शनिवार, ६ जून, २०१५

mobile

                                                                         मोबाईल
              आजकालची सर्वात महत्व पूर्ण गोष्ट म्हणजे मोबाईल . मोबाईल बील गेटस पासून ते अगदी झोपड पट्टीत रहाणा-या  सामान्य माणसा कडेपण पहावयास मिळतो. मग तो मोबाईल काय दर्जाचा आहे ?. तो टच स्क्रीन आहे का साधा की-पॅड चा आहे . ते पहावयाचे नाही वा ते इतके महत्वाचे  नाही
एकदा का फोन हातात आला की मग माणूस फोनला सोडत नाही . गाडी चालविताना अथवा बाईक चालवीत असताना  पण , कानाला फोन चिकटला च असतो आणि आतातर इतके नवे नवे फोन येत आहेत की प्रत्येकास स्मार्ट फोन पाहिजे . म्हणतात ना  माणूस स्मार्ट असो वा नसो फोन तर त्याला स्मार्टचफोन हवा असतो . ज्या शेंबड्या  पोराला नाक साफ करावयाची  अक्कल नाही  तो मुलगा त्याच्या बाबांना विचारतो की  माझ्या साठी एक फोन आणायाचा का ? सध्या स्मार्ट फोन ची फार डिमांड आहे . या फोन मध्ये इंटरनेट वापरण्यात येते .  त्याच्यात    व्होट अप या  एप्लिकेशन ने आपण एकमेकांना  संदेश पाठवू शकतो . घडलेल्या प्रसंगाचे लगेच फोटो पण पाठवू शकतो  . या स्मार्ट फोन मुळे कॉमप्यूटर वरची सर्व कामे सहज होतात ,जसे  की  मेल पहाणे ,यु ट्यूब वर विडीओस पाहणे ,गाणी ऐकणे  , गुगल वरून विविध विषयांचे ज्ञान मिळवणे वगैरे  सहज शक्य होते. हल्लीचे राजकारणी नेते पण निवड णुकांच्या आधी मत मिळवण्या साठी ,कमी पैशात जास्त वेळ बोलण्याची सोय करू व पूर्ण शहरात इंटर नेट ( वाय फाय ) फुकट उपलब्ध करून देवू अशी आश्वासने देतात . आजकाल ब-याच वेळी असे  पण होत की मोठे माणसे लहान मुलान कडून फोन कसा वापरावयाचा  शिकत असतात . सध्याची   लहान मुले   पण या सर्व आधुनिक साधनांशी फारच जवळीक झालेली आहेत . जे लोकं  किती तरी वर्षात भेटत सुध्दा नाहीत  त्या  लोकांशी व्हॉटस अप आणि   स्काइपसारख्या मध्यमातून  एकमेकांना भेटतात . हल्ली   अकरावीत  मुल मित्रान बरोबर खेळतात तरी एका हातात फोनवरून त्यांचे दुस-या मित्राशी बोलणे चालू  असते .  
  भारत हा अशा देश आहे. की  ज्यात   सर्वात जास्त फोन वापरला जातो . आपण बघितले मोबाईल चे उपयोग . त्याचे  काही दूरुउपयोग पण आहेत . सध्या आपण बघतो की ब-याच मुलांना  चष्मा असतो.  त्याचे  कारण फोन वर गेम खेळणे हे आहे . आजकाल मुल फोन वरच गेम खेळत असतात.  बाहेरचे म्हणजे मैदानी खेळ खेळतच नाही . फोन वर छोटी  मुलेच नाही पण काही मोठी माणसे  पण फोन वर सर्फिंग करत असतात . फोन एकदा वापरावयास   लागले  की  मग त्याचे एडीक्ष्न लागते  . आता मोबाईल चे उपयोग आणि दुरुपयोग कळल्या वर हे ठरवणे फार कठीण आहे की  फोन ही  चांगली वस्तू आहे का वाईट ?  ज्याचे त्यानेच फोनचा  कसा, किती उपयोग करावयाचा हे ठरवायचे 

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...