गुरुवार, ८ मे, २०२५
समस्या पूर्ती
सोमवार, ५ मे, २०२५
गीत. आई तुझ्या कुशीत. महा पंचरत्न काव्य
काव्य स्पंदन राज्यस्तरीय शब्दसेतू साहित्य मंच पुणे, समाजोन्नती प्रतिष्ठान सूर्य गंध प्रकाशन
आयोजित
महा पंचरत्न काव्य स्पर्धा
महास्पर्धा फेरी क्रमांक ५
दि ४\५\२५
विषय ....आई
काव्य प्रकार भावगीत
शीर्षक..आई तुझ्या कुशीत
१६ वर्ण यती ८ अक्षरानंतर
पाय टाकताच घरी ,तुला भेटण्याची घाई
मुख दिसता आईचे, मन आनंदूनी जाई. धृपद
सारे मिळता जगती, मन हर्षते खुशीत.
सुख स्वर्गाचे लाभते ,फक्त आईच्या कुशीत
काय हवे नको पाही. सदा काळ हीच आई.
मुख दिसता आईचे, मन आनंदूनी जाई. १
हवे ते ते मिळण्याची, कुटुंब जनांना ग्वाही.
करी दुर्लक्षित स्व ला , विचार दुजांचा राही.
परि पूर्णता करण्या , मन गुंततच जाई
मुख दिसता आईचे, मन आनंदूनी जाई. २
असता ती मजपाशी तीर्थे तिच्या चरणाशी
खरच मी भाग्यवान, नको वाटे जाणे काशी
शब्द सुमने गुंफून, तव गुणगान गाई
मुख दिसता आईचे, मन आनंदून जाई. ३
वैशाली वर्तक
अहमदाबाद
गीत...... माझ्या भारत देशाचा.
देशभक्ती गीत माझ्या भारत देशाचा, मला सदा अभिमान प्राणाहून असे प्रिय, तयाच्या गौरवात शान भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक नसे भेद- भाव जन...
-
उषाताई. आठवणी येतात अलवार मृदु शब्द कानी दाटलेली मनी सख्यांची आस हं, बोल उषाताई काय म्हणतेस? उगाच होतात असे अजूनही भास. कारण आहेच त...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
मोहरली लेखणी साहित्य समूह आनंद कंद वृत्तात 1 विषय दु:ख सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे. नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे संतोषिला मनान...