सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम
चित्र काव्य लेखन
*लगबग परतणीची*
नभ दाटले कृष्ण मेघांनी
तयांना बरसण्याची घाई
गडगडता ते डोंगर माथ्याशी
घरी जाण्यास अधीर बाई
दोर गाईचा एक हाती
दुजा हाती वासरांचा
घेऊन चाले भरभर
खटाटोप घरी पोहचण्याचा.
गेली होती गुरे चरायला
अचानक दाटले नभी मेघ
वारा सुटलाय जोरात
चमके नभी दामिनीची रेघ
मुखाने वदे वासराला
अनवाणी चालता भरभर
बिगी बिगी पाय उचला
येईल पावसाची सर.
आता थंड खट्याळ वारा
झोंबता अंगाला उठे शहारा
पहा आता बरसणार धारा
काळोखी आसमंत सारा
वैशाली वर्तक
अहमदाबाद