लालित्य नक्षत्र वेल
आयोजित उपक्रम
काव्य लेखन 13/7/22
अष्टाक्षरी
विषय - गुरु कल्पतरू
गुरु शब्द उच्चारिता
आई असे आद्य गुरू
जिचे बोट धरुनिया
शिक्षणाचे धडे सुरु
गुरू कल्पतरू बाप
आईसंगे शिकवण
दिले ज्ञान जगताचे
करु दोघांचे स्मरण
विद्या दिली शिक्षकांनी
केले तेजस्वी जीवन
गुरु कल्पतरु रुपे
स्मरू ऋण मनोमन
देतो रोज शिकवण
गुरु निसर्ग महान
उपकार त्याचे फार
नकळत देई ज्ञान
साधा लहान किटक
देई चिकाटीचे ज्ञान
मोठा छोटा ज्ञानदानी
ह्याची हवी सदा जाण
वैशाली वर्तक
अहमदाबाद
भा सा व सां मंच गडचिरोली
तथा फ्रिडम स्टोरी
आयोजित
काव्य लेखन स्पर्धा
क्रमांक ८
विषय - गुरुवर्य
शीर्षक *गुरुमहिमा*
जीवनात गुरुवर्य हवाच
आई असेची प्रथम गुरु
बोट धरुनिया उभी करे
जीवनाचे शिक्षण सुरु
गुरु उपदेशा विणा
ज्ञान मिळणे कठीण
तेची करीती मार्गदर्शन
काम न भासे नवीन
गुरु परंपरा ही रीत
जुनी आलेली चालत
देती ज्ञान अनुभवाने
उठता बसता बोलत
गुरु महिमा अपरंपार
देती जीवनास आकार
गुरु कृपा योग जुळता
जीवनास भक्कम आधार
स्मरावे ऋण जीवनी
गुरु कृपेचे महत्त्व जीवनी
सदा वंदनीय गुरुवर्य
जाणा उपकार मनोमनी
वैशाली वर्तक
अहमदाबाद13/7/22
शब्दसेतू साहित्य मंच पुणे
आयोजित मासिक काव्य लेख स्पर्धा
स्पर्धेसाठी
विषय - गुरुकृपा योग
*गुरू पाठीराखा*
येताची जुळूनी ।
गुरू कृपा योग ।।
तो असे सुयोग
जीवनात ।। १
गुरू कृपा योगे ।
तरले तरले ।।
आता उध्दरले ।
जीवनात ।। २
कृपेचा तो योग ।
येताची जुळूनी ।।
कृपा ती पाहूनी ।
मोद वाटे ।। ३
लाभताची गुरू ।
ज्ञान संपादन ।।
दुःख निवारण ।
होत गेले ।। ४
गुरूच्या कृपेने ।
मार्ग तो सुलभ ।।
शंकेचे मळभ ।
नसे मनी ।। ५
सद्गुरू विणा ।
नसेची उध्दार ।।
ज्ञानाचा सागर ।
असे गुरू ।। ६
करा कृपा आता ।
आम्हांसी रक्षावे।।
दुःख ते हरावे !।
दुरितांचे ।। ७
सद्गुरू कृपे ।
आनंदी जीवन ।।
तृप्त माझे मन ।
सांगे वैशू ।। ८
वैशाली वर्तक
अहमदाबाद
विषय - गुरु साक्षात परब्रम्ह
गुरु जाणावा
गुरू नसे केवळ व्यक्तीत
वसे तो चराचरात
निसर्ग असे गुरु महान
रोज देई ज्ञान अपार जगात
पशु पक्षी पण देती शिकवण
कळत नकळत मिळे ज्ञान
गुरु तर ज्ञानाचे सागर
नित्य स्मरुनी मनी ठेवूया जाण
वैशाली वर्तक
गुरू विण कोण दाखविल वाट
केले मार्गदर्शन जगताला
व्यासांनी जीवन जगण्याचे
व्यास वा गुरुपौर्णिमेला महत्व
गुरु ना स्मरण वंदन करण्याचे
जीवनात गुरु हवाच
आई असतेच आद्य गुरु
उभी करीते बोट धरुनी
शिक्षणाचे पाठ सुरू
गुरु उपदेशा विणा
ज्ञान मिळवणे कठीण
तेची करीती मार्गदर्शन
काम न भासे नवीन
गुरु परंपरा रीत जूनी
पूर्वकाळात आलेली चालत
गुरू असती ज्ञानाचा झरा
मिळे ज्ञान उठत बोलत
जीवनी गुरू दाखवी वाट
सांदिपनीं गुरू पदी कृष्णास
हिंदवी राज्य स्थापण्यास
रामदास गुरू लाभले शिवबास
गुरु महिमा अपरंपार
देती जीवनास आकार
गुरु कृपा योग जुळता
जीवनास भक्कम आधार
स्मरावे ऋण जीवनी
गुरु कृपेचे महत्त्व जीवनी
आज गुरुपौर्णिमा करु वंदन
मानू उपकार मनोमनी
गुरू विण कोण दाखवील वाट