कल्याण डोंबिवली महानगर 2
आयोजित उपक्रम
विषय... शाळेतील फळा
अक्षरे तयावर उमटतातच
कोरा काळा कुट्ट फळा
बोलतो कसा धडाधडा
दावी आगळीच कळा
असो विषय कुठलाही
ज्ञान देतो मनोभावे
पहिले लिहिलेलं पुसता
मागचे न तया ठावे
कधी विज्ञान तर गणित
घडे तासा तासात बदल
फिरता हात गुरुंचा
वैशाली वर्तक
अहमदाबाद