शनिवार, १ जुलै, २०२३

चौपदी काव्य रचना

 स्वप्नगंध स्पर्धा  समूह

स्पर्धा क्र.३२
चौपदी काव्यलेखन
विषय.. विठ्ठल
शीर्षक,...  वारी विठ्ठलाची


चला चला विठू दर्शनाला 
मेळा वैष्णवांचा आला दर्शनाला 
एकमुखाने करती विठ्ठल गजर
आतुरले भक्तगण दर्शनाला

 वारीत जाण्याची  मनातून आस
 माऊलींच्या चरण स्पर्शाची आस
 विठ्ठल नाम राही सदैव अधरी
 पाऊलांना लागली पंढरीची आस

ध्यानी मनी स्वप्नी विठ्ठलाचे रूप 
अंतरात भरले माऊलींचे रुप
कधी न चुकली वारीतली सकाळ 
जळी स्थळी पाही श्रीहरीचे रुप

रमतो भजनी वैष्णवांचा  मेळा  
रिंगण  घालती   वारकरी मेळा
खेळ फुगडीचा, धरुनीया फेर
टाळ चिपळ्यात रंगला मेळा

विठ्ठल पाहता दुःखाचा विसर          
मी तू पणाचा, होतअसे विसरत
विठ्ठल नामात, सारेची दंग .           
 राग द्वेषाचा पडला विसर 


वैशाली वर्तक
अहमदाबाद

पिवळे पान / पिकले पान

पिकले पान पिवळे पान ,पांढरे केस असती दोन्हीही समान. एकसमान  ऊन पावसाळे साहिलेले जयांना मिळे सदा मान   जैसे पर्णांचे  पिकणे   नियमच असे सृष्ट...