शनिवार, ४ एप्रिल, २०२०

हरविते तुझ्यात/ बध रेशमाचे/ रेशीम गाठी\ विवाह गाठी

अष्टाक्षरी
विषय - बंध असे रेशमाचे


बंध असे रेशमाचे
प्रेम सदा राखण्याते
दोघांच्याही मनातले
राखू सख्या जीवनाते

सहवास तुझा माझा
प्रीत गंध पसरला
एकमेका देत साथ
संसार ही फुलवला

नाते आता झाले घट्ट
एक झाली दोन मने
वीण विणता प्रेमाची
कधी न वाटले उणे

साथ मिळता तुझीही
स्वर्ग सुख लाभे मला
वीण रेशीम गांठींची
मिळो दिर्घायु तुजला

वाटे सदाची मनात
लागो न दृष्ट नात्याला
बंध रेशमी गाठींना
हीच मागणी देवाला.

वैशाली वर्तक


उपक्रम
विषय - तुझ्यात हरविते मी जेव्हा

नजरेस येता तव मूर्ती
मनास माझ्या  वाटे शांत
विसरून जाते सर्व  काम
न रहाते कशाची भ्रांत

नसता जरी तू जवळ
वाटे नित्य तव भास
रमावे  तुझ्याच विचारात
हाच मनीचा एकची ध्यास

जागे पणी पण मनात
  तव विचारांचेच चालते  मंथन
हरवून जाते तुझ्यात जेव्हा
अविरत करिते तुझेच चिंतन

 वसे ध्यानी मनीं  चित्ती
भासे जळी स्थळी तूची एकमात्र
अशी वेड्या मनाची अवस्था
 हरविता तुझ्यात ,दिसे तुची सर्वत्र

वैशाली वर्तक




अ भा म सा प समूस 2
उपक्रम
विषय - रेशीम गाठी


आयुष्यात जुळतात
 रेशीम गाठी नशिबाने
पण स्वर्गात बांधल्या
असतात त्या देवाने

गाठीं रेशमी  होतात
 करिता तडजोड
सहवासाने   वाढे  प्रेम
संसार होतो गोड

रेशीम गाठी सदा
 एकमेका   देती जिव्हाळा
सुख दुःखात मिळूनी साथ
 भासे न कधी दुःखाचा उन्हाळा 

दोन जीव दोन कुळाचे
बांधले जातात रेशीम गाठींनी
सहजीवन आनंदी करीती 
साथ देत  तडजोडींनी

  सहजीवन सुखी होण्या
  असे   धागा  विश्वासाचा  
  देण्या  सुखाच्या घागरी
  रेशीम गाठीत महत्त्वाचा
  
वैशाली वर्तक 
अहमदाबाद






बालपण........लहानपण देगा देवा

उपक्रम 124
लहानपण देगा देवा

वाटे रहावे सदा लहान
रम्य असते बालपण
इकडून तिकडे बागडावे
चिंतेची सदा बोळवण

खेळ खेळा दिनभराते
सारे मिळेची हातात
लाड होई येता जाता
नसे काळजी मनात

बालपण काळ सुखाचा
काळजी चिंता मोठ्यांना
लहान मात्र  खेळण्यात मग्न
नसे कल्पना लहानांना

जशी पाखरे विहरती
न दिसे चिंता कशाची जया
तसे सदा विहरे बालक
नसे तमा कधी उद्याची तया

उगा घेतले भरपूर आशीष
मिळवण्या हे मोठेपण
दिनरात्र छळे जवाबदारी
वाटे, दे ना देवा परत बालपण.

वैशाली वर्तक   23/3/2020


छत्तीसगुण मीलनी रचना
-----------------------------

उपक्रम 124
लहानपण देगा देवा

वाटते रहावे  लहान
रम्य असते बालपण
सदा बागडत रहावे
चिंतेची सदा बोळवण

खेळ खेळा दिनभराते
सारे मिळणार हातात
लाड करीती येता जाता
नसते काळजी मनात

बालपण काळ सुखाचा
काळजी चिंता  ती मोठ्यांना
बालके खेळण्यात मग्न
नसे कल्पना लहानांना


जशी पाखरे विहरती
नसे चिंता कशाची जया
तैसे  विहरती बालके
नसे तमा कधीच  तया

उगाची घेतले  आशीष
मिळवण्या हे मोठेपण
आता छळे जवाबदारी  
परत देना बालपण

वैशाली वर्तक





रोही पंचाक्षरी समुहातर्फे आयोजित स्पर्धा
विषय - बालपण

बालपण

मन निर्मल
रुप सोज्वळ
बालक देते
मत प्रांजल

लहानपण
नसे मी पण
सदाची वाटे
  मोठे आपण

डाव खेळिता
मस्ती करिता
बाल मनात
नसेची चिंता

खेळ खेळता
जरा लागता
धावत येई
माय ममता

काळ सुखाचा
बालपणाचा
रम्यची भासे
तो आनंदाचा

  रम्यची क्षण
   ते विलक्षण
  आठव येता
  आनंदे मन

  आईचा घास
 तिचाच खास
आठव येता
मन उदास

दे ना रे देवा
करीन सेवा
आठवणींचा
देईन मेवा

वैशाली वर्तक













स्वच्छतेकडून समृद्धी कडे!

उपक्रम
 स्वच्छतेकडून समृध्दीकडे.....
       जेथे स्वच्छता  असते तेथेच लक्ष्मी वास करते,रहाते   असे म्हणतात . म्हणून तर आपल्या संस्कृतीत केरसुणीला लक्ष्मी मानतात. पाय लावत नाही व चुकून  लागला तर लगेच तिजला नमस्कार  करतात. कारण स्वच्छता  करण्याचे वा राखण्याचे एकमेव  तीच साधन आहे. ती घरभर फिरविली की घर कसे स्वच्छ  होते. तर स्वच्छता  करणारी ती लक्ष्मी आहे.
     या  स्वच्छतेचे जीवनात फारच  महत्त्व  आहे.स्वच्छता नसेल तर निरोगी  आरोग्य  रहात नाही. निरोगी  आरोग्य  ही खरी संपदा. व निरोगी  आरोग्यासाठी स्वच्छता राखणे. आपण जेथे रहातो  ते ठिकाण स्वच्छ  असणे अत्यंत  गरजेचे आहे.स्वच्छता असेल तर निरोगी आयुष्य  व निरोगी  सुदृढ  शरीर , तर च माणूस काम करुन धन दौलत  ऐश्वर्य  मिळवू शकतो. तेव्हा स्वच्छता ही लक्ष्मी तसेच सरस्वती संपादन करण्यात महत्त्वाचे पैलू आहेत
        उगीचच का स्वच्छ  भारत सुंदर भारत चे न्यारे लावले जातात. गांधीजीं पण स्वच्छता प्रेमी होते. ते स्वच्छतेचे पुजारी होते. तेच सुत्र सध्या आपले पंत प्रधान नरेंद्रभाई यांनी उचलून घेतले आहे. स्वच्छतेकडे विशेष  लक्ष देत आहेत.
      आपण पहातो परदेशात स्वच्छता ही घराघरातून शिकवली जाते. तेथे शिस्त ता पण असल्याने सार्वजनिक  ठिकाणे  पण स्वच्छ असतात.
   आता आपल्याकडे पण तो कल येत आहे. रेल्वे  स्टेशन सारखी ठिकाण  स्वच्छ ठेवत आहे.  अशी स्वच्छता  असली की निरोगी  निकोप आयुष्य मिळते
मग माणसे धन दौलत कमवून  स्वतः स्वतःची आवक वाढवू शकतात. व जसे प्रत्येकाची income वाढली तर देशाची वाढते व समृद्धी कडे आपोआप पावले पडतात . म्हणून स्वच्छता ही समृध्दी ची आवश्यकता आहे

वेशाली वर्तक

चित्रकाव्यरामाचे

विषय - चित्र काव्य

धनुर्धारी तू पराक्रमी
नीलवर्णी  शांत  मुख
तव नाम स्मरिता रे
मिळे जगी सर्वची सुख

सूर्यवंशाचा कौसल्या नंदन
सर्व साक्षी पुरुषोत्तम गुरुरुपा
उठता बसता करिते चिंतन
 सुख मिळे दशरथ कुलदीपा

शोभे मस्तकी किरीट सुंदर
गळा शोभती फूल हार
तेजोमय मूर्ती  तव
दशरथाचा  तू  सुकुमार

तत्पर तू   सदा प्रजापालक
 तव राज्य होते  रामराज्य
पतित पावन म्हणती तुजला
  हृदयी स्मरणात ते राज्य

तव कृपा प्रसादाने होई
भवसागरी नौका पार
नाम तुझे घेता अधरी
क्षणात मिळे सुख अपार



वैशाली वर्तक

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

मना मनातली गुढी

शब्दरजनी साहित्य  समुह आयोजित
भव्य राज्य स्तरीय काव्य स्पर्धा
क्रमांक 1
विषय-  मना मनातील गुढी
अष्टाक्षरी रचना

आला सण पाडव्याचा
येते मनी रामायण
गाणी रामाची म्हणूनी
करु  त्याचे पारायण

बांधू गुढी उंच नभी
कडुनिंब, गाठी गोड
दावू प्रसाद तियेला
करुनिया गोड धोड

ऋतू वसंतात सृष्टी
बहरली सौंदर्याने
निहाळुया रुप तिचे
स्मरू देवाला नेमाने


सारे बांधव भुमीचे
विश्व बंधु भाव मनी
पाळू, धर्म मानवता
 खरे हे , मर्म जीवनी

गुढी बांधू आरोग्याची
घेवू काळजी स्वतःची
टाळू ठिकाण गर्दीची
साथ पळेल दूरची

वैशाली वर्तक....26/3/2020

सोमवार, ३० मार्च, २०२०

सहाक्षरी. उन्हाचे चटके. मोठेपण सहज मिळत नाही

रचियता समुह उपक्रम
विषय- उन्हाचे चटके

मोठेपण नाही
मिळत सहज
उन्हाचे चटके
सहणे गरज   

कष्ट करताच
मिळे सदा यश
न येई पदरी
कदा अपयश

तव्याचे चटके
सोसतो चाकर
तेव्हाच आपणा
मिळते भाकर

करा परिश्रम
येते अंगी बळ
कष्टाचे चटके
देती गोड फळ

साहुनी चटके
सोने उजळते
रूपाने खुलता
दुकानी सजते

असा हा महिमा
असे तो कष्टाचा
सांगते वैशाली
आहे तो मोलाचा

वैशाली वर्तक

गुढी माणुसकीची/गुढी मांगल्याची.. मना मनातील गुढी प्रेमाची\मराठी नववर्ष \

रचियता साहित्य समुह
मराठी नववर्षा निमित्त
राज्य स्तरीय  काव्य स्पर्धा

विषय -माणुसकीची गुढी उभारु

     माणुसकी दावू एकमेकांना
     विसरुनीया सर्व जाती धर्म
     माणुसकीची गुढी उभारु      माणुसकीची घेउ ध्वजा
      समजून घेउ   जीवनाचे मर्म   

       देवाची सारी बालके मानव
       सर्वची तयास असती समान
       कसा करेल तो दुजाभाव
        मानु नये कोणासही लहान

        सारे बांधवआपण एकमेकांचे
        विश्व बंधुत्वाची भावना जागवुया
          मंत्र  समतेचा सर्वत्र देऊनी
        माणुसकीची ध्वजा फडकवुया

        वैशाली वर्तक
        अहमदाबाद  (गुजराथ )



मोहरली काव्यबत्तीशी साहित्य  समूह आयोजित  
गुढी पाडव्या निमित्त काव्य बत्तीशी काव्य रचना स्पर्धा 
*स्पर्धेसाठी*
विषय -- गुढी उ भारु  मांगल्याची
शीर्षक-  *सण पाडव्याचा*
 सण आला तो पाडव्याचा
उभारायाची  गुढी
उभारु गुढी मांगल्याची
 संस्कृतीची ती रुढी                          1

होतो नव वर्ष आरंभ
गुढी तोरणे बांधू
दावितसे शुभ प्रतीक 
विश्व बंधुत्व साधू                      2

ऋतू  वसंत आगमन
दिसे चैत्र  पालवी
आठवु  राम विजयाला
मनी मोद खुलवी                         3

प्रसंग आहे फार बाका
उजवुया सणाला
आरोग्याची घेत काळजी
पाळत नियमाला                          4

जाणुनिया सण मांगल्य
जपुया परंपरा
*गुढी उभारु मांगल्याची
 सुखी   होईल धरा                           5

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
13/4/2021


*मना मनातील गुढीपाडवा*

आला सण पाडव्याचा
येते मनी  गीतरामायण
गाणी रामाची म्हणूनीया
करुया  त्याचे पारायण

बांधू गुढी उंच नभी
कडुनिंब, गाठी गोड
दावू प्रसाद तियेला
करुनिया गोड धोड

ऋतू वसंतात सृष्टी
बहरली सौंदर्याने
निहाळुया रुप तिचे
स्मरू देवाला नेमाने

सारे बांधव भुमीचे
विश्व बंधु भाव मनी
पाळू, धर्म मानवता
 खरे हे , मर्म जीवनी

गुढी बांधू आरोग्याची
घेवू काळजी स्वतःची
टाळू ठिकाण गर्दीची
महामारी पळेल दूरची


वैशाली वर्तक 
अहमदाबाद






**गुढी प्रेमाची**
  आला सण पाडव्याचा
  लावू गुढी समतेची
  दूर सारु जाती भेद
  **गुढी उभारु प्रेमाची**

   विसरुनी राग द्वेष
  मनी भरु प्रेम भाव
  जसे होते रामराज्यी
   नसे सुखाचा अभाव

   स्वच्छ ठेवण्या भारत
   करु निर्धार मनाचा
  पळवून कोरोनाला
   क्षण आणू आनंदाचा

  बांधू  तोरण आंब्याचे
  दारी रेखुया रांगोळी
  सौख्य नांदो घरोघरी
  काढू शुभेच्छांच्या ओळी.

  जग सुखी सारे होवो
  हेच मागणे देवास
 पूर्ण  होवोत कामना
  दूर कर कोरोनास

  ध्येय ठेवू सदा उंच
  मुखी ठेवूनी गोडवा
  जपू संस्कार संस्कृती 
  आला सण हा पाडवा

 ......वैशाली वर्तक.....23/3/2020
   

अभाम साप ठाणे जिल्हा 2
आयोजित उपक्रम
विषय.. मराठी नववर्ष (गुढीपाडवा)

करू स्वागत नववर्षाचे
बांधू गुढी मांगल्याची
सण आला पाडव्याचा
नव ऊषा आली उत्कर्षाची.

धरा बहरली पाना फुलांनी
दिसे सर्वत्रची हिरवळ
वसंत ऋतू दावी रुप अनोखे
 झटकूया मनीची मरगळ

 विसरुनी राग द्वेष
  मनी भरु प्रेम भाव
  जसे होते रामराज्यी
   नव्हता सुखाचा अभाव..


  बांधू  तोरण आंब्याचे
  दारी रेखुया रांगोळी
  सौख्य नांदो घरोघरी
  काढू शुभेच्छांच्या ओळी.

  जग सुखी सारे होवो
  हेच मागणे देवास
 पूर्ण  होवोत कामना
  लाभो विश्व शांती जगास

  ध्येय ठेवू सदा उंच
  मुखी ठेवूनी गोडवा
  जपू संस्कार संस्कृती 
  आला सण हा पाडवा.

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...