शनिवार, १६ जानेवारी, २०२१

हे भाव अंतरीचे

काव्य स्पंदन भावगीत
हे भाव आंतरीचे

 हे भाव  मम अंतरीचे ,तुजला उमजतील  का  18
 माझ्या  मनीच्या भावना  तुज हृदयी रुजतील का   18

रोज वाटे तुज पहावे, अवचित भेट ती घडली 
ओढ काय ती जीवास ,नित्याची मज लागली
फुल फुलले कळीतूनी, गुज माझे  उमलेल का    
माझ्या  मनीच्या भावना तुज हृदयी रुजतील का

किती गोड तव हास्य  ते जणू ता-यांचे हसणे
वाटे पहात रहावे सदा तव रुपाचे चांदणे
भासते जसे माझ्या  मनी तुजला ही भासेल  का
माझ्या   मनीच्या भावना तुज हृदयी रूजतील का


लागले   जीवास वेड ,  सतत तुला   पाहणे
होता  जरा नजरे आड , शोधिले  भेटण्या बहाणे
अंतरीचे   बोल  माझे, कोणी तुला सांगेल का
माझ्या  मनीच्या भावना तुज हृदयी रुजतील का



वैशाली वर्तक

बावरे हे मन

उपक्रम

विषय- बावरे  हे मन

 कसे सांगू तुला मी
 मन हे झाले बावरे
कधी येशील जवळी
सखया भेटण्या धावरे

वाट पाहूनी सखया
लागे न लक्ष कशात
कसे समजावू मनाला
जीव गुंतला तुझ्यात

वा-याची झुळूक ही 
अलगत स्पर्शूनी जाता
सांगे कानात सांगावा
तुझ्या  येण्याचा आता

बघ तो चंद्र नभीचा
त्याला आहे जाणीव
माझ्या  मनाची त्याला
कळतेय  आज उणीव

वाट पहाण्याची सख्या
माझ्या मनाची रीत
बघ सांजवेळ झाली
धुंद मनी ही प्रीत

वैशाली वर्तक

ऋतुचक्र

ऋतुचक्र








निसर्गाची पहा कृपा

तोची आसे एकमात्र

कधी गर्मी कधी वर्षा

त्याची सत्ता दिन रात्र 


येता  वर्षा रूक्ष धरा

पहा कशी बहरली

ओली चिंब होता माती

तृणांकुरे अंकुरली


वृक्ष लता वेली सा-या

दिसे हिरवे सर्वत्र 

शालू  हिरवा धरेचा

रंग तिचा एकमात्र


रुप भूमंडळाचे ते

बदलले पहा कसे 

दिन सुगीचे ते येता

रुप नवे शोभतसे


होता पाने ती पिवळी

जागा करी हिरव्यास 

नियमच तो सृष्टी चा

होत नाहीत उदास 


शरदाची  पानगळ 

निस्तेजता वृक्षावरी

पाचोळ्याच्या पसा-याने

पीत रंग भूमीवरी


मोहरेल तो बहावा

फुटे नव पाने वनी

नव चैतन्याची सृष्टी 

फुले वसंत तो मनी


ऋतू मागूनी ऋतू ते 

बदलत जाती असे

निसर्गाची ही किमया 

भूमंडळी  शोभतसे


वैशाली वर्तक 

अहमदाबाद







शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१

आयुष्याची संध्याकाळ लेख

अ भा म सा प स्वप्न गंध  समूह 
स्फूट लेखन  स्पर्धेसाठी
विषय -- आयुष्याची संध्याकाळ
                       शीर्षक --   *आनंदकाळ*
      संध्याकाळ  होता ओढ लागते  आपापल्या आप्तजनांना भेटण्याची...दिवस भराच्या घडामोडी एकमेकांना  सांगण्याची...घरकुलाकडे जाण्याची.. 
        तसेच *आयुष्याची  संध्याकाळ* पण सुखदायी होते. आयुष्यभर  धावपळीत ... कधी कुटुंबाच्या तर कधी स्वतःच्या  स्वप्नपूर्तीसाठी महेनत करुन जीवन व्यतीत केलेले असते. तयात कितीकदा स्वतःच्या  आवडी निवडींना मुरड  पण घालावी लागली असते.. पण,...   आता या जीवनाच्या सध्यांकाळी जवाबदा-या थोड्याफार कमी झाल्याने..... आपण आपल्या मनासारखे जीवन जगण्यास , ही संध्याकाळ  फार सुखदायी ..उचित असते . जे सुख वेळे अभावी ......स्वतःच्या  मुलांच्या बालक्रिडा  , बाल लीला पाहण्याचा ....त्याच्यात रमण्याचा  आनंद उपभोगण्यात उणीव राहिली असते ... ते सारे  सुख आता  नातवंडात  पाहून जीवन आनंदमय होते. आणि.....  महत्त्वाचे ...ही सुंदर  देवाने निर्मीलेली सृष्टी .....तिचे रूप  न्याहळणे.....पर्यटन करून ...सहजीवनाचा आनंद उपभोगण्याचा .....हा   काळ . तसेच  ज्या समाजात  आपण रहातो.. त्याचे पण ऋण  असतेच  ना !  तर जमेल तशी समाज सेवा... लोकांना मदत रुप होणे..  आत्म चिंतन करणे  या सर्वाचा काळ म्हणजे जीवनाची संध्याकाळ . 
   ...... वैशाली वर्तक

भावगीत स्नेह तीळाचा अखंड राहो

काव्यस्पंदन 02 राज्य स्तरीय 
भावगीत लेखन 
विषय -- स्नेह तीळाचा अखंड राहो
 शीर्षक -    प्रेमभाव


राहो स्नेह   अखंड  तीळाचा
वाहो  झरा नित्यची  प्रेमाचा         धृपद

जशी वसे  तीळात स्निग्धता  
   तशी हृदयी राहो ममता  
भाव परस्परांशी स्नेहाचा
वाहो  झरा नित्यची  प्रेमाचा              1
 

   गुळाचा गोडवा  वसो मुखी  
   मन राहे  सदाकाळ   सुखी   
    राहो संबंध   तो जिव्हाळ्याचा
   वाहो  झरा नित्यची  प्रेमाचा          2
     

    गुळ तीळाची   भेट घडता   
    गोडी स्निग्धतेशी  जोडी जमता  
     मैत्री भाव गुण्या गोविंदाचा
     वाहो  झरा नित्यची प्रेमाचा        3


वैशाली वर्तक     15/1/2021

सहाक्षरी एक होती मीरा / आठवण

यारिया साहित्य कला समूह
विषय- एक होती मीरा


मीरेचा गोपाल
वसे तो अंतरी
तया वीण तिचा
दुजा नसे हरी

मुखी सदा नाम
एकच अधरी
गोपाळाची भक्ती
घेतली पदरी

 जळी स्थळी मीरा
 गोपालच पाही
कृष्णाच्या भक्तीत
सदा लीन राही

विष पण प्याली
 राजा तो गिरधारी
अंतरंगी वसे
कोण तिला मारी

नको तिला धन
मोतियांच्या सरी
 भजनात रंगे
 कृष्ण  राहे उरी

 सारे जन सांगे
झाली प्रेम वेडी
कृष्ण नामे तिने
बांधियली बेडी

एक होती मीरा
भक्तीत  जाणिली
दुजी राधाकृष्ण
नामे ओळखिली


वैशाली वर्तक
सहाक्षरी   आठवण

सुख न्  दुःखांची
असे साठवण
कधी  येते त्याची
मनी आठवण              1

डोळा उभे राही
रम्य बालपण 
मोद देइ जीवा
त्याची आठवण             2


आठवात आहे
भेट ती पहिली 
कसे विसरीन
अपूर्व ठरिली                  3

मनी दरवळे
गंध सुमनांचा
स्पर्श  तुझा देई 
मनी आनंदाचा                4


यशाचे दिवस
राही स्मरणात
अपयशी क्षण
नको आठवात                     5

पहिल्या प्रेमाच्या
किती आठवणी
अजुनी करिते
मनी साठवणी                      6






सोमवार, ११ जानेवारी, २०२१

ललित लेख चित्रावरुन

सुंदर  डोंगर माथा  पहा  कसा सर्वत्र सजला आहे  हिरवा गार....वर्षा धारा बरसता धरेवर   झालाय  धरेचा एकच रंग...  भेटता धरेला तिचा प्रियकर  पर्जन्य ... धरा अंकुरली....  .....रानफुले पण डौलूनी हसती सभोवताली . छोट्या रोपांना पण एक वेगळेच तेज तरारले .  हिरव्या पोपटी रंगात  रान माळ हिरवळले. डोंगर उता-यावर वृक्ष डौलात उभी. जणु तट रक्षणास  उभी असलेले सज्ज  सैनिकच
      नील नभी मेघ दाटून आले ...मेघातून आदित्य मधेच  डोकावून पहात आहे. त्याची किरणे रानामाळावर पडल्याने ती सोनसळी रुपात चमकत आहेत. भासत आहे .....जणु रवीच धरेचे फोटो घेतोय की काय ...असा मधूनच प्रकाशाचा झोत येत आहे.  
      खरच निसर्गाचीच ही सारी अद्भूत किमया आहे. वर नीळे 
मेघांनी दाटलेले अंबर....मधून गाणे गात हुंदडणारा वारा...व त्याच्या तालावर पानांची  सळसळ ..ती वेगळेच गीत गात आहेत वा जणू टाळ्या वाजवून साथ देत आहेत. 
खरच निसर्गा तूच खरा चित्रकार आहे . व 
हे पाहून सहज गाण्याच्या ओळी ओठी येतात
   निळे निळे अंबर वरती
  मेघांची स्वारी जाई तयातूनी
    दाही दिशा उजळल्या रवीने
      कोणी हास्य भरले या फुला फुलातूनी
        
वैशाली वर्तक

मोबाईल शाप की वरदान

मोबाईल शाप की वरदान

      अरे  ! काय हा त्रास ... दोन घास सुखाने  खाऊ पण देत नाही. आताच्या आता 
तीस-यांदा जेवतांना उठत आहे. 
 हं हलो ....कोण ..good after noon ...
..हा s हा 
क्या काम  है बोलो....
कौनसी बँक  ...अरे बाबा नही नही ...काही  investment नाही करायची
आधीच पेंनशनर .
फोन कट करुन टाकला.
 ह्या फोनचा मोबाईलचा कंटाळ आला.उठ सुट .. नव्या स्कीम  वा आणखीन  काही ..
   कुठून मिळतात यांना नं . 
     अशी स्थिती झालीय या मोबाईलची. 
तेवढ्यात मैत्रिणी चा फोन आला .... घेतला व इतक्या गप्पा रंगल्या ... ब-याच नव्या 
खुशखबरी कळल्या .. रविवारी कुठे भेटायचे  ते ठरले. मान वाकडी करत व  खांद्याच्या आधाराने बेसनशी जाऊन तोंड धूवून तोंड साफ केले. मग जरा आडवी होते तर आईचा फोन मग काय ....माहेरच घरी आल वा माहेरात गेल्याचा आनंद मिळवत   ....दहादा उठून बसत ...एकदा या हातात तर एकदा त्या हातात करत फोन चालूच  ..तेव्हा जराही कंटाळा नाही ...तर असे आहे या मोबाईलचे.
           तस पाहिले तर कामाचा ....वरदान रूपच आहे. घर बसल्या whatsapp
 मधून थेट हजारो मैल दूर असलेल्या लेकी सुनांच्या थेट कीचन मधे जाऊन येतो. आपण  तर  मघेच छोट्या नातवंडाचे खेळ ..प्रगती.. त्यांचे सोहळे.. सर्व  कार्यक्रम  घर बसल्या पाहू शकतो. त्यामुळे आप्तजन कितीही दूर असले तरी सहज  मनी येईल तेव्हा भेट घेऊ शकतो. मग वरदानच आहे ना!
    या लाॕकडाऊनच्या काळात तर मेंदी लावणे पासूनसारे..  सारे लग्न विधी हजारो मैल दूरच्या कार्यक्रमात   लोक सहभागी  झालेत व आनंद लुटला. 
  आपणही  साहित्यिकांनी  किती कार्यक्रम  प्रत्यक्ष  सहभागी  झाल्या सारखे  अनुभवले. व सहभागी  झालो. 
      आता मोबाईल  शाप वाटणे कधी तरी शक्य आहे ... पण ...जशी चांगली  बाजु तशी वाईट असतेच ना. मुले सतत त्यावर गेम खेळतात... ज्या मुळे डोळ्यास विकार ...मैदानी खेळ न खेळल्याने शरीरास कसरत नाही  व शाररिक  हानी...
माणुस सतत मोबाईल मधे व्यस्त त्यामुळे  घरात , बाहेर संवाद साधत नाहीत..  एकल कोंडा बनत आहे. ...आई बाबांशी बोलण्यात वेळ न देणे... 
     या सा-या वाईट बाजु नक्कीच  ...पण देवने मेंदु बहाल केला आहे तर किती मोबाईल वापराचा याचा विचार  पण केलाच पाहिजे ,....मुलांना शिस्त ता लावली पाहिजे.. 
    आपण रोग बरे करण्यास औषधे घेतो. तेव्हा डाॕ. औषधे देतात त्या औषधांनी आपण बरे होतो. तेव्हा त्या औषधात , काही औषधे फार  strong असल्याने डाॕ  त्या औषधांचा side effect नको म्हणून जोडीस दुसरे औषध देतातच ना.! तेव्हा औषध  किती strong तरी  घेतोच ना  का औषध टाळतो. 
     तसे आहे .... चांगल्या बरोबर  काय वाईट याचा विचार  करतच मोबाईलचा वापर केला तर   वरदानच ठरेल


वैशाली वर्तक.

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...