सोमवार, ७ जुलै, २०२५

लेख घन ओथंबून आले

 ग्रीष्माच्या तप्त झळा अंगाची लाही करत होत्या. आदित्यराजे जणू आग ओकीत होते. सारी सृष्टी तप्त उन्हाने

कोमेजली गेली होती.गुरांना हिरवा चारा मिळत नव्हता.

मानवाच्या अती प्रगती च्या लालसेने सध्या वनराई पण कमी झालेली , त्यामुळे वृक्षेच सावली शोधत होती तर पथिक, गुरे यांना सावली कोठुन मिळणार. जो तो गर्मी ने हाशहूश करत ,आकाशाकडे पहात  बरस रे बाबा आता म्हणून आकाशाकडे नजर लावून बसला होता.

      वसुंधरा तर तापून तापून तिच्या मातीचा कणन कण तप्त झाल्याने शिवारात तील माती भेगाळलेली होती. व भुकेलेल्या बाल्यापरि परि तोंड पसरवूनी ममृग जलासाठी आसुसलेली होती . पण यंदा वरूणाची कृपा जरा लवकरच झाली ,6जूनला मृग नक्षत्र लागते पण यंदा आकाशात काळ्या मेघांची गर्दी दाटली .

बळीराजाला  पेरणीचीतयारी करण्यात घाई करावी लागणार या विचारात होता.

  गर्जत बरसत या मेघांनो 

   नको नुसती गर्दी गगनात 

   गडगडाटाने बरसा  रे

   काळी माय आसुसली शिवारात.

    सुरु झाला सोसाट्याच्या वारा, पक्षांना पण पावसाची चाहूल लागली. इकडून तिकडे पंख पसरून, उडु लागली. पाला पाचोळा पण जणु आनंदाने फेर धरून वा-या च्या तालावर गोल गोल गिरक्या घेत उडू लागला

आणि जलधारा नभातून बरसू लागल्या. मग


वाजवित ढोल ताशे 

मेघ राजा बरसला

नृत्य  दावी सौदामिनी

मोर आनंदे नाचला

  तप्त वसुंधरा पण तिच्या सख्यांना भेटण्यासाठी आतुरतेने वाट पहात होती . तिच्या वरुण सख्याला अलिंगन

देऊन तिची तृष्णा तृप्त झाली. आणि  वारा पण त्या आनंदात सामील होऊन आसमंतात मृद्गंध जणू पसरवत होता. सारी जन मन आनंदाने प्रसन्न झाली. जणू

           

चिंब झाली वसुंधरा

आल्या पावसाच्या धारा

ओल्या झाल्या वृक्षवेली

गाणी गात फिरे वारा


घन निळा बरसला मग हळूहळू  रिमझिम पाऊस धारा जलधारा बरसल्या. आसमंती गारवा आला जनांची गर्मीने होणारी जिवाची काहीली थांबली. 


मुले नाचती आनंदे

गात गाणी पावसाची

टपटप झेली धारा

माळ दारी  पागोळ्याची

     अशा रितीने जलधारा बरसून  घन ओथंबून आलेले आकाश रिक्त झाले.थंड वारा मस्त जिवाला सुखावत होता. वृक्ष वल्ली पाण्याने स्वच्छ धुवून निघाल्या होत्या.पानांवर तितकी जाणवित होती .शेवटी निसर्गाचे 

जलाची किमया आगळीच.



वैशाली वर्तक 

अहमदाबाद 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पिवळे पान / पिकले पान

पिकले पान पिवळे पान ,पांढरे केस असती दोन्हीही समान. एकसमान  ऊन पावसाळे साहिलेले जयांना मिळे सदा मान   जैसे पर्णांचे  पिकणे   नियमच असे सृष्ट...