बुधवार, २३ मे, २०१८
मंगळवार, २२ मे, २०१८
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
मिळविता जीवनी परमानुभव
दूर करिता जाहलासी प्रपंचास
प्राप्त जाहले तया क्षमाशील रुप
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
उमजले देव वसे चराचरात
असे तो अपुल्याच हरकर्मात
अनुभुती ही जाहली तयास
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
आपपर भावातूनी होई मुक्त
मी पण गेले सर्वस्वी विरून
अन्य तत्वाचा न राहे संदेह
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
भौतिक सुखा होऊनी विन्मुख
जाहला मिळविता अलौकिक सुख
पावली समाधान वृत्ती तयास
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
वैशाली वर्तक 20/5/2018
रविवार, २० मे, २०१८
माता
माता 3/5/2018
जिच्या जीवावर उजळे जीवन
जन्मदायिनी असे माता महान
माया-ममतेचा ती असे सागर
पहिल्या गुरुचा तिजलाच मान
आई नंतर हीचे च स्थान
जिच्या अंतरी वसे देव-सहस्त्र
माते समान पोषिते जीवास
गोमाता" म्हणून पूजती सर्वत्र
गोमाता" म्हणून पूजती सर्वत्र
धावत येते कडे-कपारीतून
जीवन देते सर्व जीव -सृष्टीला
कधी संथ,तर कधी खळाळून
माता म्हणूनी पुजीती सरितेला
माता म्हणूनी पुजीती सरितेला
अन्न,वस्त्र ,निवारा देते आपणास
जिच्या हृदयी भरली खाण
तिचेच पायिक आपण सर्व काळ
अवनी असशी माते समान
असे आपणास प्रिय प्राणाहूनी
माते सम सन्मानित जन्मभूमी
माते सम सन्मानित जन्मभूमी
तिजसाठी केले बलिदान वीरांनी
स्वर्गाहूनी प्रिय मम मातृ-भूमी
.......वैशाली वर्तक
स्वर्गाहूनी प्रिय मम मातृ-भूमी
.......वैशाली वर्तक
वाटा
वाटा 1/5/2018
सोडू नको धोपट वाट
मनुजा, सोडू नको धोपट वाट
कशी धावते पहा सरिता
आक्रमिते विकट वाट सर्वथा
सतत वाहते कधी न थांबता
मनुजा सोडू नको धोपट वाट
जपून पाऊले उचल जरा
धैर्य संयम ठेवूनीया मना
दुर्गम वाटच नसे सर्वदा
मनुजा सोडू नको धोपट वाट
बीजांकुर फूटतसे मातीतून
खडतर वाट सहतसे "ते "पण
येई वरती हळूच डोकावून
मनुजा सोडूनको धोपट वाट
सोसून दगड टाकीचे घाव
देवत्व पावोनी शोभे राऊळात
सुगम मार्ग मग मिळे तयास
मनुजा सोडू नको धोपट वाट
पदो-पदी तू रहा खंबीर
कधी न ढळूदे तव विश्वास
विचलीत न होता तू मार्गातून
मनुजा सोडू नको धोपट वाट
देव मानीती राम-कृष्णास
तयांनाही न चुकला कारा-वास
प्रभूरामांनी भोगियला वनवास
मनुजा सोडू नको धोपट वाट
........ .............. वैशाली वर्तक
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
सरत्या वर्षाने काय दिले
स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित झटपट काव्यलेखन स्पर्धा विषय सरत्या वर्षाने काय दिले विचार करता मनी काय मिळाले गत वर्षात दिले सुख आनं...
-
काव्य स्पंदन राज्य स्तरीय समूह 02 काव्य प्रकार -- अष्टाक्षरी 1 विषय -- उंच भरारी आकाशी आहे तुझ्यात कर्तृत्व घेण्या नभात भरारी दाव सामर...
-
सर्व धर्म समभाव लोकशाही साहित्य मंच आयोजित उपक्रम 348 विषय. नारळ कल्पवृक्ष स्थान फळांत मानाचे असे सदा नारळाला श्री उपपद लावून वदती ...
-
इथं इध बस ग चिऊ दाणा खा पाणी पी अन् बाळाच्या डोक्यावरून भुर्रsssकन उडून जा. असे म्हणत विभावरी बाळाला खेळवत होती. ...