गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०

वारी साहित्याची (अभंग )

स्वप्नगंध आयोजित
उपक्रम
अभंग 

आवड असावी
सदा लेखनाची
गोडी वाचनाची
ज्ञानासाठी

करिता वाचन 
बुध्दी ला चालना
लिखाणा प्रेरणा
मिळतसे

करुया लिखाण
साहित्यात  वाढ
आळसास काढ
सदासाठी

मराठी साहित्य 
आहे फार मोठे
पहा ते न कोठे
कमी नसे

ज्ञानाची तिजोरी 
वाङमयाची वारी
आणावी ती दारी
शारदेची

आवड नुरली
वाचनाची आता
काळची हा जाता
पुस्तकाची

नित्य नियमाने
करावे लेखन
पुस्तक  वाचन
साहित्याचे

वैशाली वर्तक

पिवळे पान / पिकले पान

पिकले पान पिवळे पान ,पांढरे केस असती दोन्हीही समान. एकसमान  ऊन पावसाळे साहिलेले जयांना मिळे सदा मान   जैसे पर्णांचे  पिकणे   नियमच असे सृष्ट...