शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

चित्र काव्य अष्टाक्षरी


काव्यस्पंदन राज्य स्तरीय  02
दिनांक 6/8/2021
विषय - चित्र  काव्य लेखन
अष्टाक्षरी रचना


सर्व  लेकरे देवाची
तरी किती विसंगती 
दोन सुखात नांदती
दोघे भंगार वेचती            1

मनी इच्छा शिक्षणाची
बाल मनी असे आस
कधी आम्ही पण जाऊ
पूरी व्हावा माझा  ध्यास    2

आपणच का वंचित
नाही नशीबी शिक्षण
गणवेश घालू शिकू
कधी येईल तो क्षण.   3

नको भंगार वेचणे
जाऊ शारदा मंदीरी
घेऊ दप्तरे पाठीशी
हीच ईच्छाअंतरी        4

कसे ऐटीत जातात
पाठी नवीन दप्तर   
आम्ही उचलतो झोळी
अंगी जुनीच लक्तर             5

हेच ते असे नशीब 
कोणा मुखी गोड घास
सम वयस्क असता
मिळे न हवे ते खास

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

शब्द...खेळ शब्दांचा मांडला/ शब्द सरी बरसल्या\ शब्द माझा सखा

*स्पर्धेसाठी*
 प्रेमाची अक्षरे परिवार 
प्रेमाची अक्षरे द्वितीय महास्पर्धा २०२१* 
फेरी क्रमांक ०४ 
अष्टाक्षरी काव्यलेखन स्पर्धा *
दिनांक - *६/८/२०२१*
 विषय - खेळ शब्दांचा मांडला 

 शीर्षक - साहित्यात एकंदर
 ।          खेळ असे तो शब्दांचा
             पूर येतो कल्पनेला
               पसाराचा विचारांचा 1

             शब्द भंडार हवाच
              रचताना काव्य ओळी 
               छंद वृत्त यमक ही 
                हवे मनी सदा काळी 2 

               गद्य पद्य वाङमयाचे 
             असे किती ते प्रकार 
              कोटी करीता शब्दांची
                होई साहित्य साकार 3 

                जुळवूनी शब्द शब्द
                होते तयार लिखाण 
               असो मग गद्य पद्य 
                शब्दांचीच असे खाण 4
       
                 मुल्य सर्वदा शब्दांचे 
                 जाणे शब्द शिल्पकार 
                  शब्द ओवितो उचित 
                 करी तो शब्दाविष्कार 5
    
               भाषा नटविण्या हवे 
              शब्दांवर ते प्रभुत्व 
             खेळ शब्दाचा मांडता 
              जाणा शब्दाचे महत्त्व 6 
   
            वैशाली वर्तक 
           अहमदाबाद
             8141427430
         स्वलिखीत रचना




सावली प्रकाशन समूह
काव्य लेखन 
उपक्रमासाठी
16/12/21
विषय - ओळ कविता
ओळ - शब्द सरी बरसल्या
     *काव्य रचना*
       
  मनी दाटलेले भाव
हाती घेता लेखणीला
*शब्द  सरी बरसल्या*
धारा भेटल्या मातीला

असे गुज अंतरीचे
उमटवे ती लेखणी
शब्द सरी बरसता
भासे मजला देखणी

अशा  नवरस पूर्ण 
*शब्द सरी बरसल्या* 
जणु मेघवर्षा आल्या
मन भावन ठरल्या

शब्द सहज  झरता
 दावी हृदयाचे भाव
शब्द शब्द जोडुनिया
घेई अंतरीचा ठाव

शब्द  असती सुमने
नाना रंगी उधळण
भक्ती, शौर्य ,धैर्य ,शांत
जणु शब्द पखरण

पहा शब्द एक-एक
झरला लेखणीतूनी
झाली कविता तयार
मोद झाला मनातूनी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



माझी शब्द सखी

कल्याण डोंबिवली महानगर
विषय - शब्द सखा माझा

  

दिन उजाडता
येते तिची सय
शब्द सखी माझी 
करी हयगय

धावूनी मनात
करीतात गर्दी
घाई लेखणीला
लावण्यास वर्दी

लागताच वर्दी
रूप साहित्याचे
संवाद वा काव्य
दावी  वाङमयाचे

देती साथ मला
राखे विचारात
कसा जातो दिन
कळे न क्षणात


मिळे विचारांना
सहजच वाट
उमटे भावना
साहित्याचा थाट

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


शब्द

पंचाक्षरी


शब्दा वाचुनी

साहित्य  नसे 

मनोरंजन

होणार कसे          1


शब्द गुंफता

होते कविता

सदा वहावी

शब्द सरिता         2


जपा शब्दांना

नको ते व्यर्थ 

उचित हवे

तयांचे अर्थ         3


झरता शब्द

मिळते ज्ञान

दूर सारिते

सदा अज्ञान         4

     


स्तुती  करण्या

शब्दची कामी

काम साधण्या 

युक्ती  ती नामी       5


 न लागे पैका 

 गोड शब्दाला

 नका कंजुस

 त्या वचनाला         6


कटु शब्दांनी

मन दुःखते

गोड वाणीने

ते सुखावते               7


उमजे भाव

शब्दांनी असे

नसता शब्द

संवाद कसे             8


वैशाली वर्तक


आजचा शब्द


साहित्यात एकंदर

खेळ असे तो शब्दांचा

पूर येतो कल्पनेला

पसारा तो विचारांचा


शब्द भंडार हवाच

रचताना  काव्यओळी

छंद वृत्त यमक ही

हवे मनी सदाकाळी


गद्य पद्य वांडमयाचे

असं किती ते प्रकार

कोटी करिता शब्दांची

होई साहित्य साकार


जुळवूनी शब्द शब्द

होते तयार लिखाण

असो मग ते गद्य पद्य 

शब्दांचीच असे खाण


मुल्य सर्वदा शब्दांचे

जाणे शब्द शिल्पकार

शब्द ओविता उचित

करी तो शब्दाविष्कार


भाषा नटविण्या हवेछ

शब्दांवर ते प्रभुत्व

खेळ शब्दांचा मांडता

कळे शब्दांचे महत्व




स्वर्ग नक्की कुठे?

शब्दरजनी साहित्य  समूह
आयोजित  
उपक्रमासाठी
ललित लेखन
विषय - स्वर्ग  नक्की  कुठे?

स्वर्ग  नक्की  कुठे?
    "अरे बाबा जीवनात सत्कर्म कर तर   स्वर्गात  जाशील  असे लहान पणी शब्द मोठ्यांच्या तोंडून ऐकलेले आठवतात.
अथवा कष्ट करा तर फळ मिळते साठी वारंवार उच्चारले जाते की ,चला उठा आपणच  "मेल्या शिवाय स्वर्ग  दिसणार नाही" .
 लहानपणी स्वर्ग  म्हटले की वर आकाशाकडे बोट व नर्क म्हणता पाताळाकडे बोट जाई. आता कळतय .स्वर्ग  मनात वसलाआहे...कर्मात आहे..स्वर्ग  मानण्यात आहे... स्वर्ग निसर्गात आहे. 
    एखादे काम मनाजोगे होता ...कामास भरघोस यश मिळता आनंद प्राप्त होतो.कधी स्वतः च्या   वा कधी मुलांच्या  मिळलेल्या यशाने मन आनंदाने भरते .स्वर्गीय आनंद मिळतो. यशाने मनास आनंद लाभता आनंदाने स्वर्ग सुख लाभते. कुटुंबातील सर्व  जन सुखात, समाधानात नांदत आहेत .एकमेकात प्रेमभाव व प्रेमभावात समृद्धी 
आहे .तर अपसुकच शब्द मुखी येतात. मी "सुख स्वर्गात"  आहे. म्हणजेच आनंदात स्वर्ग  असतो तर. 
     एखाद्या रम्य निसर्ग  स्थळी फिरावयास  जाता अथवा  नयनरम्य  देखावा.. जसे झुळुझुळु वहाणारे पाणी.... लहानमोठे हिरवळीचे डोंगर... .विविध रंगी   हवेच्या झुळके सरशी डोलणारी फूले .. .मनास भावतात व सहज शब्द येतात अहाहा ! जणू स्वर्गच.  म्हणजेच काय आनंददायी ,अल्हाददायी दृश्य दिसता ....वा प्रसंग घडता स्वर्गात असल्याचा भास होतो . अनुभवतो.
   आता पहाना! ..मुलाने सुंदर  बंगला घेतला .आईबाबांच्या समृद्धीत , स्वकर्तृत्वाने सन्मार्गे वाढ करित आहे .त्या आईवडीलांना स्वर्ग  सुखच लाभते. रोजचा दिवस स्वर्ग  सुखात अनुभवतात. म्हणजेच समाधानात आनंद ...आनंदात सुख ...सुखात स्वर्ग असतो. 

      
वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

आनंदाचे क्षण

मनातली काव्य अक्षरे
काव्य लेखन उपक्रम
विषय - आनंदाचे क्षण

आनंद भरलाय  चौहीकडे
निसर्ग  आनंद लुटत असे
हळुच उमलले पहा फूल 
  मोदे   हसूनी  पहातसे

होता उषा किलबिलती
घाव घेती नभात पक्षी
मस्त सुरात गाती किती
नभांगणी दिसे सुंदर  नक्षी

सकाळ होता घेता दर्शन 
पहा विठुचे हास्य वदन
मिळे आनंदाचा क्षण
करता वंदन जावे शरण

मिळालेले यशाचे क्षण
देती मनास हर्ष  क्षणभर
 असता मनी समाधान
दिसे आनंदी  क्षण भरभर

वसतो आनंद मनात
शोधुनी काढा निवांतात
मिळतील आनंदाचे क्षण
करिता उजळणी एकांतात

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

श्रावण हिरवा

श्रावण हिरवा

बरसल्या जल धारा
वसुंधरा  बहरली
रानफुले उमलली
तृणांकुरे अंकुरली         1


साज नवाच धरेला
रंग दिसेची हिरवा
पाचू  भासे पसरला
ऋतू  म्हणती बरवा            2

पहा रुपवती धरा
शोभे हरित कंकण
लाल पीत सुमनांचे
केले खड्यांनी गुंफण


कधी पडे रिमझिम 
पहा झिम्माड पाऊस 
नद्या  वाहे खळखळ
भिजण्याची संपे हौस                3


कड्यातून वाही झरे
भासे शुभ्र  दुग्ध धारा
हास्य लोभस निसर्ग 
गीत गाई  मंद वारा                   4

येता श्रावण बरसे
रिमझिम जलधारा
सरी वर सरी येती
थंड गार झोंबे वारा                    5

रुप पहा वसुधेचे
कसे दिसे मनोहर
जणू हिरवे गालिचे 
भासे सर्वत्र  सुंदर                     6

काव्य स्पंदन राज्यास्तरीय 02 साप्ताहिक काव्य लेखन स्पर्धा षडाक्षरी रचना विषय - आला श्रावण मास 
 *ऋतु हिरवा* 

धारा बरसल्या 
 धरा अंकुरली 
येताची श्रावण 
मन आनंदली 

 सरी वर सरी
 बरसती धारा
 आला तो श्रावण
 थंड झोंबे वारा 

 क्षणी बरसून 
खेळआदित्याचा
 दिन तो उन्हाचा 
पुन्हा पावसाचा 

 कड्यातून झरे 
भासे दुग्ध धारा 
लोभस निसर्ग 
 गाणे गातो वारा 

 महिना असतो 
सणांचा श्रावण 
आप्तजन भेटी 
मनाला भावन

 मनात भरतो 
ऋतु तो हिरवा
 सृजन धरेचा
 सदैव बरवा 


 वैशाली वर्तक अहमदाबाद

निसर्ग गातो गाणी

निसर्ग  गातो गाणी

निसर्ग  तर आहेच गुरु
तोच शिकवितो सर्व  काही
 पंचतत्वाने तयार निसर्ग 
असती तेची गाती बोलती 

पंचतत्वांनी बनले निसर्ग 
तेच सांगे बोले गाई गाणी
हर हलचालीत असे लय
मंजुळ झुळुझुळु वाहे पाणी


गर्जत बरसती  जलधारा
गातो पाउस मल्हार  रागात
दामीनी दावी चमकून नृत्य 
शीळ घालीत फिरे वारा वनात


होता उषःकाल  येते कानी
मधुर  सुरात पक्षाची वाणी
मंद  सुमनांचा गंध दरवळे
हसूनी डौलती गाती गाणी

भरलाय सारा निसर्ग  असा
सुंदर  चित्रकार आहेच बरा
गाणी गातो शिकवितो आपणा
निसर्गाच आहे शिक्षक  खरा


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, १ ऑगस्ट, २०२१

वृत्तपत्र

शब्दसेतू साहित्य  मंच  आयोजित स्पर्धेसाठी
विषय -- वृत्तपत्र
मुक्तछंद
   *जन जागृती माध्यम*

होते मत   लोकमान्यांचे
जन हीच  आहे मोठी शक्ती
मिळविण्या देशाचे स्वातंत्र्य 
जन जागृती हीच नामी युक्ती.

जन संघटित  करण्या
केसरी मराठा वृत्त पत्रे
सुरु केलीत टिळकांनी 
मांडण्या स्वतःची  मते

 राजकीय  स्वातंत्र्य प्राप्तीची
मते प्रदर्शित करी पेपरात
खळबळ जनक अग्रलेख
छापून येती जनतेच्या हातात

स्वातंत्र्य  हा जन्म सिध्द  हक्क 
ठणकावून सांगितले कोर्टात 
कळले सामान्य  जनतेला
होता प्रसिध्द  वर्तमान पत्रात

 वृत्तपत्र   समाजाचा आरसा
  चालणा-या  दावीतो घडामोडी
आणतो प्रजेच्या दृष्टीत
जनास रसप्रद बातम्यात  गोडी

वैशाली वर्तक
अहमदाबाद







माझी लेखणीसाहित्य मंच शहापूर  जिल्हा ठाणे
विषय -- वृत्तपत्रे 
   *जन जागृती माध्यम*

  असे उत्तम माध्यम 
  जन जागृती करण्या
  येते लेखणी सदा कामी
  मत आपली मांडण्या

होते मत  स्वातंत्र्य  वीरांचे
जन हीच  आहे मोठी शक्ती
मिळविण्या देशाचे स्वातंत्र्य 
जन जागृती हीच नामी युक्ती.

जन संघटित  करण्या
केसरी मराठा वृत्त पत्रे
सुरु केलीत टिळकांनी 
मांडण्या स्वतःची  मते

 राजकीय  स्वातंत्र्य प्राप्तीची
मते प्रदर्शित करी पेपरात
खळबळ जनक अग्रलेख
छापून येईत जनतेच्या हातात

स्वातंत्र्य  हा जन्म सिध्द  हक्क 
ठणकावून सांगितले कोर्टात 
कळले सामान्य  जनतेला
होता प्रसिध्द  वर्तमान पत्रात

 वृत्तपत्र   समाजाचा आरसा
  चालणा-या  दावीतो घडामोडी
आणतो प्रजेच्या दृष्टीत
जनास रसप्रद बातम्यात  गोडी

वैशाली वर्तक
अहमदाबाद







 

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...