शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

युग पुरुष

मोहरली लेखणी
 चित्र  काव्य लेखन
शीर्षक -- *युग पुरुष*

देवकीचा  पुत्र  आठवा
वाढला नंद- यशोदे घरी
खोडकर भारी नंदलाला
दह्या दुधाच्या चो-या करी

सदा बासरी अधरी
गोड वाजवी बासरी
सूर ऐकता तियेचे
राधा होतसे बावरी

वेड लावी सूर   जीवांना
राधे संग खेळ खेळी कान्हा
पक्षी पण होती मंत्र मुग्ध
गाईंना फुटे प्रेमे  पान्हा

द्रौपदीचा असे  तो सखा
धावा करी ती संकटाला
त्वरित येई धावत हरि
सदा  तत्पर तिच्या रक्षणाला

दिधले बोधामृत गीतेतूनी
जीवन सार दिले जगताला
अर्जुनाचा सारथी राहूनी
रणांगणी दूर केले अज्ञानाला

मूर्ती  मंत प्रेम राधे कृष्णाचे
ख-या भक्तीचे ते प्रतिक
अव्दैताचा आत्मा  एकरुप
असे प्रेम तयांचे सात्त्विक 

वैशाली वर्तक

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

एकांत हा कधी तरी हवाच ...निवांत एकांत

   एकांत हा कधी तरी हवाच.  
अगदी योग्य  कथन आहे . आपण जीवन भर  रोजच्या दिनचर्येत
धावतच असतो. एक संपले की दुसरे निरंतर काम चालत असते.  आधी नवा संसार 
नवी माणसे ,  त्याच्याशी मिळते जुळते घेण्यात. संसारात रुळण्यास  जीवन सदा व्यतीत होत असते .  अर्थात हे फक्त बायकांनाच लागू असे नव्हे तर पुरुषांचे पण तसेच जीवन धावपळीचे ..चालू असते. संसारात क्षणाक्षणाला कार्यरत राहावे लागते.
   या धावपळीच्या जीवनावरुन एक english कवितेची ओळ आठविली ...
       what is this life full of care
      there is no time to stand & stare.. 
असे धावपळीत जीवन जगतअसतो.  नुसती उद्या ची चिंता . काळजी वहात जगतो.आजुबाजुचे निसर्ग  सौंदय पहायला पण वेळ नसतो. 
   आणि त्या काळात त्याचे दुःख  वा खंत वा आळस वा थकवा पण जाणवत नाही. पण आमुक एका वेळी वाटते फार धावलो  आता जरा एकांतात बसू काही मनन चिंतन करावे. 
      आपल्या  स्वतःच्या  आवडी निवडीचा विचार करावा. ज्या गोष्टी  आपण वेळे अभावी वा आर्थिक  कारणाने नाही करु शकलो. त्या आता निवांत  वेळ काढून सवयी वा छंद जोपासावे.  आणि खरच तसा एकांत मिळाला तर तो प्रत्येकाला  हवा असतो व गरजेचा असतो. 
       अर्थात  हल्लीच्या  जनरेशनला हा प्रश्न खास नाही .कारण वैचारिक   आर्थिक  दृष्टीने  त्यांना सुकाळ आहे.  आपण आपली space ते जपत आहे. .  आम्हाला स्पेस हे शब्द आमच्या तरी जनरेशनला  माहित नव्हते. पण तरी देखिल कितीही स्पेस  मिळवली तरी स्वतःसाठी .. त्यांना ही एक वेळ येईलच की एकांत हा
 शोधतील . 
     तर या एकांतची गरज प्रत्येकास असते . आता हा एकांत कसा उपभोगायचा हा ज्याचा प्रश्न पण एकांताची गरज मात्र  मुळभूता प्रश्न आहेच

वैशाली वर्तक

      एकांत..

 देतो  जीवाला मनःशांती
एकांत क्षण आवडे सदाकाळ
सुरु होते दिन चर्या
जसे होताची सकाळ
हवा हवासा  वाटे मनाला
   प्रत्येकाला  तो  एकांत
आठवणीत रमणे आवडे
पण, म्हणून हवा  तो निवांत
मिळवता ज्ञान   सिद्धी 
एकांत चित्ताला असतो   हवा
सारे विसरूनी होण्या एकचित्त
एकाग्रता देते  विचार  नवा
एकांत हवा वाटे नव युगलांना
दोघांच्यात सदा  रामण्यास
अडचण  वाटे तिसरा
क्षणिक सुखाचा आनंद मिळवण्यास
रोजच्या धकाधकीच्या जीवनी
मिळवावा लागतो निवांत
तोच तर झालाय फार महाग
मग कुठला मिळणार एकांत

वैशाली वर्तक 






बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

घन निळ्या श्रावणात अष्टाक्षरी

मोहरली लेखणी
**घन निळ्या श्रावणात( अष्टाक्षरी)**

सरताच मृग सरी
कृष्ण  मेघ  अंबरात
होई  दाटी ती मेघांची
सरी येती श्रावणात

खेळ ऊन पावसाचा
चाले सदा दिनभर
शोभिवंत इंद्रधनु 
मधे दिसे मनोहर

चिंब भिजली अवनी
हिरवळ चोहीकडे
मोह न आवरे मना
वाटे पाहु कुणी कडे

सणवार श्रावणात
आनंदाची उधळण
लेकी बाळी घरी येता
उत्साहाने भरे मन

शिवारात डोले पिक 
वाढण्याची तयां घाई
बळीराजा खुश मनीं
आनंदाने गीत गाई


वैशाली वर्तक

काळ्या मातीत मातीत ...अष्टाक्षरी

शब्द रजनी साहित्य  समुह
विषय--- काळ्या मातीत 
अष्टाक्षरी

कष्ट करुनी उन्हात
काळ्या मातीला कसून 
नांगरली काळी माती
घाम तयात गाळून

पडताच मृग धारा
काळी माती तृप्त झाली
शेतकरी मनी खुश 
दाणे मोती खाऊ घाली

बरसता वर्षा धारा
काळी माती ओली  चिंब 
थेंब मुरता मातीत
उभारुन आले कोंब

कोंबातून डोकवती
छोटी छोटी दोन पान
वा-यासंगे देती टाळी
आनंदाने गात गान

बीज अंकुरे अंकुरे
ईवलीशी पहा रोप
नभाकडे पहाताती
देण्या मातीला निरोप

वैशाली वर्तक

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०

नागपंचमी

स्पर्धेसाठी
नागपंचमी

सण नागपंचमीचा
चला पुजुया नागाला
 नऊ नाग देवतांना
स्मरु त्या क्षेत्रपालाला

असे सण हा पहिला 
येई आधी श्रावणात
झुले बांधुनी झाडाला
लेकी झुले झुलतात


मित्र  तो कृषिवलाचा
क्षेत्रपाल  वदतात
दुध लाह्या त्या देऊनी
मनोभावे पूजतात.

आल्या माहेरवासिणी
लावा मेंदी हातावर
झुले पहा बांधियले
झुलतील झोक्यावर


वैशाली वर्तक

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

उसवलेले नाते का होतात घटस्फोट ?

उसवलेले नाते


नाते रेशीम बंधनाचे 
रममाण मस्त दोघात
प्रेमाची साथ एकमेंकाना
जणू दोघेच या विश्वात
            मनी आदर अपार
            मी तू पणाचा अभाव
            घट्ट विणलेल्या नात्याला
            का उसवावे ? ना लागे ठाव
मने जुळली तरी
जपावे  स्वत्व मनात
अती दक्षता घेता उसवे
नात्याची वीण क्षणात
                उसवत जाती मनाचे धागे
                सुंदर नाते बंध तुटत
                विसरले सुखद ते क्षण
                प्रेमच खोटे, जगणे कुढत

वाटते तितके नसे सोपे
सामंजस्याची असते गरज
 मग, दोन जीव एकत्र येता
उसवणार नाही नाते सहज


वैशाली वर्तक

शाळा चांदण्यांची

रचियता साहित्य  मंच
विषया -- चांदण्यांची शाळा

आभाळाच्या गाभा-यात
भरे शाळा चांदण्यांची
वाट पहाती सांजवेळी
अस्त होण्या आदित्याची

  येती नेभात लाजून
  एक एक हळुवार 
   लुकलुक करी जणू
  दिवे लावी अलवार

   कधी नाही गडबड
    जागा त्यांची ठरलेली
  कोणी कुठे बसायचे
   शिस्त  सदा पाळलेली
   
    शशी येता नभांगणी
    येई शाळेला भरती
    फेर धरूनी शशीला
    लुकलुक चाले भोवती

   येता शरद पूनम
   जणू सोहळा सुंदर 
   दिसे चांदणे टिपूर
   शाळा दिसे मनोहर

  
  चांदण्यांच्या या शाळेचे 
  कळे  तेव्हाची  महत्त्व 
    बंद  शाळाअवसेला
   दावी चांदण्या श्रेठत्व

वैशाली वर्तक

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...