रविवार, २२ जून, २०२५

पत्र लेखन विषय सांगायचे राहून गेले

विषय.      सांगावयाचे  राहूनच गेले !


  प्रिय सखी..,
     कशी आहेस.? बरेच दिवसांत काही पत्र नाही ,.तसे ही आता पत्र लेखन काल बाहयच होत आहे . तरी
आपण दोघी मात्र अजून महिना/दीड महीन्यात पत्र लेखन करून यथेच्छ संवाद साधतोच... नाही का ?
काय आहे फोन वर बोलून समाधान मिळते पण तरी लिहून पत्राद्वारे दिलेल्या , मग वाचलेल्या मजकुराची तर आगळीच मजा असते. 
     पत्र कसे! आठवण आली की पुन्हा वाचून रसस्वाद घेता येतो. फोन वर काय फोन ठेवला वा WhatsApp वर बोलणे झाले की संपलं.   लिहायला बसले की विचार सुचतात व इत्यंभूत सविस्तर माहिती देता येते.असो.
      अग मी आज काय  बोलणार होते...म्हणजे तुला लिहीणार होते. ते म्हणजे आमचा दर महिन्याला विविधा नावाचा , आमच्या बायकांचा एक समुह आहेना. तुला माहित आहेच मी बरेचदा तुला त्या बद्दल लिहिले आहे.  दर वेळी वेग वेगळा विषय देतात व त्यावर   सख्या भाष्य करतात .तर यावेळी त्या समूहावर  गंमतीदार विषय होता. *सांगायचे राहून गेले* . अग  मागच्या वेळी मी तुला त्याबद्दल लिहायचे राहूनच गेले. खूप मजा आली .प्रत्येक सखी तिचे तिचे किस्से रंगवू सांगत होती.आता आज तरी मी तुला 
लिहून सांगते .. नाही तर त्या विषया प्रमाणे माझं पण लिहायचे  व तुला सांगावचे राहूनच जाईल.तर मी
अशी सुरुवात केली की,
  आमची एक सखी होती. नाव तिचं निर्मला. निर्मला खूप बोलकी... अगदी अवखळ वहात्या झ-या सारखी बोलणारी .एकदा बोलू लागली की, तिला काय सांगू ?   किती बोलू असे व्हायचे ..अशी बोलक्या स्वभावाची वा  बडबडी .. तिच्या समोरच्या व्यक्तीला नेहमी श्रोताच व्हावे लागते .     
        सहज एकदा,.... एकदा  कसले? तिचे असे  अनेकदा  होते  .मैत्रिणीला वाढदिवसा  निमित्य शुभेच्छा देण्यास फोन केला . समोरचीने फोन उचलला.
   झाsss ले !  "काय ग काय म्हणतेस?बरेच दिवसात फोन नाही .नुसती म्हणतेस  की तुझी आठवण येते. पण कधी फोन करत नाहीस!  का कधी येत नाहीस ! कोठे भेटू म्हंटले तरी  नाही  असे उत्तर असतेच ,  ...असे म्हणत तिने जे  भाष्य  (बोलणे) सुरु केले की , तिच्या सर्व मैत्रिणी, त्यांच्या सासू , त्यांच्या  नातवंडांच्या....इव्हन शेजार पाजा-यांच्याबद्दल गप्पा झाल्या .पण फोन ज्या कारणाने होता ,त्या  बद्दल विषयच नाही .आणि मग गप्पा मारून  फोन ठेवला . थोड्या वेळानंतर लक्षात आले की,"अग बाई ! मी तिला फोन वाढ दिवसा निमित्य शुभेच्छा देण्यास केला होता . आणि ते तर मला सांगावयाचे राहूनच गेले ! मग काय पुन्हा पुन्हा  फोन लावला पण मग मात्र तिचा फोन सतत  व्यस्त येत होता. ..कारण  तिच्या सारख्या  तिच्या मैत्रिणीचे बरेच well wishers  होते ना!

         कित्येकदा असे होते, सांगायचे असते ते राहूनच जाते. हो, ती 'झी मराठी" वरची   " कुंकुं" सिरीअल होती  . जुनी ग ..तिच्यात  नाही का ? जानकीला... हिरोईन ला, तिच्या नव-यास   खूप काही सांगायचं असते , सांगणे सुरुवात करे पर्यंत वेळ जातो .तिच्या आईची तब्बेत ठीक नाही. तिला पैशांची गरज आहे. हे ती नव-यास कधी ची सांगण्याचा प्रयत्न करावयाची ,  पण दर वेळी काही कारणाने सांगावयाचे राहून जावयाचे असो,
  हो ! पण त्यामुळेच तर सिरीअल  लांबते ना ?.व आपणास मनोरंजन मिळते .तेव्हा  अशा व्यक्ति समाजात असतात की मूळ मुद्यावर  येता येत नाही .मग मनात हूर हूर करत बसतात 
       तशीच एक वेडी प्रेयसी ..  प्रेमात वेडी झालेली म्हणून वेडी बर का ! . प्रियकराला रोज भेटत होती .मला तू आवडतोस म्हणून सांगावयाचे रोज नक्की करावयाची , पण रोजच सांगावयाचे राहून जायचे. घरी येऊन  मनाशी म्हणायची , 
    इश्य  बाई ! आज पण नाही जमले. सांगायचे राहूनच गेले .शेवटी .प्रियकर गावीं जाण्यास निघाला  ती स्टेशनवर सोडावयास गेली .तेथे आता.. तरी पटकन बोलावे ना ! पण छे ,शेवटीं गाडीची सुटण्याची वेळ झाली .सिग्नल  मिळाला . ,गाडी हलणार शेवटी हातवारे करून  डम शो मध्ये करतात ना  तसे करून  I love you दाखविले . ठीक झाले ..प्रियकरास भावना तरी  पोहचल्या ..तो म्हणाला हा! हा! भा. पो  म्हणून ठीक झाले.  पूण्याचा कोड वर्ड  
भावना पोहचल्या.चा
आणि    तेव्हा पण तोंडाने सांगावयाचे राहूनच गेले !   
        आपण मंदिरात जातो. तेथे पण  असेच होते .देवाजवळ  काय काय मागावयाचे ते नक्की करतो. हो!   बाई देवच तर हक्काचा आहेना ! ज्याच्या जवळ सर्व मागण्या आपण मागू शकतो. व कुणास पण न  ऐकू येता , मनातील इच्छा प्रगट करू शकतो . पण भक्तिभावाने हात जोडून डोळे मिटून देवाजवळ मागावयास जावे तेवढ्यात ," ए चला पुढे व्हा ,गर्दी करू नका. पुढे  पुढे सरका." म्हणून पुजारी ओरडतो. व देवा समोर  उभे असता पुढे व्हाच्या धक्कयाने  .. दुसऱ्या कोणा व्यक्तीला डोळे
 मिटून हात जोडलेले असतात आणि *सांगावयाचे राहूनच जाते*.
     असो माझ्या सारख्या  बाकीच्या मंडळींना  सांगते, तुम्हास  पण काही सांगावयाचे असेल ते सांगून द्या.  पटपट लिखाण करा .नाही तर  मग मनात हूर हूर राहील की   पण........ सांगावयाचे( लिहावयाचे ) राहूनच गेले.
       असे माझे भाषण मी तुला लिहून कळविले. जे मी पण तुला मागच्या खेपेला लिहायचे राहूनच गेले होते... असो. .
   बरं झाले मराठी संवर्धन मंडळाने हा विषय दिला म्हणून माझे काम झाले.
 असो . 
्तुझ्या सासू बाईं मुले कशीआहेत .आणि तुझा नवरोबा. सारे मजेत आहात ना.
मी व  माझा नवरा मजेत आहोत .नातवंडे व मुलगा सून पण आपापल्या कामात व्यस्त व मस्त आहेत
चल पुन्हा भेट पत्र व्दारे. तोवर तू पण खुश व मस्त रहा.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद .



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...