प्रवासी नौका कॅनडा यूएस ची
Canada/ US ची प्रवासी नौका, तयार केली धवल ने,
हळूच प्रवाह पतीत केली, कल्याणी नितीनने
अवीच्या साथीने उलगडली, इतिहासाची पाने वैशुने ,
धवल स्नेही, पाठक कुटूंबियानी, केली मदत मनोमने
शुभदा मनोहर कुटुंबीयांनी, आणली गप्पात रंगत,
घडविले Ottava दर्शन, देवून साथ अन संगत.
खळदकरांनी केली, साथ प्रारंभा पासून
मदतीचे लांबविले हात , Toranto मधून .
मधु दादा प्रतिभा वहिनीनी, स्वागत केले सह्रदया ने
यशस्वी केली ट्रीप, वेळात वेळ काढून श्रीधर ने .
ओलांडूनी कॅनडा, प्रवेशिते झालो सीमा कडे
अवनीश ने कवनाने ,स्नेहाकेदारने केक ने व मुलांनी भेटकार्ड ने
भरघोस वर्षाव केला , अभिनंदनने व स्वागताने.
भव्य दिव्य अमेरिकेचे, दर्शन करविले अवनीश ने
new york चे रस्ते व इमारती, पाहून डोळे दीपले अमुचे
चतुर्थीला घडवून दर्शन पटवर्धननांच्या , श्री गणरायाचे, .
भारतातच आहोत जणू ,भासविले सीमाने
वंदन करुनी गणेशाला , वाट चाल केली फ्लोरेडा कडे,
भरपूर आदरा तिथ्य केल , हेमंत अन रोहिणीने
सचिन अमिता ने दाविले ,वेडे वाकडे रस्ते Sacramonto चे
Golden Gate तर कधी , पुरातन कालीन भली मोठी वृक्षे Big Basin Red Wood
तिन्ही भावांनी मिळूनी, अनुभवली दिवाळीची झलक
श्रेयश सच्चीदानंदाने, जेवू घातले समूह जेवण .
कधी नेले श्रेयस ने Microsoft भूमीत (Yahoo, Google, Facebook)
तर कधी निसर्ग रम्य Lake Tahoe च्या कुशीत
श्रेयस च्या बेमालूम, driving च्या skill मधुन
श्रेयस च्या बेमालूम, driving च्या skill मधुन
मीरा वर्तक, लिमये शुभदा च्या , भेटीचा योगआला जुळुन अविनाशने दिला जुन्या आठवणींना उजळा
बंधुराजाला पाहून, उषाच्या प्रेमाला आला उमाळा.
भालुने सहर्ष स्वागताने, दाखविली कर्मभूमी
" असाच ये "पुन्हा पुन्हा, वदती झाली उषा भगिनी
गौरी ने केले हसत मुखाने स्वागत
पाहून वैभव तिचे हरखले आमचे मन
उषाने योग आणला विनय-रेखाच्या च्या भेटीचा
दिलीपने साजरा केला वाढदिवस आई व मामाचा
प रत रमलो, सीमा सदनी
गौरी ने केले हसत मुखाने स्वागत
पाहून वैभव तिचे हरखले आमचे मन
उषाने योग आणला विनय-रेखाच्या च्या भेटीचा
दिलीपने साजरा केला वाढदिवस आई व मामाचा
प रत रमलो, सीमा सदनी
भव्य दिव्य, अमेरिका पाहूनी
बसलो चौघे, मारीत गप्पा ,
काय सुंदर योग, आणलास बाप्पा ,
वैशाली वर्तक