शीर्षक  *वृक्षारोपण*



नको   -हास  वनांचा
करुया वृक्षा रोपण
करा जतन सृष्टी चे
सुधारण्या पर्यावरण


निगा राखा तरु लतांची
  वृक्ष असती  सखे सोयरी
जिणे होईल  नाहीतर कठीण 
प्राणवायु देती वृक्ष  वल्लरी


  थांबवा प्रगतीच्या  नावाने
  जंगल वने तोडण्याचा क्षोभ
   होत आहे निसर्गाचा -हास
मानवाचा वाढलाय लोभ


पक्षी जलचर कुठे जातील
नका ओढावू वरुणाचा रोष
कसे कसेल शेत बळीराजा
पावसाला नका देऊ दोष


वृक्ष ची देती आपणा सावली
थकलेल्या पथिकास छाया
अन्नवस्त्र  देती निवारा
वृक्ष च करती सदैव माया

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


       

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...