रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

वृत्तबद्ध .....भुजंग प्रयात. सख्या रे. कविता



 वृत भुजंगप्रयात 
लगावली.   लगागा लगागा लगागा लागा

        सख्या रे

कितीदा तुला सांगते मी फिरुनी
 सख्या ये तरी तू नदीच्या किनारी        

नको ते फुकाचे बहाणे  सदाची. 
मनी खेद दाटे उरी तो फिरूनी 

मनीची गुपीते कथाया तुला मी
कधी सांग येऊ नदीच्या किनारी

 कितीदा  विनंती करावी  तुला रे
  तुलाही कळावी  मनाची व्यथा रे

नको ते, तुझे रे , कधी चांदणे ही,
तुझी साथ राहो  नशीबी सदाही. 

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...