कौतुक
सर्वांना आवडे सोहळा कौतुकाचा,
लहानास काय मोठ्यांना पण
वाटे हवा-हवासा .
पडता पहिले पाऊल बालकाचे
असंख्य छायाचित्रे
घेतली जातसे.
अन बोलता बोल बोबडे
ध्वनी अंकित होतात बोल तयाचे.
कौतुक करून घेणे कोणास न आवडे
अहो ! एवढेच काय ,
देवास पण हवीच कीं हो
स्तुती स्तवने.
वाढ -दिवस असो
वा मंगल-कार्ये,
ती तर असती कौतुकाचे सोहळे
सध्याचे युग तर, निव्वळ कौतुकाचे,
पदो-पदी कौतुकच कौतुक नाचे
कौतुक-कौतुक पण, किती करावे?
स्व:ताच्या व्यक्तीचे प्रेम पण
कौतुकाने फेस बुक वर दाखवायचे.
अन किती लाईकस मिळाले ते पहायचे.
व्हॉंट- अप काय,
फेस बुक काय,
मनांत इच्छा असो वा नसो
लाईकस कौतुकाचा मिळणारच देणारच तयास.
करता खाद्य पदार्थ नवा घरात
पहिले प्रसारित होतो व्हॉंट- अप वर खास
नैवेद्या सारखा चित्रित करून
मगच मिळतो
चवीस इतरांस
सोशिअल मिडीयाने
स्थान दिले कौतुकाला
कौतुक सोहळा अतीच फोफावला.
सर्वांना आवडे सोहळा कौतुकाचा,
लहानास काय मोठ्यांना पण
वाटे हवा-हवासा .
पडता पहिले पाऊल बालकाचे
असंख्य छायाचित्रे
घेतली जातसे.
अन बोलता बोल बोबडे
ध्वनी अंकित होतात बोल तयाचे.
कौतुक करून घेणे कोणास न आवडे
अहो ! एवढेच काय ,
देवास पण हवीच कीं हो
स्तुती स्तवने.
वाढ -दिवस असो
वा मंगल-कार्ये,
ती तर असती कौतुकाचे सोहळे
सध्याचे युग तर, निव्वळ कौतुकाचे,
पदो-पदी कौतुकच कौतुक नाचे
कौतुक-कौतुक पण, किती करावे?
स्व:ताच्या व्यक्तीचे प्रेम पण
कौतुकाने फेस बुक वर दाखवायचे.
अन किती लाईकस मिळाले ते पहायचे.
व्हॉंट- अप काय,
फेस बुक काय,
मनांत इच्छा असो वा नसो
लाईकस कौतुकाचा मिळणारच देणारच तयास.
करता खाद्य पदार्थ नवा घरात
पहिले प्रसारित होतो व्हॉंट- अप वर खास
नैवेद्या सारखा चित्रित करून
मगच मिळतो
चवीस इतरांस
सोशिअल मिडीयाने
स्थान दिले कौतुकाला
कौतुक सोहळा अतीच फोफावला.