सावली प्रकाशन समुह आयोजित
झटपट अष्टाक्षरी काव्यलेखन स्पर्धा
विषय - हर हर महादेव
अष्टाक्षरी
भोळा सांब सदाशिव
तव नामाचा गजर
ओम नमःशिवाय चा
चाले मुखी निरंतर 1
कैलासीचा असे राणा
जटा गंगा तोची धारी
उमा पती सदाशिव
भव ताप दुःख हारी 2
गौरी हर महादेव
असे दयेचा सागर
तव नामात सा-यांना
मिळे सुखाची घागर 3
गौरी उमा महेश्वरा
सदा त्रिशुळ धारक
येता संकटात भक्त
तूची तयांचा तारक 4
आला धावुनी मंथनी
विष तूची प्राशियले
कंठ तुझा होता नीळ
नीलकंठ नाम झाले 5
वैशाली वर्तक
अहमदाबाद
शब्दरजनी साहित्य समूह आयोजित
राज्य स्तरिय समूह महास्पर्धा
अभंग रचना
विषय - शिवस्तुती
*महादेव*
पार्वतीच्या नाथा। गळा शुभ्र माळा ।
विषे कंठ काळा । नीळकंठ ।। 1
विभुती अंगासी । विष अंगीकारी ।
जटा गंगाधारी । तूची देवा ।। 2
होताची कोपीष्ट । तांडव ते नृत्य ।
कलेत ते स्तुत्य । तुझे देवा ।। 3
बारा ज्योतीर्लींगी । तुझा असे वास ।
दर्शनाची आस । मनोमनी ।। 4
भोळा शिव सांब । नामाचा गजर ।
चाले निरंतर । सदाशिवा।। 5
अर्धनटनारी । रुप नटेश्वरा ।
तुझे विश्वंभरा । पहातसे ।। 6
शिवलीलामृत । पोथीचे स्मरण ।
करीती वाचन । पुण्यभावे ।। 7
अहमदाबाद
अ भा म सा प स्वप्नगंध समूह
उपक्रम 19 षडाक्षरी
विषय -- गौरी हर शिव
*भोळा सदाशिव*
भोळा सदाशिव
नामाचा गजर
मुखी शिव नाम
चाले निरंतर 1
गौरी हर शिव
दयेचा सागर
तव नामातच
सुखाची घागर 2
अर्ध नटनारी
रुप नटेश्वरा
गौरी हर शिवा
तुझे विश्वंभरा 3
कैलासीचा राणा
जटा गंगाधारी
उमा शिव पती
भव दुःख हारी 4
समुद्र मंथनी
विष प्राशियले
नीलकंठ नाम
प्रसिध्द जाहले 5
गौरी हर शिव
त्रिशुळ धारक
तूची संकटात
भक्तांचा तारक
वैशाली वर्तक