बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

अकरा दिवसांचा साहित्यिक गणेशोत्सव उत्सव

[27/08, 1:19 pm] Vaishali Vartak: काव्य निनाद साहित्य मंच, पुणे 
आयोजित गणेत्सोव उपक्रमासाठी
उपक्रम क्रमांक 1
27/8/25
विषय...स्वागत गणाधीशाचे

 शीर्षक....आनंद सोहळा*

वेध लागे गणेशाचे
येता भाद्रपद  मास 
कशी करुया आरास
मनी विचार ते खास           1

 स्वागताला खास दारी
रेखाटली  ही रांगोळी
फुले तोरणे लावुनी
लावियल्या दीप ओळी          2

ढोल ताशे वाजवित
केले स्वागत   आनंदे
*विराजले आधिपती*
मन भरले स्वानंदे                  3


रुप तुझे पाहुनिया
मन माझे झाले शांत
तूची आहे सुखकर्ता
कसलीच नसे भ्रांत           4          


विराजले अधीपती      
पाहताच चित्ती ठसे 
 ऐटदार ते बसणे      
 मना मनातूनी वसे              5

अधिपती आले घरी
भक्त येती दर्शनाला
वाटे अपूर्व  सोहळा
येतो  हुरुप मनाला          6

वैशाली वर्तक
अहमदाबाद 
8141427430
[28/08, 11:12 am] Vaishali Vartak: काव्य निनाद साहित्य मंच पुणे 
आयोजित साप्ताहिक गणेशोत्सव अकरा दिवस उपक्रम 
दिवस दुसरा.  2
विषय.     करू आरास भक्ती भावे


लागलेच डोळे आता
तुझ्या  आगमना कडे
मनीं रचिते सदाच
कल्पनांचे आराखडे.

कशी करावी *आरास*
याचा करिते विचार 
करु काही नाविन्याचा
खास काही तो प्रकार

भक्ती भाव दाटे मनी
लवकर  या हो घरी
पहा केली सजावट
स्वागताला उभी दारी

ओवाळण्या तुम्हा दारी
रेखाटली  ही रांगोळी 
फुले तोरणे लावुनी
लावियल्या दीप ओळी

झाली हो आगमनाची
मनाजोगी ती तैयारी
दावा रुप मनोहर
तुची आमुचा कैवारी

वैशाली वर्तक.....   
अहमदाबाद 
8141427430
[29/08, 11:18 am] Vaishali Vartak: काव्य निनाद साहित्य मंच, पुणे आयोजित 
साहित्यिक गणेशोत्सव 
उपक्रम क्रमांक      3
विषय ... आधुनिक बाप्पा 
शीर्षक..  बदल उत्सवात

येता मास भाद्रपद 
वेध लागती गणेशाचे
कशी करावी आरास
यात मन लागे सर्वांचे

काळा प्रमाणे घेऊ दक्षता
मूर्ती बसवू, स्वरूपीं कायम 
विसर्जित करू नियत जागी 
पाळता पर्यावरणाचे नियम


दिसणार नाही आपणास 
छिन्न विच्छिन्न रुप गणेशाचे
 राहतील जलाशय  स्वच्छ 
रक्षण होईल जलचर जीवांचे

 होतो श्रींच्या आगमनाने,   
 आनंद हे तर आहेची खचित 
  पण जोरात वाजविता वाद्ये
 आवाज प्रदुषण नसे उचित 
  
  हेच सारे घेता ध्यानी
  करण्या उल्हासात  सोहळा
  *आधुनिक  गणपती उत्सवा*
  सारे जन झाले पहा गोळा.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
[30/08, 11:27 am] Vaishali Vartak: काव्य निनाद साहित्य मंच पुणे आयोजित 
साहित्यिक गणेशोत्सव अकरा दिवसांचा
चौथा दिवस     4
विषय - एक मागणे मांगल्याचे 
शीर्षक.... देवा तव चरणी 
अष्टाक्षरी रचना
        

 श्रीगणेशा मिळे  मज
सुखानंद अविरत
*देवा तुझ्याच चरणी*
अनुभवे मी खचित

दूर होती सा-या चिंता
जाते शंकेचे मळभ
मिळे मना सुख शांती
कामे होतात सुलभ

 येता प्रसंग कठीण
तूच असता तारक
धाव घेती तुझे पायी
तूची विश्वाचा पालक

घेता तव नाम ओठी
दुःखे  होती दूर  सारी 
देवा तुझ्याच चरणी
भासे मज जादू न्यारी

देवा तूची मंगलकर्ता
आले मी तव चरणी  
 मज दे तव आशीष
हीच करिते मागणी   

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
[31/08, 12:36 pm] Vaishali Vartak: काव्य निनाद साहित्य मंच पुणे आयोजित 
साहित्यिक गणेशोत्सव 
दिवस ३१\८\२५.       5
विषय . बाप्पा सद्बुद्धी द्या ना

तव नामाचा महिमा
आहे जगती अपार
सुखदाता दुःख हर्ता
तूची विश्वाचा आधार

चौदा विद्या अवगत 
तव महिमा अपार 
दे सकळा सद्बुद्धी 
तुज म्हणती मंदार 


असे प्रथम पुजेचा
सर्व देवातही मान
मागतो मी सद्बुद्धी 
करुन तव सन्मान 

वेद सिद्ध, एकदंत 
रणांगणी धुरंधर 
तुझा जीवनी आधार 
ठेव कृपा निरंतर 

देवा तूची विध्नहर्ता
आले मी तव  चरणी
मज दे सद्बुद्धी आशिष 
हीच करिते मागणी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
[01/09, 12:17 pm] Vaishali Vartak: काव्य निनाद साहित्य मंच पुणे आयोजित 
साहित्यिक गणेशोत्सव 
दिवस सहावा    6
विषय ... बाप्पा ऑन ड्युटी 
शीर्षक.  *सतत कार्यरत असशी*


खरच आहे  रे बाप्पा 
 काम करीशी अविरत
तुला ना झोप विश्रांती 
सतत रहातो कार्यरत

तूची कर्ता करविता 
तुला नसे कधी सुट्टी 
जगताचा तू अधिपती 
सदोदित तू ऑन ड्युटी 


 तुच निर्मिले सूर्य चंद्र 
 होई दिन रात नित्य
  तूझ्या कृपेने ऋतू चक्र
 सांभाळी जगाला हेच सत्य


जरा येताची प्रसंग बाका
आमुचा दृढ विश्वास तूजवर
हाक देता येशी, तूची धावूनी 
दुःख दूर करण्या खरोखर 

तूची असशी तात मात
सर्व जगाचा तू पालक
आनंद देण्या सुख घेण्या
आम्ही होतो तुझे बालक

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
8141427430
[02/09, 4:06 pm] Vaishali Vartak: काव्य निनाद साहित्य मंच पुणे आयोजित 
साहित्यिक गणेशोत्सव 
दिवस सातवा.     7
विषय ... बाप्पा ला डी जे चा  त्रास 
   शीर्षक..नवा बदल घडवू


चला जाऊ श्रींना आणू
शब्द  हे येताची कानी
झांज घेऊनिया हाती 
असेच चित्र येते ध्यानी.


पांघरुन श्रींना शेला
दारी उभी असे आई
 गणेशच्या स्वागताची
औक्षणाची तिला घाई.


मंद स्वरात शहनाई 
 भासे किती प्रसन्नता  
नको वाटतो कर्कश्य 
बंद करा डिजे आता

आवाजाचे प्रदुषण
 सहनच होत नाही 
शांत सुरात ऐकावे
 याची वाट पहात राही

योग्य करूया बदल
त्रास होतो गणेशाला
नको डिजेचा  आवाज
सनईचे सूर आवडे श्रीला

सुंदर बहरली सृष्टी 
नको कसलेच प्रदुषण 
मोठ्या मोठ्याने गाणे वाजवणे
ध्वनीने बिघडे पर्यावरण 


वैशाली वर्तक 
अहमदाबाद
[03/09, 12:09 pm] Vaishali Vartak: काव्य निनाद साहित्य मंच पुणे आयोजित 








अकरा दिवसांचा साहित्यिक गणेशोत्सव 
दिवस .आठवा
उपक्रम क्रमांक 8,       8
विषय... दहा दिवसांचा पाहुणा 

शीर्षक. आनंदाचे  दिवस 


  येता गणराज घरी
 आनंदाचे दिन सारे
उत्साह ओसंडून वाहे
 चैतन्याचे वाहती वारे

आप्त जन येती घरा
गप्पा गोष्टींना चढे रंग
ताई माई सर्व नारी
नटण्या मुरडण्यात दंग

दहा दिवसांचा  पाहुणा 
नावच त्याचं सुखकर्ता 
पळवून देतो मरगळ 
असेच तो विघ्नहर्ता 

येतो  पाहुणा म्हणून 
खाण्यात होते चंगळ
रहाना जरा जास्त दिन
लंबोदरा तू किती रे प्रेमळ

  घर पहा भासे खरच!
आनंदाला आले उधाण
 मग्न भावे करिता भक्ती 
  मिळे  आगळे समाधान 

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद



काव्य निनाद साहित्य मंच पुणे आयोजित 
अकरा दिवसांचा साहित्यिक गणेशोत्सव उपक्रम 
*दिवस नववा*.        9
दि 4/9/25
विषय ... *बाप्पांच्या नैवेद्याची गोडी* 


येता गणेशजी घरी
नैवेद्याची चंगळ भारी
 मंडल करून दाविता
नैवेद्याची  गोडीच न्यारी

पंच खाद्यचा लघुनैवेद्य 
 अपर्ण  भक्तीभावे करिता
गणेश  वाढवे गोडी खास
तोची असतो ना कर्ता करविता 

मोदक लाडू करंज्या 
सर्वात एक  चव आगळी
फळे पण लागती नेहमीची
पण नैवेद्याची चव वेगळी 

भक्ती, श्रध्दा,प्रेम युक्त 
अर्पिता नैवेद्य गणेशाला
 प्रत्येकास  वाटून  खाता
 गोडी वाढते प्रसादाला

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

काव्य निनाद साहित्य मंच पुणे आयोजित 
अकरा दिवसांचा साहित्यिक गणेशोत्सव 
दिवस दहावा.              10
दि 5/9/25
#####################
विषय ... बाप्पा ला काही सांगायचे आहे
शीर्षक...चुका करितो मान्य 



शरण आलो तुला भगवंता
झाल्या चुका आमुच्या अपार  
वृक्षारोपणाने वाढवू वन संपत्ती  
पर्यावरण कडे लक्ष देऊ फार 


कायम स्वरुपी आणू मूर्ती 
 मातीचीच ठेवू पूजे साठी
छिन्न विच्छिन्न न दिसण्या
काळजी घेऊ सदा साठी

विसर्जनाचे करूनी हौद 
 घेवू काळजी जलाची
जलचरांची राखू निगा
दक्षता घेऊन निसर्गाची

हेच सांगायचे होते तुला
नको रागवू तू आम्हावर
अजाण सारी तुझी बालके
तूची आहेस विश्वंभर 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


वेळ विसर्जनाची*.                  11

गणपती आले म्हणता म्हणता
आले की हो विसर्जन 
किती आनंदाचे होते क्षण
सरले दिन भरकन

रोज एकत्रित  आरती
वाटे आनंदाचा सोहळा
भजन, मंत्र -जागर  स्तवन
करण्या आप्त जन होती गोळा


मोदक लाडू पेढ्यांची
होती वेगळीच शान
खाणे, गप्पांना आले
खास आनंदाचे उधाण.

पण, आता म्हणता आरती
डोळे पहा पाणावले
लहान मुलांना सावरता
मोठे जन पण रडावले

 बाजुला शिदोरी ठेवीता 
बाप्पा ssबाप्पा मोरया
शब्द  ते  आले ओठी  
*पुढल्या वर्षी लवकर या

*निरोप तुला देताना*
मन  होतंय उदास
उत्साहात सजविलेले मखर
उद्या  भासेल भकास



वैशाली वर्तक 
अहमदाबाद

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...