शनिवार, २५ एप्रिल, २०२०

अष्टाक्षरी..हा समुद्र किनारा. /मुक्तछंद

उपक्रम
निसर्ग कविता

विषय - किनारा
      
      *सागरी किनारा*
 वाटे सदा ओळखीचा
जणु साथी जीवनाचा
जाता क्षणैक जवळी
मिळे आनंद मनाचा

किती भव्य रुप तुझे
वाटे पहात बसावे
  मनी  उठती तरंग
मन हलके करावे.

पहा आली भेटण्यास
लाट किती उफाळून
 भेटताच किनाऱ्याला
 विरतेच ती लाजून

  वाटे पहात रहावे
तुझा चालणारा खेळ
मन  होई प्रफुल्लित
 मजेतच जाई वेळ

धन्यता वाटे विधात्याची
धरा  पहा रमणीय
कुठे नदी, दरी,गिरी
किनाराही शोभनीय

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



माझी  लेखणी

विषय -

*मी लाट सागराची*


   *लाट बोले*


लाट पहा सागराची

आली कशी उफाळून

आस मनी किना-याची

विरली मी किनारा पाहून


 *मी लाट सागराची*

 शंखमोती घेते सोबत 

देते पसरून तटाला

हेच काम चाले अविरत


किना-यास भेटण्यास 

मन माझे सदैव आतुर

पण भेटताचा किनारा

लाजून होते मी चूरचूर


लागतो जन मनास 

मला पाहण्याचा छंद

कितीदा पाहूनीही मज

पाहण्यात होती धुंद


जशी येते उफाळून मी

देते मनास उभारी

उठा झटकून मरगळ

घ्यावी जीवनी भरारी


मी  लाट सागराची

नित्य  चाले माझा खेळ

 किनारा सागरी आवडीचा

न उमजे किती गेला वेळ

वैशाली वर्तक

अहमदाबाद


DBA साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र जिल्हा गडचिरोली

आयोजित

उपक्रम 67

विषय ...तो सागरी किनारा ( मुक्तछंद)


          *सागरी किनारा* 


बसले होते सागर किनारी

पहात खेळ लाटांचा

पाठोपाठ येती उसळूनी

किती अधीर होत्या

भेटण्या किन-यास.

जशी येते लाट उफाळून

देते मनाला उभारी 

जणू सांगे उठा 

झटकून मरगळ सारी

घेण्याजीवनात भरारी.


येते लाट अधीरतेने भेटण्या

तिच्या आवडीच्या किना-यास.

पण पहा कशी लाजूनी

झाली  लाट चूर चूर

पाहताच ती किना-यास


किनारा हा आवडीचा

वाटे जणू साथी

सर्वांना जीवनाचा 

किती वेळ बसता

आनंद देतो मनाला.

प्रेमी युगुल रमती

याच्या समवेत किती काळ

स्वप्ने किती रंगवती

बसून त्या समीप.

लहान मोठे सारेची

येती सागर किनारी

होऊन उल्हासित मने

परतताती स्वगृही.

वैशाली वर्तक

अहमदाबाद

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच सातारा 

आयोजित उपक्रम

विषय... किनारा 


किनारा असे आवडीचा

मनास मिळतो विरंगुळा भारी

असो तो नदी वा सागराचा

वेळ जातो सहजची किनारी


पाहूनी सागर किनारा

मत्स बांधवांना मिळे उभारी

सोडुनीया नौका जलात

सागर जली घेतसे भरारी


नदीच्या किनारी सुंदर देऊळ

प्रभात समयीची ऐकून भुपाळी

सकाळ सांजवेळी येती जन

वाटे ऐकत बसावे सकाळी सकाळी 


जाता काळ पुढे पुढे

येता समय जीवन सांजेचा

जीवन नौका किनारी लावण्या

जन आक्रमती मार्ग भक्तीचा


वैशाली वर्तक

अहमदाबाद



किनारा

      

      *सागरी किनारा*


काळेकुट्ट काळेभोर 

नभ मेघांनी दाटले

गाज ऐकत समुद्राची 

जन किनारी रमले


 वाटे सदा ओळखीचा

जणु साथी जीवनाचा

जाता क्षणैक जवळी

मिळे आनंद मनाचा


रूप भव्य  सागराचे

वाटे पहात बसावे

  मनी  उठती तरंग

मन हलके करावे.


बसा रेतीत वाळूत  

स्वप्न रंगवू उद्याची

खरी मजा लुटण्यास

नको  आसने खूर्च्यांची 


पहा आली भेटण्यास

लाट किती उफाळून

 भेटताच किनाऱ्याला

 विरतेच ती लाजून


 वाटे पहात रहावे

तुझा चालणारा खेळ

मन  होई प्रफुल्लित

 मजेतच जाई वेळ


धन्यता वाटे विधात्याची

धरा  पहा रमणीय

कुठे नदी, दरी,गिरी

किनाराही शोभनीय


वैशाली वर्तक


मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

वैशाख वणवा


उपक्रम
आठोळी
विषय - * *वैशाख वणवा**

पेटला वैशाख वणवा
लाही लाही जीवाला
नको वाटे तप्त झळा
नसे गारवा तन मनाला

तप्त झळा उन्हाच्या
जीव होई घाबरा
जणू चमती काजवे
 जाणे बाहेर आवरा

वैशाली वर्तक.


सोमवार, २० एप्रिल, २०२०

गीत ..जाग जागली ही प्रभा

प्रेमाची अक्षरे समूह
भावगीत स्पर्धे साठी
विषय - जाग जागली ही प्रभा

      दूर जाहला तम निशेचा जाग जागली ही प्रभा,
      उठा हो सकळ जना, मंदीरी भक्तांची भरे सभा. ....धृवपद

   उमलल्या कळ्या आशारुपी वेलीवर सकाळी
   किलबिल खगांची भासते जणु गोड भुपाळी
   वनोवनी विहरतील पहा विहंग आता नभा
   उठा हो सकळ जना, मंदिरी भक्तांची भरे सभा.....1

   करुनी सडा रांगोळी लावियले दीप वृंदावनी
   अर्ध्य दान करण्या उभे जन तयांच्या सदनी
   रवी आगमनाने दिसे न्यारीच सृष्टीची शोभा
   उठा हो सकळ जना मंदिरी भक्तांची भरे सभा

   स्वर्ण रंगात नभी येता ,मिळे जीवन जनांना
   उल्हासित मने जन म्हणती "प्रभात" त्या क्षणांना
   उषःकाल होता नभात पसरल्या सोनेरी आभा
   उठा हो सकळ जना, मंदिरी भक्तांची भरे सभा

वैशाली वर्तक
अहमदाबाद(गुजरात )

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...