शनिवार, २२ जानेवारी, २०२२

आष्टाक्षरी आरंभ

आ भा म स प कल्याण डोंबिवली महानगरसमूह 
उपक्रमासाठी  22/1/22
विषय - आरंभ

देतो मनाला आनंद
शब्द उच्चार आरंभ
करण्यास सुरुवात
कुठल्याही समारंभ

घेता निर्णय कामाचा
दिन असो कुठलाही 
सत्कर्माला  सदाकाळ
नसे अडथळा काही


स्मरुनिया गणेशाला
करा आरंंभ कार्याचा
तोची असे विघ्नेश्वर
 कार्य सिध्दि करण्याचा

अथ ते इती कामाच्या
मनी ठेवावा विश्वास
पूर्ण  होणारच काम
हाच ठेवू मनी ध्यास



वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

वाट धुक्यात हरवली अखंडिकल्याणकारी काव्य

*स्पर्धेसाठी*
अखंडिकल्याणकारीकाव्यसमुह २
आयोजित  राज्यस्तरिय काव्य स्पर्धा
काव्यप्रकार - अखंडित कल्याणकारी
दि. २१/१/२२
विषय - वाट धुक्यात हरवली
      *किमया रवीराजांची*

वाट धुक्यात हरवली
हरवली ती दाsट धुक्यात
धुक्यात येऊन किरणांनी रवीने
रवीने दूर  सारली  येऊन नभात     १

नभात आभा, रवीच्या पसरल्या
पसरल्या दूरवर दावण्या वाट
वाट तरी  पहा  , दिसतच   नसे 
नसे तो ऊषेचा रम्यसा थाट              २

थाट पहात चालताना झुळुक वाहे
वाहे मंद- मंद शीतल  वात
वात असल्याने पक्षी गण विसरले
विसरले,  झालेली रम्य पहाट           ३

पहाट होतीच, सुंदर  धुंदमंद
धुंदमंद पहाटेला, दवबिंदू वनोवनी
वनोवनी पर्णे गुज सांगती
सांगती अलवार, आनंदे मनोमनी       ४

मनोमनी मी ही, झाले खुश ,
खुश होता आली सर पावसाची
पावसाची सर झेलत चालता 
चालता दूर  झाली वाट धुक्याची.       ५

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 









21/1/22

गुरुवार, २० जानेवारी, २०२२

दत्तगुरू त्रिमूर्ती अवतार

सावली प्रकाशन समूह
षडाक्षरी उपक्रम
विषय - दत्तगुरू
    
*त्रिमूर्ती अवतार*

दत्त  दिगंबर
दैवत मानावे
नित्य नियमित
स्मरण करावे        १

ब्रह्मा शिव विष्णू 
मार्गशीष मास
सत्व परिक्षेस
आले होते खास       २

ब्रह्मा विष्णू  शिव
त्रिमूर्ती प्रतिक
दत्त गुरू असे 
ध्यान अलौकिक    ३

मुखी घेता नाम
दत्त दिगंबर
दुःख  दूर जाते 
सदा निरंतर           ४

अवधूत रूप
शंख चक्र धारी
औंदुबर वासी
भव दुःख  सारी        ५


गुरु दत्तात्रय
त्रिमूर्ती दयाळु
जटाजुटशिरी
आहेत कृपाळु            ६

पाहूनी प्रेमळ 
सात्त्विक  त्रिमूर्ती
आनंदाने मनी
हास्य उमलती             ७

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

बदल परिवर्तन


 कल्याण डोंबिवली महानगर

आयोजित  उपक्रम काव्य लेखन

विषय - परिवर्तन 


नवा बदल


काळा प्रमाणे चालणे

असे सदैव गरज

येता वेळ प्रसंग 

बदल करावा सहज


नव नवीन विचार 

 त्याचे करावे स्वागत

करु सणात परिवर्तन 

ऐका मनाचे स्वगत


 

फटाक्यांच्या आवाजाने

हवेचे ध्वनीचे प्रदुषण

नको -हास  पर्यावरणचा

कमी करूया दुषण


आणू मातीचे दीपक

खुश होईल  कामगार 

काम करणारे हात

मिळे तयांना आधार


दुःख मय तो तिमीर

लावुनिया दीप ओळी

घर अनाथांचे उजळवु

काढु सुंदर  रांगोळी 



देता  फराळ अनाथांना

विलसेल हास्य मुखी

 आनंदाने प्रफुल्लित

दिसतील सारे सुखी


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

चित्र काव्य.जोडी आमुची आगळी

सिद्ध  साहित्यिक  समूह
उपक्रमासाठी
चित्र  कविता
उपक्रम ३६६
19/1/22
  *जोडी आमुची आगळी*

रहातो मिळून मिसळूनी
पहा कसे गुंफियले हात
आम्ही मैत्रीणी जरी पाच
विचाराने सदा एक साथ   १

हात नुसते नाही हाती
एकजुटीत नाही कमी
दावितात मी तुझ्यापाठी
विश्वासाची देत हमी    २

नाही गुंफियले कुंतल एकत्र 
हे तर आहे विचार  धागे
पाचही डोक्यांचे विचार 
पहा कसे एकत्रित  मागे    ३

होतात कधी मतभेद 
तडजोड करितो खचित
देत साथ एकमेकींना 
एकमते रहाणे मानतो उचित    ४


अशी आहे पाच बोटांची
आमची सदैव जोडी
पाचही बोटे बंद करता
बंद मुठी सम आहे गोडी.   ५

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, १६ जानेवारी, २०२२

संगत

 अक्षरमंच

राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा  क्रमांक 20

अष्टपैलू संस्कृती  कला अकादमी काव्यलेखन

स्पर्धा क्र २०

विषय - संगत

   

बालपणी मायबाप

देती सुंदर  संस्कार 

मिळवण्या जीवनात

सर्वोत्तम पुरस्कार 


संस्कारात महत्त्वाचे 

असे साथ संगतीचे

जेणे कारणे भविष्य

होते सदा प्रगतीचे


सदा धरावी *संगत*

चांगल्याच माणसांची

मिळे छान शिकवण

जोड मिळे  सत्कर्माची


फुला संगती मातीही

होत असते   गंधित

तशी उत्तम  संगत

करी  आयु प्रभावित



 पुष्प संगती  धरूनी

 देवागळा मिळे मान

 धागा शोभे देवापाशी

 होई त्याचाही सन्मान


धरा संगत चांगली

साधा जीवनी  उत्कर्ष

ऐका संतवाणी सांगे

जीवनात मिळे हर्ष


वैशाली वर्तक 

अहमदाबाद.

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...