बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

लवंगलता.वृत्त. (2) कविता. ८+८+८+४ मानवता हाच धर्म / गाव

तितिक्षा भावार्थ सेवा अंतर्गत 
तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित 
तितिक्षा काव्य लेखन स्पर्धा 

वृत्त.. लवंगलता.( ८+८+८+४)
कवितेच्या ओळी पूर्ण करणे,


     शीर्षक ...  मानवता हाची धर्म 

मानवतेचा पथ सजवाया , होवुनिया रांगोळी 
माझ्या नंतर शिल्लक मागे , या कवितेच्या ओळी.

मानवता हा ,धर्मच माना  , जात एकची, मानव.
नसे उच नीच , हेच जीवनी, खरे मर्म रे ,बांधव.

देवासाठी ,देता उजेड, सारेची जन ,समान.
दुजा  भावची, न कदा दावी ,आहे तोची महान.

 संस्काराचे करूनी जतन , क्षुधितास अन्न देणे
उजवा दुखता, वाम कराने, जसे की पुढे, येणे


 सुरसरि दिधली , मुक प्राण्याला,  ही संतांची, शिकवण 
भूतदयेची , जाण जपूनी,  कर संतांचे    चिंतन 

संस्कृतीची महान शिकवण  मनात ठेवू , ध्यानी
मानवता पथ ,   पुढे चालवू  संगे गाऊ ,गाणी

विश्वे शांती,  लावून दिपक,   समजावू ऐक्याला.   
ज्ञानेशाचा पसायदान   मंत्रदेऊ    जगताला

संस्कृतीच्या, परंपरे ची  , काढूया  रांगोळी,
 सा-या विश्वी , ऐकू येती , या कवितेच्या ओळी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




वृत्त. लवंगलता
मात्रा ८-८-८-४
विषय ..माझा गाव

रम्य निसर्गी आवडे मला रहावया मज गावी
निसर्गच पहा क्षणाक्षणाला रूप तयाचे दावी 

नदीच्या तटी छोटी छोटी टुमदार घरे वसली
साधे भोळे जन आनंदी चिंता नाही कसली

रोज सकाळी पारावरती विचार विनिमय चाले
कधी न चुकता भेटीगाठी अंगवळीचे झाले 

संध्याकाळी भक्ती भावे जन मंदीरी जमती
आनंदाने भक्ती भजनी मजेत सारे रमती 

गेले होते   सहज पहाण्या,  आहे का ते तसेच 
 जाता गावी, पाहूनिया मी, चकित जाहले  लगेच,



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पिवळे पान / पिकले पान

पिकले पान पिवळे पान ,पांढरे केस असती दोन्हीही समान. एकसमान  ऊन पावसाळे साहिलेले जयांना मिळे सदा मान   जैसे पर्णांचे  पिकणे   नियमच असे सृष्ट...