मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

लेख. चित्रावरून ललित लेखन

कल्पतरू जागतिक साहित्य मंच
आयोजित उपक्रम
ललित लेखन चित्रावरून 
         सहजीवन

"ये ग जवळ अशी, .देतो ना मी तुला फुल माळून.  छान जमत मला."
कधीचा प्रयत्न करीत असलेल्या स्नेहाला जवळ बोलवत  रविंद्र  उद्गारला.
व शेवटी  न राहवून जवळ ओढून फुल  माळण्यात मदत रुप झालाच .
 आहेच  हे जोडपे असे.   म्हणतात ना काय ते ..made for each other.
या मनीचे त्या मनी अगदी सहजची उमजते दोघांना.
थोडक्यात काय लग्न समारंभात आप्त जनांनी व आईबाबा नी दिलेल्या शुभेच्छा.
*नांदा सौख्यभरे* अगदी तंतोतंत फळल्या आहेत असेच म्हणायचं.
किंवा दोघेही समजुतदार आहेत. एकमेकांना समजून उमजून राहणं
वागणं आहे तयांचे. रविंद्रचे तिच्या भावनांचा पूर्ण विचार करूनच   वागणे असते.
त्यात आज त्यांच्या काॅलेज च्या  मित्र मैत्रिणींचे reunion चे गेट टुगेदर होते.
कॉलेज काळात त्यांची जोडी गाजलेली होती. तेव्हा पासून मन एकमेकांना दिली होती.
रविंद्र फार विनयशील व त्याचा हाच स्वभाव स्नेहाला आवडायचा. किती हुशार आहे पण,जरा अभिमान नाही, नेहमी त्याच्या स्वभावाचे कौतुक करत असायची.
सहजीवन छान चालले होते.
रविंद्र तिच्या आवडी निवडी सतत जपायचा. तिची बॅकेत सर्विस व त्याची corporate कंपनीत चांगल्या पदावर नोकरी.त्यात त्याचे कालच pramotion झाल्याने दोघेही खुशीत होते.
तर अशा सुखी समाधानी जोडप्याचे सुखी सहजीवन होते.
दोघं तयार झाले काय योगायोग पहा किती मन जुळलेली ...दोघे तयार झाली तर मन तर जुळलेली च पण रंग संगतीत पण एकरुपता दिसली.. त्यावर स्नेहा हसून म्हणाली  
अरे,तुला कसे कळले मी लव्हेडर रंगाची साडी नेसणार. .तुझा पण रंग तोच आला.
रविंद्र हसत बोलला ,"उगा का जन म्हणतात ,"दोन तने  एक मन." आहेत आपली.
त्याने फुल माळत असता, स्नेहाने त्याला संसाराच्या वेलीवर वर फूल उमलणार आहे ही
गोड बातमी त्याला हळूच  कानात दिली. त्यामुळे दोघे अजूनही खुशीत होते.
 तेवढ्यात  गीताचे स्वर कानी आले     

  देवा दया तुझी  ही
की शुध्द दैवलीला              
लाखो न दृष्ट माझी 
माझ्याच वैभवाला

   वैशाली वर्तक
अहमदाबाद.

ऋण तयांचे

घेता जन्म मानवाने
नाते जडते कुटुंबाशी
माता पिता कुटुंब जन
मातृभूमी मातृभाषेशी

 ऋणी मी पण  सा-यांचा
 देणे लागतो गुरु जनांचे
माता पितांनी केले मोठे
सारे श्रेय कुटुंबियांचे

समाजाचे पण असती ऋण
ज्या लोकांत वावरलो
समाजाच्या गरजा पुरविण्या
त्यांचा मी ऋणी लागतो

मातृभूमी कुशीत जियेच्या
वाढलो घडलो कर्तृत्ववान
राहणार सदैव ऋणी तीयेचे
पूर्ण करू  स्वच्छतेचे अभियान 


फेडणे असेची अशक्य 
ऋण  माता पिताचे मजवर
 ईश्वराने दिधला मानव जन्म
ऋण तयाचे.  जन्मभर

वैशाली वर्तक
अहमदाबाद 



निवांत

 साकव्य काव्य स्पर्धा 26

स्पर्धेसाठी

विषय ... निवांत 


शांत शांत अगदी निशांत

क्षण फिरुनी यावे निवांत


 सुख, शांति  अन् आनंद ,

  मिळविण्याचा असे छंद

  सारे वसती  आपुल्याच  मनात

  क्षण फिरुनी यावे निवांत.            1


मन शोधी सदैव शांती                

जीवाला न कदापि भ्रांती 

वाटे मनाला हवा एकांत

क्षण फिरुनी यावे निवांत                 2             

                    

 मजेत  विहरती पहा विहंग

 गुरे  निवांतात  करीती रवंथ

कसा मिळतो क्षण तया शांत

 क्षण फिरुनी यावे निवांत.                3

                                                  .      

तप्त किरणांना  शमवून

जातो धरेच्या कुशीत लपून

येतो गगनी शशीकांत

क्षण फिरुनी यावे निवांत.                 4


वैशाली वर्तक

अहमदाबाद

सोमवार, ३१ जुलै, २०२३

म्हणीवरुन ......अती तेथे माती


 अ भा म सा पण ठाणे जिल्हा 2

आयोजित उपक्रम

विषय.  अती तेथे माती


सर्वच  हवे आटोक्यात

अती होता घडे विनाश

जलधारा जरी गरजेच्या

 जास्त होता दिसे सर्वनाश


सकस आहार असे जरुरी

सेवन करता नको अधाशी

बिघडते स्वास्थ अती प्रमाणात 

रहा मग दोन दिवस उपाशी


संयम हवाच मनाला

उठता बसता सदा पाळावा

जगणे करण्या आनंददायी

कटाक्षाने अती लोभ टाळावा


 विज्ञानाने जीवन सुखी

पण नका होऊ अहारी

दुष्परिणाम त्यांचे होता

जीवनात  संकटे भारी


वैशाली वर्तक

अहमदाबाद

मोरपंखी स्पर्श

  प डोंबिवली समूह 2

विषय - मोरपंखी स्पर्श 


होता सुखद पहाट

रवी येताच नभात

रम्य सोनेरी  शलाका

उजळती गगनात


सोनसळी किरणांचा

स्पर्श होता वसुधेला

कशी लाजते हासूनी

पाहताच आदित्याला


मोरपंखी स्पर्श होता

दल पुष्पांचे खुलले

मंद सुगंध पसरे

दाही दिशा  दरवळे


मंद झुळुक वा- याची

करी गंधित सकाळ

अलवार पानावरी

शोभे दवांची ही माळ


वाटे सुंदर  दृश्याने

मोरपंखी अलवार

स्पर्श  किरणांचे सदा

जग  उजळले हळुवार



किलबिल येते कानी

गोड   तो  किलबिलाट

मंद स्वर भुपाळीचे

किती रम्य ती पहाट


वैशाली

रविवार, ३० जुलै, २०२३

धबधबा. जलप्रपात

आधी रिमझिम जलधारा
पसरला पाचूचा रंग हिरवा
खळ खळ वाहती नद्या नाले
जनांना आवडे ऋतु बरवा

ढोल ताशांच्या गर्जना
धुवादार   बरसात
भासे फाटले आभाळ
वारा वाहे जोशात 

जलाशय तुडुंब भरली सारी
दिसे टेकड्या डोंगर नितळ
 दुग्ध रुपी पडे हा जल प्रपात
 तर कुठे शुभ्र जलाचे ओहळ.


 जल तत्व पंचत्वातील
मुक्त हस्ते वरूणाचे दान
जलचर सृष्टीची गरज
जलप्रपात निसर्ग किमया महान.

..सहाक्षरी..पावसाळी सुट्टी .../आर्त विनवणी

 आ भा म सा पण  मध्य मुंबई समूह क्रमांक २

आयोजित उपक्रम

षडाक्षरी रचना

विषय..पावसाळी सुट्टी



सुट्टी ती शाळेला

आनंद दायक

अती वृष्टी होता 

मिळे अचानक


मन आनंदले

सोबती जमले

मनात देवाचे

आभार  मानले


केले नियोजन

 कुठे  जमायचे

 खेळत खेळत 

कसे भिजायचे


होती छत्री हाती 

अंगा झोंबे वारा 

मजेच झेलल्या 

पावसाच्या धारा


पागोळया झरती 

दाराच्या समोर

पिसारा फूलता

पाहिला तो मोर


अवचित सुट्टी

दिली पावसाने 

रोज  असे यावे

खेळु आनंदाने 



वैशाली वर्तक

अहमदाबाद






कल्याण डोंबिवली महानगर 1

आयोजित उपक्रम

विषय ..येरे येरे पावसा

शीर्षक.. आर्त विनवणी 


येणार तू नक्की 

केली बी पेरणी

 बरस ना आता

 किती विनवणी           1


कष्ट करुनिया

घाम तो गाळून

केली मेहनत 

शिवारी कसून             2


ऐनवेळी आता

का रे तू रूसला

कुठे गेले मेघ   

 लपून   बसला           3



मृगाच्या पाण्याने

जीवा लागे आस

फुटतील बीजे

धरिला तो ध्यास         4


बरस रे मेघा

नको पाहू अंत

बळीची वाढवू

नकोस तू खंत             5


नेहमीच तुझे

दाखवितो खेळ

वेळेत न येणे

जमव तू मेळ                6


वैशाली वर्तक

अहमदाबाद



सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...