मंगळवार, ३० एप्रिल, २०२४

चित्र काव्य शब्दगंध समूह



उपक्रम रचना
विषय - चित्र  काव्य 

काय हरवले साजणी
कुठल्या  गुढ विचारात
आहे बसलेली एकांतात
गर्द हिरव्या रानात

कोठे तुझा साजण
चुकलीस का तू वाट
म्हणून दिसते उदास
पाहून रान घनदाट

येईल तुझा साजण
सोडू नकोस तू धीर
हसरी फुले सभोवती 
उगा होउ नको गंभीर

प्रकाशाचा आहे झोत
तीच  किरण आशेची
निसर्ग  देईल साथ
नको मनी चिंता निराशेची

वेलींनी  फुले  उधळली
वेच तू त्या धवल फुलांना
वेळ जाता क्षणिक
मिळेल आनंद मनाला

वैशाली वर्तक

सोमवार, २९ एप्रिल, २०२४

शाखा

लावियलेले रोप सानुले,
बहरले आज, वृक्ष रुपात 
तया सम, शब्दगंध समूह 
झळकतोय त्याच्या यौवनात 


काव्यसंग्रहे,काव्यांच्या ध्वनी मुद्रिका
घेतल्या पहा किती भरारी 
बहरलेल्या जणु तयाच्याच फांद्या शाखा
सारस्वतांना देत सदा उभारी

जरी जाता  तया सोडून दूर 
शब्द रुपानी जीव भेटण्या आतूर 
दूरदूर परदेशी पसरल्या फांद्या 
शब्दांना भैटण्याची मनी हूरहूर 



समूह देतो विविध विषय
देतो संधी दाविण्या चुणुक 
सारस्वतांना मिळता खाद्य 
लेखणी सरसावे होऊन उत्सुक 


दरवळणारा शब्दगंध वृक्ष
करितो सेवा माय मराठीची
नको नुसते बोलणे मुखाने          
संवर्धन ,जतन करी मायबोलीची 

किती वर्णू ,   करू गुणगान 
असाच वृध्दिंगत  होवो सदैव 
दरवळावा तयाचा  किर्ती सुगंध
 Mms शब्दगंध  असे एकमेव.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
२५\४\२४



खोपा सुगरणीचा
21/4/24


पाहूनी चित्र  मी रमले
रमले, खोप्यातच मन
किती पक्षी हा कलावंत 
कलावंत, तो सुगरण

पिले सुरक्षित राखण्या.       
राखण्या,  मऊ ते आसन.       
कसा विणला पहा खोपा
खोपा , केला विना साधन


आणी तृण पाती चोचीने.                  
चोचीने गुंफली सुबक                    
 केली येण्याची जागा आत                        
आत, पहा मऊ बैठक 


ईवले पिल्लू  भिरभिरे
भिरभिरे, पहाण्या आई
आई दरडावूनी सांगे
सांगे, आतच  रहा बाई
l

 कुठलीही    आई असो
असो, पक्षी वा मानवात
काळजी  घेण्याची वृत्ती
वृत्ती, दिसते  अभिजात 

बहिणाबाईं  काव्ये खोपा.  
खोपा वर्णिलेला सुंदर 
नसता हात बोटे  तरी 
 तरी,विणीला मनोहर

वैशाली 



सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...