मंगळवार, २१ मे, २०२४

चित्र काव्य. मी तर चालले


सिद्ध साहित्यिक समूह 
आयोजित उपक्रम 
पारंपारिक काव्य प्रकार 
चित्रावर आधारित कविता 

  *मी तर चालले*

सोनसळी किरणात
स्वार झाली नील परी
प्रफुल्लित उल्हासित 
मोद भरलाय उरी

पहा उत्साह दांडगा 
हास्य विलसते मुखी.
 मागे कुंतलांचा भार
भासे तीच जगी सुखी

पाय चालवी भराभर
कसली तिजला घाई
 मनी कोणा भेटण्याची 
उत्कंठा दाटलीय बाई 

वाट जाते शेतातून 
दोन्ही बाजूही हिरव्या
मंद वारा झुलवी पाती
किती भासती बरव्या

किती  रम्य  परिसर 
पण तीज नाही भान
मन मौजी होऊनिया
आहे स्वतःत रममाण 

मन झालेय उडू उडू
आली सहजच तान
दंगलेल्या चित्ती तिच्या 
ओठी स्फुरलय गान

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, १९ मे, २०२४

प्रणु शब्दाविष्कार ओढ पावसाची

 *स्पर्धेसाठी*

स्वप्न गंध साहित्य समूह 

आयोजित 

प्रणु शब्दाविष्कार

प्ब्विष्कार काव्य स्प

विषय ..ओढ पावसाची 

 शीर्षक..बरसा. रे मेघांनो


नको  हा उन्हाळा 

वाट पहाती लोचने

कधी येईल  हो पावसाळा.


धरा भेगाळली

वाट पहाते मृगाची

पहा पाण्यासाठी आसुसली.


मेघ पाहूनीया

वाट पाही बळीराजा

डोळे नभाकडे लावूनीया.


बरसावे पाणी

विनविते  वसुंधरा 

जणु भुकेजल्या पोरा-वाणी.


चारा वाळलेला

ठेविले पक्षांना पाणी

उन्हाने जीव कासावलेला.


ओढ पावसाची

आता बरसा मेघांनो. 

तृप्त करण्या जन मनाची. 


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...