- काव्यांजली स्पर्धेसाठी 2/8/2018
विषय - छंद लेखणीचा
छंद मजला
नसेच ही कसला
फक्त लागला
लेखणीचा
तरी वाटे
कधी न लिहावे
लोळत रहावे
दिवसभरा.
छंद लेखणीचा
जिवास जो आवरेना
स्वस्थ बसवेना
क्षणभरा
उठले त्वरित
कुरवाळले मम लेखणीस
ओसंडलेल्या शब्दास
मनातूनी.
विचारांचा खजिना
करण्यास जो रिक्त
लेखणीच फक्त
सर्वकाळ
गुज अंतरीचे
कसे मांडियले आता
छंद असता
लेखणीचा.
.............. वैशाली वर्तक.
(अहमदाबाद )