नाम घ्यावे सदा ,मुखी राघवाचे
करितो सार्थक ,तोची जीवनाचे
लावा तया नामे,अंतरीचा दिवा
क्षालन करण्या, वाईट कर्माचे
भुरळ पाडे ती , षडरिपू जिवा
मनन चिंतन ,करा ईश्वराचे १
बळे बळें चित्त कोठेची रमेना
नामस्मरणात सुख ते मिळाले
उठता मनीं वादळ विचारांचे
मन समाधाने प्रसन्न जहाले. २
मार्गची दिसेना, जीवन तरण्या
मन अडकता , संसार सागरी
विचार छळती सदैव संसारी
कशा मिळतील ,सुखाच्या घागरी
तोची जगी असे, कर्ता करविता
लाभावे भाग्यची ,मज दर्शनाचे
शरणची आले, तुज भगवंता
उजळेल मम ,भाग्य जीवनाचे
स्पर्धेसाठी
मोरणा कार्यशाळा चौकट बद्ध बाराक्षरी उपकाव्य प्रकार
स्पर्धा क्रमांक 1
दि 12/1/24
विषय ... नवीन उभारी
शिर्षक. जीवनी भरारी
उंच नभातला पाहूनी पतंग
मनी देत असे सदैव उमंग
इच्छाशक्ती हवी, मनात यशाची
जीवाला देतसे *नवीन उभारी*
उंच उडणा-या पतंगा सारखे.
पंख पसरूनी घेऊया भरारी
चढाव उतार , येणार जीवनी
सुखाची अपेक्षा नको सदोदित
मन लावुनिया करिता प्रयत्न
उज्वल यश येणारच खचित
वैशाली वर्तक
अहमदाबाद
*स्पर्धेसाठी*
मोरणा कवी कट्टा समूह सांगली पश्चिम महाराष्ट्र
आयोजित
काव्य प्रकार चौकटबध्द बाराक्षरी
विषय ... देशप्रेम
शीर्षक ...बलिदान
देशप्रेम होते ,स्वातंत्र्य वीरांचे. पहा
मोल स्मरुयात ,त्या बलिदानांचे. ....1
स्वतंत्र करण्या ,आपला भारत
अर्पिले जीवन ,उदार होऊन
हसत चढले ,वीर फाशीवर
खंतावते मन ,कधीही स्मरुन.... 2
अशी शूर वीरांची भारतभूमी
स्वर्गाहून प्रिय , ही भारत माता
तिच्या रक्षणार्थ ,सदैव तत्पर
किती मी वर्णावी, तिची गुण गाथा. 3
वैशाली वर्तक
अहमदाबाद