जाणीव
आपुलकी ,सदभाव , अस्तित्व ,करुणा,
विविध भावना असती मनाच्या.
तशीच जाणीव ही मानसिक संवेदना
पण भासते जाणिवेची उणीव ता
जाणीव असावी केलेल्या प्रेमाची,
आई वडिलांच्या प्रेमळ छत्राची,
भर भरून दिलेल्या मायेची,
पण, नुरते जाणीव पाल्यांची
जाणीव ठेवावी मातेच्या उपकारांची,
काळजाच्या तुकडा सम जपल्याची,
बोट धरून उभे केल्याची,
पण, विसर पडतो त्या जाणीवेचा .
जाणावी, जाणीव निसर्गाची ,
निसर्ग दत्त वायू जलाची ,
नैसर्गिक बदलत्या ऋतुचक्राची ,
पण, नसते जाणीव पर्यावरणची
जाणीव ठेवावी प्रभू अस्तिवाची ,
तयाने बनविलेल्या नभ-ता-यांची ,
नित नियमित उगवण्या-या रविची ,
पण , जाणीव न रहाते प्रकृति कर्माची .
जाणीव मात्र असते स्वकष्टाची ,
कयासाने कमविलेल्या धनाची ,
पराकाष्ठेने मिळविलेल्या कीर्तिची ,
पण ,सदैव वसते जाणीव स्व त्वची .
जाणीव नसते नुसती मानवात ,
तर वसते ती प्राणी मात्रात ,
उगीच का घार उडे आकाशात
पण ,चित्त असे तिचे पिल्लात
आपुलकी ,सदभाव , अस्तित्व ,करुणा,
विविध भावना असती मनाच्या.
तशीच जाणीव ही मानसिक संवेदना
पण भासते जाणिवेची उणीव ता
जाणीव असावी केलेल्या प्रेमाची,
आई वडिलांच्या प्रेमळ छत्राची,
भर भरून दिलेल्या मायेची,
पण, नुरते जाणीव पाल्यांची
जाणीव ठेवावी मातेच्या उपकारांची,
काळजाच्या तुकडा सम जपल्याची,
बोट धरून उभे केल्याची,
पण, विसर पडतो त्या जाणीवेचा .
जाणावी, जाणीव निसर्गाची ,
निसर्ग दत्त वायू जलाची ,
नैसर्गिक बदलत्या ऋतुचक्राची ,
पण, नसते जाणीव पर्यावरणची
जाणीव ठेवावी प्रभू अस्तिवाची ,
तयाने बनविलेल्या नभ-ता-यांची ,
नित नियमित उगवण्या-या रविची ,
पण , जाणीव न रहाते प्रकृति कर्माची .
जाणीव मात्र असते स्वकष्टाची ,
कयासाने कमविलेल्या धनाची ,
पराकाष्ठेने मिळविलेल्या कीर्तिची ,
पण ,सदैव वसते जाणीव स्व त्वची .
जाणीव नसते नुसती मानवात ,
तर वसते ती प्राणी मात्रात ,
उगीच का घार उडे आकाशात
पण ,चित्त असे तिचे पिल्लात