गावाकडची माती माती मधली नाती
विषय ..पाऊस तू आणि मी
आतुरलेली तप्त अवनी
येता पावसाच्या सरी
तृप्त होऊनी प्याली जल
मृदगंध दरवळे क्षणभरी
आला आला पाऊस आला
अथांग चोहीकडे पाणी
वर्षा धारेची वरून बरसात
आला विचार मनी गाऊया प्रीत गाणी
वाटे मज झेलू थेंब पावसाचे
करुया नौका विहार मजेत
लुटूया आनंद पहिल्या पावसाचा
किती मजेचे क्षण आलेत
मनात येता विचार
बोलविले मी सख्याला
हसत दिला होकार त्याने
निघालो नौका विहाराला
लाल नौका लाल छत्री
फुले नावेत फुललेली सुंदर
दोघे बसलो एटीत नावेत
जन बघती दृश्य मनोहर
आला बघ तो दिसे पैलतीर
थांबेल आता तो पाऊस
कागदाचीच ती होती नौका
*कल्पनेतील* पूर्ण झाली हौस
वैशाली वर्तक
अहमदाबाद