शनिवार, ११ ऑक्टोबर, २०२५

उध्दव वृत .. ( 2). विषय 1)पहाट.(2 देव पाहते उधद+उध्दव.

मात्रा वृत्त कविता उपक्रम क्रमांक ३
१२\१०\२५
मात्रा 2-8-4=14

वृत्त उध्दव 
विषय... पहाट 

तम निशेचा पहा सरता
खग नभात उडती  सारी   
किलबिलाट भासे सुंदर 
उठ ,प्रातः झाली न्यारी

पूर्व दिशा पहा उजळली
शीत मंद वाहे वारा
सुमनांचा गंध दरवळे
शुभ भासे परिसर  सारा

घर रांगोळीने सजले
स्वर भुपाळीचे कानी
प्रातः वेळी ऐकू  येते.   
सुमधुर स्वरांची गाणी

आशा रुपी कळ्या फुलती
होता रवीचे आगमन
दूर दूर होई   मरगळ
मनाने आनंदती जन

क्षण आनंदाचे भासे
नव आशा येती ध्यानी 
रामाचा गजर अंतरी
 भजन धून येते कानी              

वैशाली वर्तक


उध्दव वृत्तात
 कविता .
   शीर्षक...देव पाहते
मात्रा.  2+8+4. व.2+8+4

मी व्रते  केली नाहीत , ना  नवस   बोलले तुजला
तू पालक असशी अमुचा, ही दृढच श्रद्धा  मजला

ना तीर्थेक्षेत्री गेले, ना कधीच केली वारी
तू   विश्व धारका असता , मी सत्कर्मे करते सारी    
तू कर्ताधरता असता , मी सत्कर्म करते सारी   

हा नित्य उगवता दिनकर. बघ  दर्शन क्षणात घडते.  
 मी वंदन तयास  करता   तव रूप मनात बघते 

 कर्मात देव जर वसतो , मी  सत्कार्यीतच. रमते.   सत्कर्मातच रमते
मन  परोपकारी  व्हावे  हा   विचार सदैव करते..


फुल उमलता गंध पसरे,सय तुझीच येते देवा

फुल  फूलता गंध पसरे   सय  तुझीच  येते देवा   
 तव   निर्मित नभी तारे ,हा तुझ्या कृपेचा ठेवा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मौन

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित  काव्य लेखन  विषय .. मौन  मौन पाळणे उत्तम  वाद होतात स्थगित पण सर्वच ठिकाणी    नसे योग्य सदोदित  जेथे निषेध...