क्षणभर म्हणतील हाय हाय
कोरोनाचा लाॕक डाउन चालूच होता. त्यात , कधीची प्रदीर्घ आजाराने आजारी,
असलेल्या अर्जुनभाईंच्या पत्नीला देवाज्ञा झाली. दोन्ही मुले परदेशात त्यामुळे कोणीच मुले जवळ नव्हती. फक्त ते दोघेच. नवरा बायको. अ ssगदी दोन दिवसा नंतर कुकर गॕस शेगडी रीपेआरींग वाला फेरीवाला दारावर आला. नेहमीचा असल्याने , तो येताच अर्जुनभाईंनी बाहेर येऊन त्यास कुकरचा प्रोबलेम सांगून दुरुस्तीस दिला.
खरय . काय करणार जाणारे माणूस जाते. काळ तर पुढे सरकतच असतो. तसेच नित्य गरजापण मानवाच्या चालूच रहाणार. म्हणतात ना
कोणाचे कोणावाचून अडे , सारखा काळ चालला पुढे .
..................................,........
शीर्षक - *रस्त्यावर चा उतारा**
आज दिवाळीचा दिवस होता. नर्क चतुर्थीला घरातून इडा पिडा दूर व्हावी म्हणून संध्याकाळी वडे व इतर खाद्य पदार्थ चार रस्त्यावर ठेवण्याची पध्दत . त्या प्रमाणे एका बाईने ठेवले . बाई ठेवून पुढे जातेय ...तोच फाटक्या कपड्यात दीनवाणी भुकेली मुले नाचत आली व त्यांनी आनंदाने दिवाळीची पर्वणी समजून .. खाण्याची मजा लुटली. व
नाचत पुढच्या चार रस्त्याकडे निघाली.
वैशाली वर्तक
सकाळ
तुझ्या येण्याने आशा रुपी फुले फुलतात .किलबील ती खगांची ऐकू येते. नव चैतन्याचे वारे वहातात. नभी केशराचे सडे पडतात आणि नभातले तारे मंदावतात. . जन तुला अर्ध्य देण्यास आतुरतेने वाट पहातात. . आणि फाकलेल्या शलांकाना, किरणांना पाहून प्रसन्नता मिळते. .आणि तुझ्या आगमनाने जन प्रफुल्लित होऊन म्हणतात, चला *सकाळ* झाली.
वैशाली वर्तक
अभा म सा प समूह 2
अलक लेखन
विषय - गजरे
फुलांच्या बाजारात फुलांचा ढीग होता . सारी फुले सुगंधी ताजी तवानी होती. गज-यात गुंफली जात होती. एकमेकांशी मुक संवाद करत होती. काय माहीत कुठे आज सेवा देण्याचे काम मिळणार ?
खर आहे .. सेवा करण्या साठी जन्मलोय..
मग लग्नमंडप ....देवालयात. देवाच्या शिरी वा चरणी..वा मृत्यू शैय्येवर का असो मधुचंद्राची शैय्या..
दैव जाणिले कुणी ?
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कल्याण डोंबिवली महानगर
17/2/22
आयोजित
उपक्रम
अलक लेखन
बचत
आजचा सुविचार चिंगीने वाचला. थेंबे थेंबे तळे साचे . शाळेतून घरी येताच , गल्ल्यात रोजचा रुपया/ दोन रुपये टाकून गल्ला भरल्यावर... चिंगी आईला म्हणाली , हे बघ, आई!
मी खाऊच्या पैशातून बचत केली. आता तू त्यातून बांगड्या आण.तुझ्याच आवडीच्या.
मला सुविचार पूर्ण समजला ना आई ?..
वैशाली वर्तक
अहमदाबाद
मनस्पर्शी साहित्य समूह
अलक
शीर्षक - *रस्त्यावर चा उतारा**
दिवाळीच्या दिवशी नर्क चतुर्थीला घरातून इडा पिडा दूर व्हावी म्हणून संध्याकाळी , वडे व इतर खाद्य पदार्थ घेऊन ते पदार्थ घराला वा घरावरून ओवाळून..चार रस्त्यावर ठेवण्याची पध्दत .
त्या पद्धती प्रमाणे एका बाईने उतारा आणून ठेवला.
बाई ठेवून पुढे जातेय ...तोच फाटक्या कपड्यात.. दीनवाणी भुकेली, मुले नाचत आली व त्यांनी आनंदाने दिवाळीची पर्वणी समजून , त्या उता- यातील जिन्नसांवर ताव मारला.. खाण्याची मजा लुटली. आsssणि
नाचत पुढच्या चार रस्त्याकडे निघाली.
वैशाली वर्तक .
अहमदाबाद
.
अभामसाप मध्य मुंबई समुह १
अलक लेखन
संस्कार
बाहेर गावाहून आली सुट्टीत मुले.. त्यांच्या घरात आहेत.. आजी आजोबा.. जे देती नियमीत वळण व करीतात संस्कार नातवंडावर.सहज अंगवळी पडलेल्या... बालकांवर चांगल्या सवयी दिसल्या लहान मुलांच्या वर्तनात.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
अभा म सा प समूह 2
उपक्रम 405
अलक लेखन *परकी*
विषय -परकी
मुलगी स्वतः चे घर सोडून येते सासरी ..तनामनाने स्विकारते
सासर .. होते ती सासरमय मनाने. पण जरा काही होता चूक
सासरचे म्हणतात , " सून भले झाली पण परक्या घरची ना. "
त्यावेळी मनास वाटते एवढे करून मी परकी.... ...?
वैशाली वर्तक
अहमदाबाद
मनस्पर्शी साहित्य परिवारातर्फे भाऊबीजेच्या पावन मुहूर्तावर विशेष अलक उपक्रम
बहिणीची माया
सहज भाऊ बहिण वहीनी व बाकी
कुटुंबी जन फिरायला गेले होते.भावाला
ठोकर लागली धणाधणा पायातून रक्त वाहू लागले .बहिणीने न विचार करता नवीन घेतलेल्या साडीला फाडून
जखमेवर बांधूली. डॉ.कडे पोहचे पर्यंत
रक्तस्त्राव थांबविण्यात कोरी साडी फाडली. भाऊ -बहिणी दोघांची
आर्थिक स्थिती बेताचीच होती
पण बंधुप्रेम जास्त महत्वाचे.
बहिणीची वेडी माया
वैशाली वर्तक
अहमदाबाद
अलक
विषय.. होळी
झाडे कापून , वनश्रीचा -हास करून वा कोणाची जळणाची चोरलेल्या लाकडांची ...मोठ्ठी होळी पेटविण्याचा आनंद मानणे त्या पेक्षा
शिशिर ऋतूत पडलेला पानगळीचा कचरा जाळून.. पर्यावरणाची काळजी घेत, वसुंधरेला स्वच्छ करत ..वाईट दुष्ट विचारांचे दहन करणे,अंधश्रद्धेच्या विचारांचे दहन करणे. हीच
खरी सात्विक होळी आहे.चला तर प्रज्वलित करु अशी होळी.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
(गुजरात)