शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४

ओला चिंब स्पर्श तुझा

ओला चिंब स्पर्श  तुझा

येता मृगाचे तुषार
ओले चिंब झाले मन
आतुरली होती माती
तृप्त झाले कण कण

ओल्या चिंब स्पर्श  तुझा
मृदगंध पसरला
आसमंत सुगंधित
 कोंब  हळू डोकवला

 होता कृपा वरुणाची
 रंग धरेचा हिरवा
ओला चिंब जल स्पर्श
ऋतू म्हणती बरवा


जलधारा बरसता
वृक्ष  वेली प्रफुल्लित
जन मने झाली पहा
 सृष्टी  संगे आनंदित

ओला  चिंब स्पर्शाची
किमयाच  ही आगळी
रंगे रुपे पालटली
वसुंधरा दिसे वेगळी

वैशाली वर्तक 

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

एक पणती सत्कर्माची


 पणती असतेच छोटी

तिचा प्रकाश  असतो मिणमिणता ,

पण प्रकाश दूर सारतो अंधार 

  जो असतो तिमीर. दु:खाचा, अज्ञानाचा

असाच तिमीर दूर सावरण्याचा 

 केला  मी  छोटासा प्रयत्न .

दिवाळीचे दिवस आले जवळ 

दुकाने होती सजलेली  आकर्षक .

घरी फराळाचे  डबे गेले भरले 

आणि मिठाईचे आकर्षक बॉक्स 

पण आलेले ,तसेच आणलेले

रासच्या रास  होते जमलेले.


नरकचतुर्दशीच्या दिवशी 

आटपून अभ्यंगस्नाने

फराळ फटाके यांची  

तयार केली पाकीटे


जाऊन वाटली बाजूच्या वस्ती 

छोट्या मुलांच्या चेहऱ्यावर 

आलेले हास्य आनंद पाहून 

 आनंदले  माझे मन.


मुले धावत घरी जाऊन 

त्यांच्या आईला होती दाखवत 

माझ्याजवळ  तर ,होते रास

तयाचे केले होते वाटप .

पण देवाने दिधले मना समाधान 

अन् सद्बुद्धी , देण्याचा गरजुंना आनंद.


त्यांच्याही कुटीत  रात्री मिणमिणली

पणती पाहून मी संतोषले मनी.


मग गेले राऊळी प्रसन्न मनाने 

धरले चरण भगवंताचे.

नित्य दे अशीच सुबुद्धी 

ज्योत प्रज्वलित करण्याची 

सत्कर्माची मज वेळोवळी.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४

रांगोळी

अ भा ठाणे जिल्हा  समूह १
आयोजित 
उपक्रम
विषय - रांगोळी

दिसे  दारात शोभिवंत
संस्कृतीतील पारंपारिक 
चालत आलेली रांगोळी 
दिसे रुप मांगलिक

दारी काढतात रांगोळी 
 सकाळ  होता अंगणी
प्रसन्न वातावरण घरातूनी
 सजली रांगोळी वृंदावनी

रांगोळी  सणासुदीला
दिवाळीला होई आठवण
 काढतात रांगोळी  कलात्मक 
सप्त रंगाची उधळण

रांगोळी  काढणे असे कला
हुबेहूब  दाविती प्रसंग 
करिती कलेचे प्रदर्शन 
 पाहून मन होई दंग


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...