शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४

पंचाक्षरी मनोमिलन

ArLiEn ka मराठी प्रेरणा प्रतिष्ठान 
दैनिक उपक्रम क्रमांक 92
पंचाक्षरी
विषय .. मनोमिलन 

भेट होतसे 
 ती वारंवार 
 तयात भाव
  ते निर्विकार      

नसे भेटण्या
काहीच अर्थ
मनो मिलन
 वीणा ते व्यर्थ


वाद संवाद
भेट जाहली
मत प्रदान 
मने जुळली

बरे वाटते
मनाजोगते 
बोलणे होते
अर्थ साधते 

अशी असते
 भेटीची मजा 
  नाही वाटत
कधीच सजा


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०२४

पावसाळा

 श्रावणधारा                                             

           गुजरातचा पाऊस फारच लहरी, मृग नक्षत्राची ७ जून तारीख सरून  गेली  तरी पावसाला त्याच्या येण्याची फिकीरच नसते. अहो ! 7 जून काय ? 7 जूलै झाली तरी कित्येकदा पत्ता च नसतो .तसा वळवाचा, गारांचा पाऊस पडून जातो म्हणा कधीतरी.   

         पण , साधारण पणे , श्रावण मासात सर्वत्रच सरीवर सरी पावसाच्या येऊ लागतात.  आषाढातील पावसाने सृष्टी हिरवळी जाते  . ग्रीष्माने, आलेले सुकेपण, रुक्ष पण ,निस्तेजता जाऊन  पावसाच्या आगमनाने सृष्टी कशी तरारलेली असते. हिरवागार शालू नेसल्यागत दिसते.आणि कुसुमाग्रजांच्या कविते प्रमाणे ,"हसरा नाचरा जरासा लाज-या " श्रावणात तर, निसर्गाचा एकच रंग दिसतो तो म्हणजे हिरवा आणि म्हणूनच तर ऋतू हिरवा म्हणून संबोधला जातो. झाडे स्वच्छ धुतली गेल्याने मस्त हिरवीगार दिसतात. आपण आपल्या घरच्या रोपांना ,झाडांना  कितीही पाणी घाला ,पण नैसर्गिक पावसाच्या पाण्याची त्याला सर येत नाही.    

         पण ,खर सांगू ? मला तर या श्रावण सरींचे वा पावसाळ्याचे जराही कौतुक नाही. तुम्ही म्हणाल काय अरसिक बाईआहे. अहो! पण आमच्या  सोसायटीत की नाही पाणी भरते .बाहेरचे रस्त्यावर चे पाणी आत येते. जरा 2/4 इंच पाऊस पडला की झाsssले. जरा कुठे पावसाचा आनंद लूटत असता बाहेरचे पाणी आत येऊ लागले  की पावसाची मजा  जाऊन टेंssशन मात्र वाढते . कवितेतून ,पुस्तकातून, साहित्यातून, कवी मनातून श्रावणसरींची किssती कौतुक वाचलीत  तरी प्रत्यक्षात पाऊस , पाऊसानंतर पाणी तुंबणे , घरात तर पाणी येणार नाही ना याची धास्ती.व घरात पावसाच्या पाण्याने येणारी  ओल या सर्व गोष्टीेंमुळे  पावसाचे येणे, म्हणजे दडपणच  वाढविते.   

        नुसते काळ्या ढगांनी भरून आलेले आभाळ, ढगांचा कडकडाट , थंडगार वारे , ओल्या मातीचा  सुगंध हे सारेssसारे काही सुखद वाटते. अशावेळी की नाही, घराबाहेर मागच्या  अंगणात  वा पुढे झोपाळ्यावर , ओट्याच्या कट्टयावर वा  बाल्कनीत  बसून, हातात मस्त  वाफाळलेला कॉफीचा कप तसेच जोडीला टॕब वा मोबाईल घेऊन   whatsapp चे msgs वाचीत बसावे व त्या वातावरणाचा उपभोग  वा मजा   लुटत बसावे अशी तीव्र ईच्छा होते.पण जर, मेघराज गर्जना करत बरसायला लागले व पाऊस वाढला व बाहेरचे पाणी सोसायाटीत घुसू लागले  तर या श्रावण सरी ज्यांचे आपण आता गुणगान करतोय ना ,त्यांचा  जोर वाढला तर , "देवा बस कर रे बाबा हा पाऊस, आवर घाल या श्रावण सरींना. नको हा पाऊस ." असे विचार  मनात येतात आणि त्या वाढत्या पावसाने पाणी घरात  येईल  तर ? या विचाराने जीवाची घालमेल सुरू होते.        

        तसे तर जून महिन्यातच घराच्या entance ला भिंत घातली जातेच.लहान रांगतीमुले घराबाहेर जाऊ नयेत म्हणून भिंत घालतात ना?तशी .बाहेरचे पाणी आत येऊ नये म्हणून सोय करण्यात येतेच .       

         बर हा  पाऊस दिवसा असेल तर ठीक. आणि जरी ही दिवासा पाऊस असला व वाढला की लगेच मुलाचा , सुनेचा  आॕफीस मधून फोन खण-खणणू लागतात, "आई, येथे पाऊस फार आहे .आपल्याकडे कसाकाय? पाणीतर भरू लागले  नाही ना? " एवढेच काय माझ्या इंजीनीअर मुलाने तर बाथरूमला खास दट्टे बनवून घेतले आहेत . त्या मुळे बाहेरचे पाणी वाढले तरी गटर बॕक मारीत नाहीत.तर सांगयचे की त्यांचे ,मुलांचे  विचारणे सुरू होते दट्टे घट्ट लावलेत का? तपासून पहा  म्हणून. आणि पाऊस रात्री  असेल तर मग काय ? मंगळागौर नसतांना पण जागरण करणे  आलेच. बाहेर व-हांड्यात वारंवार जाऊन, पाणी येऊ लागले का ? पाण्याची लेव्हल वाढत तर नाही ना? सतत पहाणे. चालूच रहाते. धड झोप पण  निवांत मिळत नाही.        


   अरे हो !पाणी भरणे यावरून आठविले . परवा भिशीत ,पुढची भिशी कोणाची  तर ही आपली अपर्णा लगेच म्हणाली, "ए मी आॕगस्ट च्या पुढे भिशी घेईन ह .कारण  माझ्या  flat खाली भरपूर गुडघा भर पाणी जमते , मग कशा येणार तुम्ही  ? या वैशालीचे ठीक आहे येईल दोन चार हात मारत ," त्यावर    वैशाली  तिला म्हणाली ,"तुझे ठीक  आहे ग ,तू वर रहाते.आमचा तळमजला. त्यामुळे  एकदा दोनदा तरी पावसाळ्यात, काश्मिरला न जाताच शिकारात रहाण्याचा अनुभव घेतो.आणि सरी थांबल्या व पाणीओसरले की मग काय ? तळमजला त्यामुळे सर्व जण कामास लागतो.त्या पावासाच्या पाण्याने अंगण , घरासमोर  , मागचे आंगण वगैरे सफाई काम करावे लागते ते वेगळेच. पण काय करणार ?

श्रावण सरी तर  बरसल्याच पाहिजेतच ना!  

      पण, मला काय वाटते ? इंद्राच्या दरबारात एक application च करावी. लिहावे अन् सांगावे की अरे बाबा रोजचा एकच इंच पाऊस पाड म्हणजे पाणी पण जमिनीत मुरेल,व ज्यामुळे बोअरच्या पाण्याचा प्रश्न रहाणार नाही.व महत्त्वाचे श्रावणसरींचा आनंद लुटता येईल आणि असाही गुजरातमधे सरासरी 30 ते 35 इंच पडतो.

 म्हणजे काय? ते मी सांगते माझी आईडिया. लहान पणी आपण पत्त्यांचा पांच/ तीन/ दोन डाव खेळ खेळायचो ना?आठवतो ना? सर्वांना ?

त्यात जेवढे आपल्यास डाव  करावयाचे असायचे तेवढे झाले की म्हणायचो ना? माझे झाले बाबा पोटापाण्या  पुरते डाव. .

तसे इंद्र सरकारला सांगावे  रोज एकच इंच पाऊस पाड.मग श्रावण सरींचा आनंद लुटता येईल मजा घेता येईल . पण  इंद्र दरबार वा सरकार  काय आपली स्टेटबेंकआहे? ठराविक रक्कम प्रमाणे  रोजचा एक इंच पाऊस withdrawalकरता यायला . रोज 1"  पाऊस पाडायला.? 

  तर असे हे रडगाणे आहे. मग सांगा कसा आवडेल पावसाळा.


सजणा सांजवेळी असा....... प्रदीप ला दिलेले पहिले गीत 25/4/20

सजणा सांजवेळी असा
शोधिता प्रीतीला जीव वेडा पिसा


अशा या धुंद दिशा पानोपानी गीत झुले
ह्दयी मोहुनिया गळ्यातून प्रीत फुले
सांगु कुणाला गुज मनीचे
राजसा सांगना धीर राखु (साहु)कसा
                             सजणा सांजवेळी असा

अशी मी रानोवनी वा-यांसंगे भिरभिरते
दिव्यांच्या वाती परी, मनी सदा हुरहूर ते
वाट दिसेना, आसु सरेssना रे
वेळीची धाव रे प्राण जाई असा
                  सजणा सांजवेळी असा
चांदणे मोहरले ,वाटे  ते उन्हा परी
सजली धुंद धरा वाटे भिती ऊरी 
काही कळेना गीत जुळेना रे
पेटता भावना सूर लावू कसा
                 सजणा सांजवेळी असा

रविवार, १८ ऑगस्ट, २०२४

नाते हळवे

नाते हळवे 



येता नारळी पौर्णिमा 
आठवितो बंधु राया
बांधू धागा  विश्वासाचा 
बंधुत्वाची वसे माया



श्रावणाच्या पौर्णिमेला 
दिन रक्षा बंधनाचा
बांधे बहीण भावास
धागा प्रेम रक्षणाचा


राखी बांधता भावास 
जरी असता लहान
उभा राहातो पाठीशी 
प्रेम तयाचे महान


सण  रक्षाबंधनाला
धाव घेई भावापाशी
त्याच्या  प्रेमळ मायेची
नाही तुलना कोणाशी


बहिणीच्या  प्रेमापायी
पहा किती करी माया
सय येता माहेराची
आठवितो भाऊराया


कृष्ण  भाऊ  द्रौपदीचा
पहा कसा  तिच्या पाठी
येता प्रसंग कठीण
राही उभा सदासाठी

नाती हळवी अनेक 
आपल्याला समाजात 
कर्मे करीती प्रेमाने
नात्यांच्या त्या बंधनात 


दिनरात्र सीमेवर
असे सैनिक रक्षक.  
धागा हळव्या नात्याचा 
 आहे देशाचा सेवक

सफाईचा कर्मचारी 
स्वच्छ राखण्या शहर. 
घेतो काळजी जनांची
नाते जपुया सत्वर

स्वप्नातील नव वर्ष

 स्वप्नातील नववर्ष


नववर्ष स्वन्प माझे

रंगविले होते मनांत

कितपत होते  पाहू

साकार ते प्रत्यक्षात


     स्वच्छ  असेल सुंदर 

     देश भारत  महान 

     समानता ही नांदेल 

     नसता कोणी लहान


कळ्यां कधी न खुडता

हाती तयांच्या लेखणी

होई   मुलगी  साक्षर

सावित्री  रूपे देखणी


       वृक्षारोपणाचा नारा

       गाजवूया  या जगती

       पृथ्वी  पाहू नटलेली 

       भासे जणू   रूपवती


    किण किणली ती घंटा

   जागे झाले स्वन्पातूनी

   नाद आला मंद कानी 

   रम्य ते स्वन्प पाहूनी.


          वैशाली वर्तक

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...