बुधवार, १८ जुलै, २०१८

सुधाकरी काव्य

सुधाकरी     6,6,6,4
वर्षाऋतु

काळी तप्त भूमी
नभाकडे पाही
बरसेल पाणी
मेघातून

आला ऋतू वर्षा
बरसती धारा
 गंध तो मातीचा
वेड लावी

हिरवी शिवार
आखीव रेखीव
दिसती सुरेख
गावोगावीं

हिरवी पिवळी
चमकती पाती
आनंदला मनीं
बळीराजा

म्हणती तयाला
ऋतू  तो हिरवा
वदती बरवा
वर्षाऋतू

वैशाली वर्तक

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...