शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

पहिल्या प्रेमाची चाहुल (कथा)

पहिल्या प्रेमाची चाहुल

         नोकरी निमित्त मुंबई सोडून दुसऱ्या गावात जावे लागले . नवे शहर.पण
ओळखीच्याकडून माहिती काढली....मराठी विस्तारात एक गेस्ट हाऊस आहे. 
बरेच मराठी  लोक तेथे... मराठी  वातावरण मिळते म्हणून  येतात निवासास . 
मराठी वस्ती व मालक पण मराठी .....मी पण तेथे रहावयास गेलो. गेस्ट हाउस
चा मालक गप्पीष्ट....रोज आजुबाजुच्या रहाणा-या लोकांची माहिती देई. 
      "ही... आपल्या गेस्ट  हाऊसच्या डाव्या हाताला रहाते ना !   ती मुलगी नर्स आहे .  नर्सींगचा कोर्स केलाय ....दिसायला खरच  सुरेखच आहे बर का! "
आणि ,...ती... अगदी समोर ...उभीच आहे पहा , बाहेरच उभी आहे .काही तरी कामात  दिसतेय आपल्या गेस्ट हाऊसच्या अगदी समोर  पहा. "
     " हं.. ती  हुशार आहे ..सर्वीस पण छान आहे ..चार चौघीत एकदम उठून दिसणारी. जरा गर्वीष्ठ वाटते दिसायला. पण प्रत्यक्षात नाही आहे हं. ...पण,   सदा आपल्याच तो-यात , रहात असते ... अहो !.असणारच खेळाडू आहे ...स्टेट नॕशनल लेव्हलची....गोल्ड मॕडलीस्ट...त्यात नोकरी   पण छान आहे . दिसायला पण उजळ....  त्यामुळे तोरा... ताठा स्वाभाविक आहे. "
   पण,...महत्त्वाचे..,.  तो थांबला व बोलला.
 "महत्त्वाचे म्हणजे ,  काय आहे.! तिचे वडिल शिस्तीचे .अहो rss विचाराचे आहेत.  जरा मुली कडे नजर केली तर   दणकाच पडेल . तसे  ते ही प्रेमळ आहेत. महाराष्ट्र समाजात पण कार्यकारी मंडळात  आहेत. दरारा पण आहे त्यांचा   पूर्ण  आपल्या या विभागात . "
    गेस्ट हाउस मघे आम्ही, बाहेर गाव ची आलेली मंडळी एकत्र व्हायचो . रोज मालकाच्या गप्पा ऐकायचो.. तो रंगून सांगायचा व आम्ही पण  ऐकायचो. 
असेही बाहेर गावात आल्याने घरचे कोणीच नसायचे.. मग आमच्या गेस्ट हाऊस मघे इतर शहरातून ...माझ्या  सारखे  नोकरी निमित्त  आलेली मुले आम्ही बसायचो  .
.....त्याच्या गप्पा ऐकत .असेही काम नसायचे ..आॕफीस मधून येउन मग लाॕजवर जेवायचे. 
   सहज आमच्याच शर्यत लागली ... कोण आहे ही एवढी अक्कड. गर्वीष्ट ....चला ...तिच्याशी जो बोलून दाखवेल त्यास 100रु.मिळणार.. हो त्या वेळी
 100 फार मोठी रकम होती. 
  मी पण तयार झालो. ...लागली शर्यत. आमच्या  गेस्ट हाउस कडे येतांना तिचे घर आधी यायचे.. त्यामुळे तिच्या घरावरूनच पुढे यावे लागे...सहज येता जाता नजरा नजर होई ..पण मालकाने सांगितले शब्द  लगेच ध्यानी येत.कानीं येत .    
     ओसरीत तिचे वडिल व ती , बाजेवर संध्याकाळी बसलेले असत... .कधी
भाऊ बहिण, ..तर कधी आई वडिल ..नेहमी दिसायचे ,   जणु तिचे गार्डच असायचे . त्यामुळे तिच्याशी बोलणे कसे होणार .?. व काय बोलणार .. ? हा सदा प्रश्न च होता. तशी मुलगी    ....खरच छानच होती. आकर्षक ..व खरच स्वतः च्या तो-यातच असायची हे  जाणवले. 
   मी सहजच आमच्यातील दोन जणांना घेउन.. वडील व ती ओसरीत बसली असता गेलो.... पण.. लगेच ति-हाईक व्यक्ती आल्याने ती उठून आत गेली . मी बोलणे काढले ....सुरु केले की, 
  "आमच्या मालकाने सांगितलं की आपण समाजात कार्यकारी मंडळात आहात ...आम्ही बाहेर गावचे... आम्हाला सभासद होता येईल का  मंडळात ?" वडिलांशी निमित्त काढून बोलणे झाले. मग त्या गावात बाजार कुठे ?
पहाण्याची ठिकाणे कोणती? अशी विचार पूस करुन ..सहजता बोलण्यात दाखविली व परत रुम वर आलो. 
पण बाकीची मंडळी म्हणाली यात मुलीशी तर बोललाच नाहीत..
 .....शर्यत तिच्याशी बोलण्याची आहे.
 झाsssले. परत दोन दिवसांनी वडील व ती बसली असता मी एकटाच गेलो. ती नेहमी प्रमाणे उठून आत गेली.... मग मी स्वतःच , मी कुठला ..नोकरी कुठे... वगैरे सांगून . बोलणे वाढविले 
सहज विचारले .की, ,"तुमची मुलगी बँकेत आहेना सर्वीस ला.? कारण माझा एक मित्र येथे बदलून आला आहे .तो त्यांच्याच बँकेत आहे का ? " 
तिच्या बाबांनी तिला बाहेर बोलविले तर ती उत्त्तरली ,"माहीत नाही... स्टाफ मोठा आहे .पूर्ण नाव माहीत पाहिजे. म्हणत आत निघून गेली .
आज तर मी शर्यती  प्रमाणे दोन वाक्य का होईना बोललो.  होतो. व पैज. जिंकलो होतो. तिच्याशी बोलून .
.सरळ रुम वर येउन बाकी मंडळींना सांगितले की मी पैज जिंकलो आहे. पण या पैज जिंकण्यात   गंमत म्हणजे....... मला पण ती आवडू लागली होतीच.  खरच... एक आकर्षण  निर्माण  झाले होते,  
 तिच्या बाबांशी म्हणजे वडिलांशी वारंवार बोलून माझी पण माहीती देउन मी लग्नाच्या बाजारात उभा आहे ची कल्पना दिली .व.... त्यांना पण माझ्यात ......त्यांना  जावई जसा हवा होता तो मिळतोय याची मला अंधुकशी . कल्पना आली...मुलगी   आई वडिलांच्या कह्यात होती.   ते जे दाखवतील ते तिला पटणारे होते.
    व माझे व्यक्तीमत्व पण तितकेच होतेच की..... पसंत पडण्या सारखे.!
 असे होत शेवटी .मला आता तिला पहाण्याची ...तिच्याशी बोलण्याची रोजच ओढ लागली .   पुढे पुढे....ती पण मी कधी आलो की   नेहमीचा येणारा समजून एकत्र बसू लागली . मला पण हवेच असायचे तिच्याशी बोलायाला. 
कारण माझ्या  मनी पण  कुठ तरी  समाधान.. आकर्षण  वाढत चालले होते. 
व हे काही दिवसांनी माझ्या  मनी,... तिला पण माझ्या  साठी त्याच भावना मला जाणवू लागले..आणि मला तिच्याशी बोलण्यात  वेगळेच सुख .  ..मिळू लागले. 
     शेवटी आमच्यातले आकर्षण  तिच्या आई बाबांनी पण जाणले व गोष्टी 
दोन्हीही  घरातील  मोठ्या व्यक्तींशी  झाल्या. पुढे साखरपुड्या पर्यत  गेल्या.
      सहज मी विचारले ,जायचे का शनिवारी सिनेमाला. दोन तिकिट आणली आहेत ..तर वडीलच आधीच म्हणाले,
"  नको .साखर पूडा होउ दे. आज तिकीट आहेत तर माझा मुलगा .म्हणजे ...तिचा भाऊ वाटले तर येईल.....जरा तुमच्या सम वयस्करांच्या गप्पा पण होतील व ओळख  वाढेल. . .   मी नाईलाजाने ..होsss हो ssचालेल की नाराजीच्या सुरात उसना आव आणीत म्हणालो. 
     तेवढ्यात वडीलांनी  साखरपुड्या आधी नाही  हा तत्वनिष्ठता म्हणा वा rss विचार दाखविले. ..,.पुढे सर्व बोलणी, साखरपुडा पार पडला व यथा सुमुहुर्तावर लग्न पार पडले व आज सुखाचा संसार चालू आहे .तर अशी गंमतीदार .कहाणी.. मेरे सामने वाली खिडकी ची....   पहिल्या प्रेमाच्या चाहुलची.


वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
      

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१

कोरा कागद. कोरे पान



येती मनी अनेक विचार 
पाहूनी तो कागद कोरा
कलाकार  शब्द शिल्पकाराचे  भाव 
उमटवून दावी कलेचा तोरा

 मनीचे भाव दावी कवी
 झरता लेखणी कागदावर
कधी  भक्तीचे वा प्रेमाचे
 दावी भावना खरोखर 

कुणी  चित्रकार घेऊनी कुंचला
रेखाटतो  विविध  चित्रे  सुंदर 
   निसर्ग  दर्शन घडवी आपणा
कोरा कागद दिसे मनोहर

येता  कलाकाराच्या हाती
 कला अद्भुत दावणे त्याची गरज
 विविध आकार देऊन कागदास
रुप  कागदाचे बदली सहज

नको व्यर्थ  व्यय कागदाचा
लेखणी कागदाची रहाण्या सांगड
 प्रगतीच्या नावे नको वृक्षतोड
होणार नाही दोघांची परवड.

वैशाली वर्तक 19/2/2021


शब्द रजनी साहित्य समूह 
विषय कोरे पान 


येती मनात विचार 
पाहूनिया कोरे पान 
शब्द शिल्पकार दावी
भाव उमटूनी छान 

 भाव मनीचे खुलले 
  क्षणी झरता लेखणी
कधी  भक्तीचे  प्रेमाचे
 भासे  लेखणी देखणी 

 चित्रकारे  कुंचल्याने 
 चित्र  काढले सुंदर 
केले निसर्ग  दर्शन 
कोरेपान  मनोहर

आला पहा कलाकार 
दावी  पहा कलाकृती
देत आकार पानास
झाल्या विविध आकृती

नको व्यय कागदाचा
घालू पानांची सांगड
  -हास नको वनश्रीचा
 घेऊ ध्यानी परवड.


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

अष्टाक्षरी आयुष्याची नाव/ पैलतीरी

अ भा म सा प स्वप्नगंध  समुह
अष्टाक्षरी काव्य
विषय -- आयुष्याची नाव

तूची असे करविता
नसे चिंता मज उरी
माझ्या  आयुष्याची  नाव 
सोपविली   तव करी

येता कितीही संकटे
तूच आहे माझा त्राता
भय नुरते मजला
तूच विश्वाचा विधाता

मद मोह मत्सराचा
नको नावेत वावर
आयुष्याची नाव माझ्या  
तूची सदाची सावर

सदा घडो तुझी सेवा
मुखी नाम निरंतर
तूची दिले सर्व  काही 
तुझा न व्हावा विसर

तव कृपा प्रसादाचा
राहो हात मज शिरी
आयुष्याची नाव माझी
तूच लाव पैलतीरी

वैशाली वर्तक
अहमदाबाद

ओळकाव्य अष्टाक्षरी नाळ जोडली मातीशी

शब्दरजनी साहित्य  समूह आयोजित  
प्रथम  वर्धापन दिन राज्य स्तरीय  काव्य लेखन स्पर्धा
विषय - नाळ जोडली मातीशी
अष्टाक्षरी काव्य

शीर्षक - भुमीपूत्र 

आहे पोशिंदा जगाचा
 *नाळ जुळली मातीशी*
 मानी मातीलाच माय
रोज खेळतो  तिच्याशी

काळ्या  शार भुईवर
चाले नांगर जोमात
काळ्या मातीला कसून
बळी करे सुरुवात       

झळा उन्हाच्या साहूनी
काळी माय  भेगाळली
वाट पहाते मृगाची
पाण्यासाठी आसुसली

नाते जुळले मातीशी
बळी मोती पिकवितो   
भिजे घामाच्या धारात
कष्ट शिवारी करितो

मृग नक्षत्र  पाण्याने
बीज अंकुर फुटेल 
कोंब डोकावून पाही
मन  आनंदे भरेल

पीक येईल शेतात
शेत दिसेल   हरित
मिळतील मोती छान
फळो कष्टाचे फलित

स्मरुनिया भक्ती भावे
केली बियांची पेरणी      
फुलू दे रे शेत माझे
सदा नमतो चरणी


वैशाली वर्तक
अहमदाबाद  23/1/2021

सहाक्षरी. . गीत मी सूर तू

सावली प्रकाशन समूह 
उपक्रम
विषय-- गीत मी सूर तू


मधुर  सुरेल
*गीत मी सूर  तू*
ऐकण्या अधीर
कर सुश्राव्य तू        1
    
मम गीतातला  
शब्द मी स्वर तू     
लयही साधता
भावना सांग तू           2

गीत तूची माझे 
प्रेमाने गायिले
जीव  ओतुनिया 
 प्राण ओतियिले            3

भाव गीतातला
तूची तो जाणिला
 किती   रंगवूनी   
मज  तू दाविला              4

सप्त सुरांनी त्या
गीत  फुलवले
तालात ऐकता
मन संतोषले              5   

तुझ्या  कंठातले
गीत ते मोलाचे
लुब्ध करी जीवा
शब्द अमृताचे              6


      वैशाली वर्तक.
अहमदाबाद



वरील सहाक्षरीचे गीत


सुरेल  मधुर,  गीत मी सूर  तू
ऐकण्या अधीर  कर सुश्राव्य तू

    
मम गीतातला  शब्द मी स्वर तू     
लयही साधता  भावना सांग तू           

गीत तूची माझे प्रेमाने गायिले
जीव  ओतुनिया प्राण ओतियिले            

भाव गीतातलातूची तो जाणिला
 किती   रंगवूनी   मज  तू दाविला              

सप्त सुरांनी त्यागीत  फुलवले
तालात ऐकतामन संतोषले              

तुझ्या  कंठातले गीत ते मोलाचे
लुब्ध करी जीवा  शब्द अमृताचे              


      वैशाली वर्तक.
अहमदाबाद



बुधवार, १७ फेब्रुवारी, २०२१

कलश

यारिया साहित्य  कला समूह 
विषय-- कलश 
कलश

नाव घेताची कलश
भाव मंगल येती मनी
पूजा न् अर्चा असावी
हेच  कळते  मना क्षणी


जल नद्यांचे  पवित्र
येती सप्त नद्या पूजनात
मिळे भावनिक पवित्र ता
भक्ती भावे कलशात

लग्न वा मंगल कार्यी
हाच कलश लावी माथी
स्मरून नद्यांचे पवित्र जल
तीर्थ  म्हणून घेई हाती

डोळा लावती पाणी वधूवरास
होता संपन्न  लग्न सोहळा 
हाती घेऊनी जल कलशाचा
करवल्या होती भोवती गोळा

नागवेली पर्णे वर श्रीफळ
स्वस्तिक काढी कुंकूवाचे 
ठेवून कलशात सुपारी पैसे
हे प्रतिक असे मांगल्याचे


वैशाली वर्तक

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...