सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

पावसाच्या कविता. 1 . नको तो पाऊस

 विषय - विषय -  जा रे जा पावसा

वर्ल्ड व्हिजन पेपरात२९\९\२५


विषय -  जा रे जा पावसा

        
किती  रे बरसणार पावसा
परतीची झाली ना वेळ
बस कर तुझे पडणे
बंद कर बेभवशाचा खेळ.

बळीराजा  होईल नाखुष
अती वर्षावाने आता
मेहनत जाईल वाया
नको करू कष्टी जाता जाता
  
सुरू झाले नवरात्र 
खेळायचाय गरबा रास 
तुझ्या  पडण्याने पहा
मजा येत नाही खास

वेळवर न येता सदा
पळवितो तोंडचे पाणी
आता जायची वेळ झाली
 जाण्यासाठी गाऊ का गाणी ?

जा रे जा  पावसा  आता
आवर  मेघांचा पसारा
पुढल्या वर्षी भेटू  तेव्हा 
दाखव तुझा रंग न्यारा

झालय सर्वत्र  हिरवे गार
नको अती तुझा वर्षाव
रोग राई पसरण्या आधी
बस्तान  गुंडाळण्याचा कर प्रस्ताव


वैशाली वर्तक 
अहमदाबाद


        




        



मौन

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित  काव्य लेखन  विषय .. मौन  मौन पाळणे उत्तम  वाद होतात स्थगित पण सर्वच ठिकाणी    नसे योग्य सदोदित  जेथे निषेध...