मंगळवार, ७ जुलै, २०२०

माझी लेखणी

शीर्षक --**माझी आभिलाषा**

माझी कविता असे साधी
नसे तयात राजकारण
दावते कधी निसर्गाचे रुप
 सुंदर कसे ठेवावे पर्यावरण

  कवितेत माझ्या भाव सकारात्मक
 असली तमेची कधी निशा
लगेच दाखवी उदाहरण
 पहा उज्वल आशेची उषा

मन धाव घेई अध्यात्माकडे
दर्शन घडवी संतजनांचे
कधी रंगवी बालमने तर
रंगविते सुंदर चित्र फुलांचे

देते कविता संदेश जनमनाला
सलाम सदाची जवानांना
सांगते आत्म निर्भय बनण्या
कौतुकाची थाप देश सेवकांना


सदा बहरावी माझी कविता
करण्या सेवा माय मराठीची
पसरण्या ख्याती जगताती
हीच सदैव इच्छा वैशालीची

वैशाली वर्तक

अंदाज

उपक्रम                      २/७/२०२०
विषय - अंदाज


उन्हाळे पावसाळे  जितके
पाहून होतात जास्त 
अंदाज येतो अनुभवाने 
तितकाच अगदी रास्त

कुठल्या ही परिस्थिती 
अंदाज असे अनुमान
नसे पूर्ण पणे तंतोतंत 
बसणारा असे  तो किमान

घरातील मोठ्यांचा अंदाज
अनुभवाने असे येणारा  ठराव
हळुहळु जमते सर्वांना
जसा होतो काळाने सराव

सगळे अंदाज अनुभवावर
पण जन्म मृत्यू चा अंदाज
काळच त्याला ठरवितो
तेथे ठरे **वरचाच*** फलंदाज 

वैशाली वर्तक

माझी मुलगी गुणाची

अष्टाक्षरी

मुलगी माझी गुणाची 


जिने उजळीले घर
माझी मुलगी मानाची
आली लक्ष्मीच्या पावले
शान आहे ती घराची


बोल जणु सदा गोड
पहा कामात हुशारी
काम करी धडाडीने
घेते जीवनी भरारी

स्वभावात तो गोडवा
गायनात गोड गळा
तिच्या आवाजाने पहा
घरी आनंदाचा मळा

उजळली दोन कुळे
सासरची ती लाडकी 
सर्वांनाच हवी  वाटे
स्वभावाने ती बोलकी

असे माझे कन्या रत्न
भाग्यवान आहे मीच
किती नशीब माझे हे
 राही पण  शेजारीच

वैशाली वर्तक 






रविवार, ५ जुलै, २०२०

चाराक्षरी चित्रावरुन

वरिल👆🏿 चित्राला आधारित


चाराक्षरी

निसर्गाची
सुंदरता
पहा कशी
विविधता

खरा तूची
जाणकार
तूची देवा
 चित्रकार

केली नभी
उधळण
अस्तित्वाची
 आठवण


उधळण
नभातली
जलामधे
पसरली


लाला रंग
अवनीला
अस्ता जाता
चढविला

दिनभर
खेळलेला
रवी दिसे
दमलेला

जाई आता
तो खुशीत
अवनीच्या
तो कुशीत


वैशाली वर्तक

पत्र लेखन मोहरली लेखणी

स्पर्धेसाठी  पत्र लेखन

सौ वैशाली अ. वर्तक
सेटेलाईट
अहमदाबाद 380015
६/६/२०२०


प्रिय मोहरली लेखणीस,
      खास आज पत्र  लिहीण्याचे कारण पण तसच आहे. बाकी तर रोजच तुला भेटतो. तू विषय देतेस . आम्हाला बोलते करतेस .पण आज,  प्रथम तुला वर्धापन दिनाच्या खूप ..खूप  शुभेच्छा. अग ,पहाता पहाता वर्षाची झालीस ..कळले पण नाही. वाटते आता आता कडे अश्विनी ताईंचा फोन होता. तुझे नामकरण करुन .तुझे कौतुकाने स्वागत केले . भरभरून  सारस्वतांना तू लिखाणास प्रेरित केलेस.
       खर सांगू  सर्व  नवोदित साहित्यिकांना तू  नवे व्यासपीठ प्राप्त करुन दिले. त्यांच्या लिखाणास धार आणली. रोजचे नवे विषय... कधी चारोळी तर कधी चित्र काव्य तर कधी काव्य रसग्रहण.एवढेच नव्हे तर  काव्याचे  विविध प्रकार शिकविले . त्यांचे सराव  पण करुन घेतले. जसे शाळेत शिकवतात ना अथवा  आई मुलांना शिकवते ना !  .तसे उपक्रम राबवून तू अविरत लिखाणात रस घेण्यास प्रवृत्त  केले.
 आणि हो!  आपल्या माय मराठी ची सेवा आमच्या कडून घडविलीस .माय मराठीला  जागते ठेवण्याचे    व मराठी भाषेची सेवा करण्याचे छान कार्य  केलेस ..नुसते "मराठी बोला  मराठी वाचवा" अशी संभाषणे न देता खरच मोलाचे काम केलेस .व वेळोवेळी स्पर्धा घेऊन साहित्यिकांना प्रमाण पत्र  देऊन खूष पण केलेस .
      अर्थात यात अश्वीनीताई ,दिपाताई व वेळोवेळी परिक्षकांनी तसेच  ...  त्यात आणिक म्हणजे   प्रमाणपत्र  देऊन काशीराम सर यांनी पण खूप  मोलाचे काम केले.
      तर हा सर्व  व्याप  नाही काही कमी नव्हे.  200 च्या वर साहित्यिकांची टोळी घेऊन तू  मोहरली आहेस . असेच अनेक वर्धापन दिन येवोत हीच  शुभेच्छा .उद्या  पुन्हा  भेटूच .तुला भेटल्या शिवाय चैन पडते का आम्हाला तरी...चल तर ...... आवडती सखी ..मोहरली लेखणी पुन्हा  एकदा शुभेच्छा




वैशाली वर्तक

निसर्गास पत्र

यारिया साहित्य  कला आयोजित पत्र  लेखन स्पर्धा
स्पर्धे साठी
विषय  ...निसर्गास पत्र 

माननिय निसर्ग 
      हो  !  तुला माननीय म्हटलेच पाहिजे बाबा. ..तूच तर खरा देव... मित्र  आणि हो गुरु.. किती रुपात पहायचे रे तुला.तू आहेसच रूपवान गुणवान   .खरच तुझी कृपा असेल तर  काय विचारायचे. तुझ्यावरच जीव सृष्टी  जगातील जल चर सृष्टी  आवलंबित असते. तुझी रुपे जल, तेज, वायु ,आकाश, भुमी .ही तुझी रुपे ज्यावर तु बहरतोस . तेजाने दिन चक्र चालवितो. तुझ्या सूर्य तेजाने अमृत रुपी धारा बरसतात. व सर्वत्र हिरवळ वा सुजलाम सुफलाम अवनी होते. पृथ्वी पण तिच्या गर्भातून खनीजे देते. ती पण तुझेच रुप . असे निसर्गा तू प्राणीमात्रावर प्रेम करतोस .
      पण कधी तरी पाऊस वेळेत न येवून वा अतिवृष्टीने पीक पाण्याची हानी करतोस . वा घरदार वाहून नेतो. तेव्हा तुझे रुद्र रुप दाखवितो. 
       आम्ही मानव पण प्रगतीच्या नावाखाली तुझ्या  विरुध्द जाऊन वागतोय ..चुका करत आहोत .त्यामुळे  त्याचे परिणाम पण आम्हास  दिसत आहे. 
पण , हे पण नक्कीच.  तूच खरा गुरु आहेस .काट्यात राहून फुले फुलतात हसतात व मानवास शिकवतात की,संकट आली तरी हसत मुखे सामोरे जावे तसेच  तुझी सुंदर  बहरलेली सृष्टी  पाहून चित्र कारांचे कुंचले...
लेखकांच्या लेखण्या स्फुरतात. 
       असो. तुझी सदैव कृपादृष्टी ठेव व सदैव कृपा ठेव .जेणे करुन मानव.. प्राणीमात्र सुखी रहातील . 
जसा तू आहेस आम्हास प्रियच आहे. पुन्हा अशीच गप्पा करावयास येईन.
तोवर बाय. 
काही कमी जास्त बोलली असेन तर क्षमा कर .

तुझी कृपाभिलाषी

वैशाली वर्तक

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...