मी का लिहीते ?
लिहीणे म्हणजे स्वतः व्यक्त होणे. लिहीण्यात स्वतः चे विचार व्यक्त केल्याचे समाधान मिळते. मला काय वाटते. ? एखादा प्रसंग पाहून, वा ऐकून ,वाचून त्या प्रसंगाचे तंतोतंत वर्णन करणे व ते दुस-यास वाचायला देणे .व दुस-याने ते वाचून
त्या लिखाणाचा आनंद घेणे .यात दोघांना समाधान मिळते.
आपण बरेच वाचतो. त्यातील आवडलेल्या वाचनाचा आनंद घेतो. तसेच बरेच विचार मनात घोळत असतात. तर त्या विचारांना शब्दात बांधणे व सुसंबिधत करणे याला म्हणतात लेखन करणे . काही जण कुंचला घेऊन आपले विचार चित्रातून दाखवितात. तर बरेच जण लेखणीतून आपले विचार प्रगट करतात. काही वत्कव्य करुन संवाद साधून वा भाषण देऊन विचार मांडतात.
देवाने मेंदू बहाल केल्याने विचार शक्ती दिली आहे .मेंदू त्याचे काम अविरत करत असतो. तर मेंदू च्या योगाने तयार झालेली विचार मालिका कागदावर उतरविलीच पाहिजे ना.
मला पण लिखाण माध्यमातून आपले विचार इतरांना पोहचविण्यात आनंद वाटतो. मुले लहान होती .अथवा आजपासून 40 वर्षापूर्वी टेलीफोन इतके सर्वत्र नव्हते निदान माझ्या कडे तरी नव्हता. .तेव्हा मुलांची प्रगती , पत्र लिहूनच सासूबाईंना मी कळवायची. अगदी inland चा पुरेपुरा उपयोग करुन लिहून कळवायची. व त्यांना पण सविस्तर खुशाली कळल्याचा आनंद मिळायचा. आता पत्र लेखन बंद च झाले.
पण लिहीणे केव्हाही चांगले . कित्येक जण डायरी दैनंदिनी लिहीतात .त्यात पण आपण आपल्याशी व्यक्त होतो.
आता मी का लिहीते तर मनात येणा-या विचारांना , कल्पनांना मी कागदावर मांडल्या शिवाय मन स्वस्थ बसू देत नाही .वा मन ते विचार (मनात आलेले) मला, माझ्या लेखणीला प्रेरित करतात व हात नकळत लेखणी कडे जातो . कधी गद्यात तर कधी पद्यात .शब्द लेखणीतून कागदावर उमटतात. मग कधी फूले पाहून ,निसर्ग पाहून तर कधी विचारांच्या गुंत्यात आडकून कधी ललित लिखाण होते. तर कधी चित्र काव्य . आणि फेस बूकच्या विविध समुहातील दिलेल्या विषयांवर सतत लिखाण चालू असते.
आताच पहा ना सहज विचार आला की, "मी का लिहीते "?. तर सहजपणे ....
लेखणी झरली.
वैशाली वर्तक.