शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२
स्पर्धेतील आव्हान
बुधवार, २० एप्रिल, २०२२
चंद्र चांदण्या कविता / चारोळ्या / पत्र लेखन संवाद
शब्दसेतू साहित्य मंच
साप्ताहिक उपक्रम क्रमांक 5/22
विषय -- चंद्र चांदण्या
१ *शुभ्र टिपूर चांदणे*
आभाळाच्या गाभा-यात
शाळा असे चांदण्यांची
वाट पहाती सांजवेळी
अस्त होण्या आदित्याची
आल्या नभात लाजूनी
एक एक करुनी हळुवार
लुकलुक करीत जणू
दिवे लावियले अलवार
वाटे घ्याव्या उचलूनी
भरुनिया ओंजळीत
हळुवार गुंफण्यास
फुले म्हणूनी वेणीत
जणु भरलीय शाळा
काळ्या काजळ आकाशी
चमचम करी तारे
खेळ खेळण्या चंद्राशी
किती दिसती लोभस
तारिकांचे ते रुप रंग
आकर्षित करी जीवा
मन होई पहाण्यात दंग
शुभ्र टिपूर चांदणे
मोहाविते जन मना
एक एक तारिका त्या
आकर्षित क्षणा क्षणा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
शब्दसेतू साहित्य मंच
साप्ताहिक उपक्रम 5/22
19/4/22
२ जोडाक्षर व जोड शब्द सहित चारोळ्या
विषय - चंद्र चांदण्या
1
जाता रवी अस्ताला नभी
काळ्या आकाशी येती चांदण्या
लुक -लुक करिता भासे हासती
चम -चम करीता दिसती देखण्या .
2
शुभ्र टिपूर चांदणे
सदैव मोहाविते जन- मन
एक -एक तारिका त्या
आकर्षित भासती क्षण -क्षण
3
काळ्या काळ्या नभी
चमचम करती तारे
काही लुक-लुकणारे तर
काही प्रकाशती सारे
4
जसा रवी राज येती प्रभाती
निशा आवरते ता-यांचा पसारा न्यारा
आवरण्याची होते घाई तिजला
मंदावती एक -एक तारिका सा-या
5
रजनी नेसली काळी चंद्रकळा
शोभिवंत केली ता-यांनी
रूप तिचे अधिकच खुलविले
चम-चमत्या तारिकांनी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
शब्दसेतू साहित्य मंच आयोजित
साप्ताहिक उपक्रम
विषय - पत्र लेखन
३ चंद्राला पत्र
20/4/22
।। श्री ।।
प्रती
रजनीकांत
आकाशाच्या आभा-यात
चंद्र लोक
प्रिय चंद्रमा
सविनय नमस्कार ,
तू सर्व जगत जनांचा आवडता. आज तुझ्याशी पत्र द्वारे हितगुज करु असा विचार केला.
तुझे किती रे गुणगान गाऊ?... आणि कुठल्या कुठल्या गुणांचे गुणगान गाऊ. ?
तुझे रूप मनोहर ...आकर्षक.. कवी जगात, तर तुझा महिमा वर्णन करून करून साहित्य नुसते दुथडी भरून वहातय तरी त्या गुण गाथेला उसंत नाही.
तुझी शीतलता तर फारच जगाला.. जन मनाला भावते.
स्त्रियांना.. भावाच्या प्रेमळ नात्याने तू त्यांना आपलेसे करतोस . त्यामुळे बाल वयापासून तू मामा नात्याने मुलांचा आवडता चांदोमामा होतोस .खरच तुझ्या रूपाकडे पहात असता तुझ्या वरचे काळे डाग तुझे हसरे रुप खुलवतात. व फारच मोहक भासतो.
रात्री तर चांदण्या बरोबरचा आकाशात तुझा खेळ खरोखरच मनास लोभवितो.
तास न् तास पहात रहावेसे वाटते. त्या रमणीय रात्रीत सदा शीतलतेने कौमुदीच्या प्रकाशाने निशेचे सौदंर्य रमणीयता पहावयास मिळते. दिवस भराच्या दगदगगीने , सूर्याच्या तप्त उन्हाने, थकलेल्या जनांच्या मनास तू शीतलता देउन मन आनंदी तसेच शांत करतो.
युगल मने तर तुझी रमणीयता पहाण्यात ...तुझ्या अस्तित्वाची सतत जाणीव घेत आनंदात स्वप्न रंगवित बसतात. तुझ्या साक्षीला ठेवून प्रणयात रमतात.
तू येण्याची चाहुल पक्ष्यांना लागते. ते त्यांच्या कोटरीत परतात.
तुझ्या रोजच्या बदलाता कला पण किती सुंदर भासतात. तुझे कोर रुप चंद्र कोर तर फारच लोभस असते. इतके की स्त्रीया त्या रूपाच्या आकाराने भाळी कुंकू लावते.
पौर्णिमेला तर अवर्णनीय तुझा प्रकाशाने आसमंत भरतो. सागर तर पौर्णिमेला लाटा उंचावून तुझ्या रुपास आकर्षित होतो.
पण , काय रे अमावस्येला दडी मारुन बसतो. व अंधारी रात्र करतोस ...उगाच मनी वाईट विचार येतात.
असो. पण तू नाही तर शांत सोज्वळ रुप आम्ही कसे बघणार ?
वैज्ञानिक पण तुझे रुप पहाण्यास येण्याचा प्रयत्न करत आहे.
तुझी व सूर्याची जोडी आहे दोघांनी भेट मात्र होत नाही. पण तुझी अमरतेची तुलना जग करतात.
प्रेषक
वैशाली वर्तक
शतशब्द कथा शतशब्द कथा
विषय - चंद्र
रोजचे आकाश चंद्र तारिकांनी भरलेले किती मनोहर दिसते. यामीनीची रमणीयता मनास भावते. पण तेच अमावस्येला काळीशार यामिनी....आकाशी न तारे न तारिकेंचे चमचमणे , लुकलुकणे. चंद्रच नाही तर त्यांना कोण प्रकाशित करणार .
अशा वेळी खेडेगावात रहाणे म्हणजे काळोखी रात्र काय असते ते शहरी लोकांना कसे समजणार?
अशाच काळोख्या रात्रीत फिरायला निघालो . सध्या मोबाईलच्या युगात टाॕर्चची गरज नसते ...पण ऐन वेळी मोबाईलने दगा दिल्याने ...आधीच काळाखोला चाचरत चालणारे आम्ही पार घाबरलो. तेव्हा आम्हाला नाट्य पद हे ,"सुरांनो चंद्र व्हा चांदण्याचे कोष प्रियकराला पोहचवा.
ह्या पदाची आर्त विनवणी आम्हांला मनोमन जाणवली .चंद्र व अमृतमय चांदण्यांच्या शीतलतेला मनोमन स्मरले व गीत गात रस्ता संपविला.
,
सरत्या वर्षाने काय दिले
स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित झटपट काव्यलेखन स्पर्धा विषय सरत्या वर्षाने काय दिले विचार करता मनी काय मिळाले गत वर्षात दिले सुख आनं...
-
काव्य स्पंदन राज्य स्तरीय समूह 02 काव्य प्रकार -- अष्टाक्षरी 1 विषय -- उंच भरारी आकाशी आहे तुझ्यात कर्तृत्व घेण्या नभात भरारी दाव सामर...
-
सर्व धर्म समभाव लोकशाही साहित्य मंच आयोजित उपक्रम 348 विषय. नारळ कल्पवृक्ष स्थान फळांत मानाचे असे सदा नारळाला श्री उपपद लावून वदती ...
-
इथं इध बस ग चिऊ दाणा खा पाणी पी अन् बाळाच्या डोक्यावरून भुर्रsssकन उडून जा. असे म्हणत विभावरी बाळाला खेळवत होती. ...