साहित्य सेवा प्रज्ञा मुंबई पुणे मंच
उपक्रम -- चित्र काव्य
अष्टाक्षरी रचना
शीर्षक-- लोभस निसर्ग
रुक्ष धरा येता वर्षा
पहा कशी बहरली
ओली चिंब झाली धरा
तृणांकुरे अंकुरली
रुप पहा वसुधेचे
कसे झाले मनोहर
जणू हिरवे गालिचे
भासे सर्वत्र सुंदर
चिंब भिजली अवनी
हिरवळ चहुकडे
मोह न आवरे मनी
वाटे पाहू कुणीकडे
रान माळ हिरवट
वृक्ष वेली बहरल्या
रंग एकच धरेचा
भासे पाचू पसरला
झरे वाही खळखळ
भासे शुभ्र दुग्ध धारा
हास्य लोभस निसर्ग
गीत गाई थंड वारा.
प्रेमाची अक्षरे आयोजित
विषय - चित्र काव्य अष्टाक्षरी
*लोभस निसर्ग*
रुप पहा वसुधेचे
कसे दिसे मनोहर
जणू हिरवे गालिचे
भासे सर्वत्र सुंदर
बहरली रानफुले
हिरवट पातीवर
जणु तारे चमकते
उतरले भुमीवर
कड्यातून वाही झरे
भासे शुभ्र दुग्ध धारा
हास्य लोभस निसर्ग
गीत गाई मंद वारा
झाली भर सौंदर्यात
दिसे इंद्रधनु मागे
दावी अवनी नभीचे
जणु प्रीतीचे ते धागे
पानोपाने बहरली
आल्या वेली बहरुन
रवीराज पाही खेळ
अवनीचा नभातून
किती रम्य मनोहर
निसर्गाची कलाकृती
पाहूनिया क्षणभर
कर आपुले जुळती
वैशाली वर्तक
अहमदाबाद
उपक्रम
विषय- लोभस हास्य निसर्गाचे
होता आगमन रवीचे
सृष्टी पहा कशी खुलली
किती रम्य निसर्ग सोहळा
उषा अलवार हासली
सोनसळी किरणांनी
पूर्व दिशा उजळली
पीत केशरी रंगाची
उधळण नभी जाहली
मंद पवन सभोवती
सुखद क्षण सकाळचे
फुले डौलती चोहीकडे
लोभस हास्य निसर्गाचे
दव बिंदू पानातूनी
भासे मोतियांची माळ
वाटे विखुरले मोती
न्हाली दवात सकाळ
भासे नभीचे चांदणे
भुमीवरी विसावले
कळ्या उमलूनी फुले
लोभस रंगी बहरले
खरा तूची चित्रकार
काय असे स्वर्ग वेगळा
लोभस सोहळा सृष्टीचा
दावितोस रोज आगळा
वैशाली वर्तक
निसर्ग सौंदर्य
रुप पहा वसुधेचे
कसे दिसे मनोहर
जणू हिरवे गालिचे
भासे सर्वत्र सुंदर
बहरली रानफुले
हिरवट पातीवर
जणु तारे चमकते
उतरले भुमीवर
कड्यातून वाही झरे
भासे शुभ्र दुग्ध धारा
हास्य लोभस निसर्ग
गीत गाई मंद वारा
झाली भर सौंदयात
दिसे इंद्रधनु मागे
दावी अवनी नभीचे
जणु प्रीतीचे ते धागे
पानोपाने बहरली
आल्या वेली बहरुन
रवीराज पाही खेळ
अवनीचा नभातून
किती रम्य मनोहर
निसर्गाची कलाकृती
पाहूनिया क्षणभर
कर आपुले जुळती
वैशाली वर्तक