शनिवार, ४ एप्रिल, २०२६

पंख मिळाले शब्दांना

 काव्य निनाद राष्ट्रीय साहित्य मंच पुणे 
आयोजित उपक्रम क्रमांक 782
विषय ..पंख मिळाले शब्दांना 
शीर्षक..  मिळते उभारी लेखणीला 

 मनी  पिंगा घाली शब्द 
 मन गुंगे विचारात 
 माळ मनी विचारांची 
 साकारली लेखनात

 शब्द शब्दास जोडून 
 वाक्ये  अनेक गुंफली
कधी काव्यात गद्यात
शब्दे साहित्यी झरली. 

मन धावे सैरा वैरा
 मिळे गती विचारांना
अंतरात येता लाटा
पंख  फुटती शब्दांना

   खेळ चालतो शब्दांचा
  शब्द येतात धावून 
   यमकी अलंकारिक 
  उचित जागा पाहून 

पंख फुटता शब्दांना
 वेळ काळ प्रसंगात
सदा रमे सारस्वत 
शब्दांच्याची गाभाऱ्यात 


वैशाली वर्तक
 अहमदाबाद

बुधवार, १ एप्रिल, २०२६

वृत्तबध्द. वृत्त मालिनी

फक्त वृत्तबद्ध 
मालिनी वृत्त 

अक्षरे 15.  8अक्षरावर यती
 लललललल गागा. गालगागाल गागा

नमनकरित आली    कांक्षिणी  मंडपाशी
हळुहळु पद टाके ,   मोदवाटे उराशी                       

दिवस गणित होती ,आजच्या या क्षणाची
चपळपण मनाची, लाज वाटे जनांची

उपरति तिज ठायी, दाखवेना  कुणाला
 पण मन अविरामी,  गुंतले त्या  क्षणाला .
             
क्षणभर तिज आता,   कंठ दाटून आला.    
जिवलग जिव सारे, आठवे ती सुखाला

घडि घडि मन आता, राहवेना क्षणाने
सजल नयन ओले, आसवाने मनाने


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

उखडलेली मुळे

काय पण योगायोग पहा आजच हा विषय दिला आणि.. आजच माझ्या दातांची  implant treatment सुरू झाली. आधी माप घेणे झाले. आणि मग आजच्याच दिवशीत treatm...