बुधवार, ८ एप्रिल, २०२०

लीनाक्षरी मनधरणी

उपक्रम
लीनाक्षरी
विषय- सांग कधी कळणार तुला...
     **मनधरणी **

माझ्या मनीचा घे ना तू जरा ठाव
 कधी कळणार तुला माझे भाव

नको जाऊस ना सोडून मजला
कशा न कळती भावना तुजला

तुजपाशी फिरतो भ्रमरा परी
कधी बघशील तू एकदा तरी

जाण तू माझ्या मनीच्या भावना
हीच माझी मनोमनीची कामना

झाल्या जरी माझ्याच चुका अनेक
सोड ना तूची मजला क्षण एक

येना तू जवळी विसरुनी सारे
 वाट पहाती शशी संगे ते तारे      

वैशाली वर्तक

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

दीप उजळे



सिध्द लेखिका उपक्रम
*निशू* शब्दिका

  विषय-दीप उजळे

उजळा दीप ज्योती
लक्ष करांनी
शुभं करोती
*वंदू* एक सुरांनी

दीप उजळताच
भाव उमटे
सकारात्मांचा
मोद सर्वत्र दाटे

दाविला दीपातूनी
एकच भाव
प्रार्थना देवा
तूच आम्हास पाव

दीप *सदा* पसरे
ज्योत ज्ञानाची
दूर सारण्या
लाट ती अज्ञानाची

उजळे वृंदावन
शोभे दीपक
प्रकाश त्याचा
सुख शांति *प्रतीक*

दीप तुळशीपाशी
तो उजळूनी
इडापीडाच
जातील त्या पळूनी

वैशाली वर्तक

रविवार, ५ एप्रिल, २०२०

बंदिस्त चार भिंतींत

बंदिस्त चार भिंतीत
-----------------

बंदीस्त चार भिंतीत
रहाण्याची आली वेळ
वाढता मरण आंकडा ऐकून
जनता वदली हा तर मरणाचा खेळ

आपलेच नैतिक कर्तव्य
पाळावे प्रत्येकाने समजुती ने
सुखी निरोगी जीवना साठी
का आणावी वेळ बळजबरीने

बसा रहा बंदिस्त सारे
करा वाचन विवचन लिखाण
रहा परिवारा संगतीने
नको बाहेरचे ठिकाण

रहा बंदिस्त घरातूनी
जिवाणुंचा होणार नाही प्रसार
डॉक्टर हॉस्पिटल मधे
नको उगाच पेशंटचा भडिमार

टिळक आगरकर राहिले बंदिस्त
सोसूनी अपार कष्ट देशासाठी
रचिले महान ग्रंथ तयांनी
आपण राहू शकतो ना आपल्या हिता साठी

वैशाली वर्तक

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...