शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

काव्य बत्तीशी.. आयुष्यात प्रत्येक क्षण./ कठीण समय येता\सहज गुंफले काव्यात

मोहरली लेखणी साहित्य समूह
आयोजित उपक्रम
विषय.... आयुष्यात प्रत्येक क्षण 
9/7/9/7

जन्म  मृत्यूतील अंतर. 
असे आयुष्य काळ.      
उपभोगा प्रत्येक क्षण
येता नवी सकाळ.  

मानव जन्म हा लाभला.  
जगुया आनंदाने
करूया सोने आयुष्याचे
दिले आयु देवाने

निशेत दडली पहाट.  
दु:खा नंतर सुख
नसे तिमीर सदाकाळ 
रहा हसत मुख


गाणे देई मना आनंद
भरू स्वर मनात
होता संगीतमय जीव
व्यथा दूर क्षणात

आयुष्यात प्रत्येक क्षण
असे आगळा नवा 
नका बाळगू खंत मनी
उत्साह मात्र हवा

वैशाली वर्तक
अहमदाबाद


मोहरली लेखणी साहित्य समूह
आयोजित उपक्रम
विषय.. कठीण वेळ येता

 9/7/9/7

कठीण समय येताची
कोणी नसे जवळ
खरेची असते कथन
उचित  ते केवळ

 तोची असतो करविता.  
  करा धावा देवाचा
दुर करण्या अशावेळी 
 तोची असे कामाचा

  खरा मित्र  कळे तेव्हाची
  येता कठीण वेळ
उभा राही  तरी पाठीशी 
     करी  मैत्रीचा मेळ       

 संकट समयी रहावे
  द्यावी  मित्रास साथ
आनंदात सारेची 
देतातच  हातात हात

वैशाली वर्तक

अहमदाबाद

सहज गुंतले काव्यात 



शब्द आले अधरी
सहज गुंफले काव्यात
साकारली कविता
वाढ नव्याने साहित्यात

छंदची जडलाय 
रमणे सदैव शब्दात 
नकळत रचते
 कविता विविध रसात

 गुंफितेय शब्दांची
माळ मी नित्य नियमित 
आहे काव्य बत्तीशी
प्रकार झाला प्रचलित 

आवडला मजला 
 अश्विनी आहे रचियता
प्रचलित करुया
झालाय की नामांकित

वैशाली वर्तक 


मोहरली लेखणी साहित्य मंच 
काव्य बत्तीशी प्रकार 
विषय..सामर्थ्य 
७\९\७\९

यशासाठी दाखवा 
स्वतःचे  सामर्थ्य जीवनी
 सारूनिया आळस
 राखा धाडसी वृत्ती मनी
 
 मन दृढनिश्चयी, 
 एकाग्रता हवी कामात 
सामर्थ्य दाखवेल 
 यशफळ देते हातात 

उगाच का म्हणती 
सामर्थ्य हे चळवळीचे 
यत्न करीता जना
    फळ मिळे यशप्राप्तीचे

कवींच्या लेखणीत
बळ असते सामर्थ्याचे
 मना मिळे चैतन्य 
  सदैव उज्वल यशाचे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, १२ जानेवारी, २०२३

चित्र कविता

सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित
उपक्रम क्रमांक 485
विषय ....चित्र काव्य

दोन गोड छकुल्यांना
सोडण्या शाळेला वेळेवर
पहा हसतमुखाने पिता
स्वार झाला सायकलवर.

शाळेचा गणवेष टापटीप
केली वेणी फणी आईने 
मागे वळूनी निरोप देता
घेतले दप्तर पाठीला ताईंने.

लेकी शिकूनी सवरुनी
तयार व्हाव्यात  साक्षर
मनी दृढ आशा आईची
शोभतील उच्च पदावर

 साधी राहणी  कुटुंबाची
 उच्च भावना विचारात
 सुसंस्कृत करूनी मुलींना
 भरारी घेण्या जीवनात .

हिरवळ आहे दाटलेली
केळीचे लांब लांब पान
झुकलेली डोक्यावर
पडवीत शोभती छान.

सुखी समाधानी भाव
दिसताती मुखावरी
होवो स्वप्न पूर्ती त्यांची
हेच शब्द येती अधरी.

वैशाली वर्तक
अहमदाबाद

बुधवार, ११ जानेवारी, २०२३

वेड


अ भा  म सा परिषद समूह 2
आयोजित
उपक्रम क्रमांक 598
11/1/23
विषय..वेड


वेड ही अशी प्रक्रिया
आवडे पुन्हा करण्याला 
कधीही  न येई  कंटाळा 
तेची असे *वेड* मनाला 

मीरेला वेड कृष्णाचे
 हरी नामात  मन दंग
 हरपूनी भूक तहान. 
 ध्यानी मनी  सदा श्रीरंग.

 कोणा वेड गायनाचे
 लागतो जीवाला छंद
 मन राही गायनी दंग
 त्याच वेडात मिळे आनंद.

  विठू भक्तीचे वेड तुकोबांना
  आनंदें  लीन भजनात
  जय हरी विठ्ठल नाम
  असे मन मंदिरात 


वेड हे हवेच जीवनात 
तेच देई आनंद मनाला
मन रिझविता विरंगुळा
मिळतो हर क्षणाला

  

वैशाली वर्तक
अहमदाबाद

मंगळवार, १० जानेवारी, २०२३

कवितेच्या कवित !माझे मलाच कळेना!.बेधुंद मी कवितेत/माझी कविताकविता सुंदर

विषय - *माझे मलाच कळेना*

दिसता समोर दैनंदिनी
आले विचार  मनात
केले वंदन शारदेस
झरले शब्द  क्षणात

मनीचे शब्द झरता
ओवत गेले शब्दांना
पहाता जाहली कविता
रिक्त करता विचारांना

*माझे मलाच कळेना*
कशी प्रसवली कविता
वाचून पहाता तिजला
भावली जना, मम  रचिता

 
देता विचारांना चालना
नियमित स्फूरते लेखणी
छंदची जडला जिवाला
मम लेखणी , पहा देखणी

झाला लेखनाचा सराव
येती मनात विचार 
*माझे मलाच कळेना*
कशी झाले शब्दकार

वैशाली वर्तक
अहमदाबाद


2     बेधुंद मी माझ्या कवितेत


 सहजची विचार  येता मनी
घेऊनी लेखणी रचते कविता 
 काळ वेळेचा  पडे विसर
 देता प्राधान्य ,वाहे विचार सरिता 


बेधुंद होते लेखनात
करण्या साकार ते काव्य
शब्द साथ मिळता अंतरातून
होते कविता सुश्राव्य

देता शब्द समूहात
लेखनास चढे नित्य साज
मन धावे समूहाकडे
कशावर बरे लिहावे आज

पहाता शब्द लेखनाचा
होत जाते मन बेधुंद
मिळतो निर्भेळ आनंद
लागला मज कवितेचा छंद

वैशाली वर्तक
अहमदाबाद


====================&&&&


सावली प्रकाशन समूह आयोजित
उपक्रम काव्य रचना
    विषय - माझी कविता
========================
शीर्षक --**माझी आभिलाषा**

माझी कविता असे साधी
नसे तयात राजकारण
दावते कधी निसर्गाचे रुप
 सुंदर कसे ठेवावे पर्यावरण

  कवितेत माझ्या भाव सकारात्मक
 असली तमेची कधी निशा
लगेच दाखवी उदाहरण
 पहा उज्वल आशेची उषा

मन धाव घेई अध्यात्माकडे
दर्शन घडवी संतजनांचे
कधी रंगवी बालमने तर
रंगविते सुंदर चित्र फुलांचे

देते कविता संदेश जनमनाला
सलाम सदाची जवानांना
सांगते आत्म निर्भय बनण्या
कौतुकाची थाप देश सेवकांना


सदा बहरावी माझी कविता
करण्या सेवा माय मराठीची
पसरण्या ख्याती जगताती
हीच सदैव इच्छा वैशालीची

वैशाली वर्तक


अखिल भारतीय मराठी साहित्य  परिषद मुंंबई प्रदेश वनवी मुंबई जिल्हा
आयोजित 
उपक्रम क्र ७२८
काव्य लेखन

विषय - कविता सुंदरी

 आहेसच ग खरच
तू   कविता सुंदरी
किती  नटविती तुज
अलंकारे खरोखरी

कवी मनी गर्दी जमे
अर्पण्या तुज शब्दालंकार
मन धावे शोधण्या सदैव
 नवनवीन  कल्पना अविष्कार

कधी लाडिक लडिवाळे
तर कधी प्रबोधक वचने
देऊन साज मौलिक
सजवूनी तूजकरवी  कथने

 बसतेस कधी कधी  का ?
रुसूनी अल्लड होऊनी
साथ न देता यमकाची
गंमत पहाते अडूनी

होता साकार तू सुंदरी
लाभे मना समाधान
सादरी करणास तू तयार
शारदेचे लाभो  वरदान

वैशाली वर्तक


अ भारतीय मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्हा 2
आयोजित उपक्रम ४७२
२१/३/२३
विषय... कविता प्रतिबिंब भावनांचे
        गुपित मनीचे 
गुज मनीचे सांगते
भाव कळण्या गरज
*प्रतिबिंब भावनांचे*
दावी जनांना सहज.

लेखणीच्या सहाय्याने
समजते कवी मन
कधी हास्य कधी मोद 
वाचता होती आनंदी जन

देते उत्तेजना प्रेरणा 
चैतन्य  बळ मानसिक
न होण्या निराश कदापी
बदल घडवे सामाजिक

कधी दावीते रम्य निसर्ग
वाहून शब्द रुपी झरा
डौलणारी फुले शेते 
निसर्गाचा आनंद खरा


सोनसळी किरणांची
होता रोज सकाळ
चित्र रवीचे नभीचे
दावी शब्दभाव शुभ काळ

मन रमता भक्ती भावात 
ठेवा दृढ विश्वास देवावर
तोची कर्ता करविता
सांगे तोची आहे विश्वंभर.


वैशाली वर्तक
अहमदाबाद

*भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी अंतर्गत ठाणे जिल्हा*स्पर्धेसाठी

*दिनांक -२२ ते २६ ऑगस्ट २०२२*
*वेळ- सकाळी १० ते रात्री १०

*विषय:कवीची अबोल वेदना*
   
    भाव मनीचे दावितो
    कवी सहजची लेखनात
    कधी भक्ती ,कधी प्रेमळ
    उमललेले  जे अंतरात

  बनूनी आरसा समाजाचा
  दावी दोष गुण जणु दर्पण
  राखता न अपेक्षा सहमताची
  कवी करी मार्गदर्शन 

 करी लेखणीने काम कवी
 दुर्लक्षिता मनीच्या अबोल  वेदना
घडविणे सात्विक  समाज
ह्याच सदा मनी भावना

 दावी पडखर विचार 
जसा येता प्रसंग वेळ
करूनी कठोर लेखणीस
विचारांचा जमवी मेळ


वैशाली वर्तक 
अहमदाबाद


अक्षरांच्या बाजारात

अक्षरांच्या बाजारात
मारला फेर फटका सहज
किती  त-हा अक्षरांच्या
वाटले ,मला आहे यांची गरज

काही अक्षरे रोजचीच
निवडली मी आवडीने
पाहून त्यांना आली दुसरी
मनी म्हटले, घेऊ त्यांना सवडीने

असे करिता मनी साठली
गर्दी  अनेक अक्षरांनी
उचंबळलेल्या भावनांना
वाट करुन दिली शब्दांनी

एक -एक शब्दफुले गुंफता
झाली कवितेची तयारी
मन माझे आनंदून म्हणाले
 बरे झाले,आली अक्षर बाजारी


वैशाली वर्तक

मी व माझी कविता 

मी आणि माझी कविता
छंद मजला  कवितेचा
तोचि विरंगुळा मनाचा
     काही विचार  येता मनी
      त्वरित झरे माझी लेखणी
विषय असो कुठलाही
काय लिहू  हा प्रश्न नाही
       गळून पडणारे पान पाहून
       सहज सूचते काव्य मनातून
फुले  पाहताच क्षणात
येतात विचार ते मनात
        रांगेत तारेवर पक्षांचे बसणे
        सहज शब्दांचे मनात तरंग उठणे
माझी  अन कवितेची गट्टी
होणार नाही कधी तिच्याशी कट्टी
.





मी कविता


अ भा म सा प समूह 2
आयोजित 
उपक्रम  काव्य लेखन
विषय - मी कविता

आहे मी मनीचे गुज
 दावीते  मम रूप
लेखणीच्या साहाय्याने      
 भावते जनाना खूप 

शब्द झरता काव्यातून
समजते कवी मन
कधी हास्य  कधी मोद
आनंदीत होती जन

 उत्तेजन  प्रेरणा देते मनास
वाढे चैतन्य  बळ मानसिक
कदापि  न  होण्या  निराश 
बदल घडविते  सामाजिक
 

कधी दाविते रम्य निसर्ग 
वाहून  शब्द रुपे झरा
डौलणारी रान फुले
निसर्गाचा  आनंद खरा

रमते कधी भक्ती भावात
ठेवा दृढ विश्वास देवावर
तोची कर्ता करविता
सांगते , तोची  आहे विश्वंभर

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, ९ जानेवारी, २०२३

वेळ अमुल्य वेळ

कल्याण डोंबिवली महानगर २
आयोजित
उपक्रम
९/१/२३

विषय -- वेळ

बालपणी आपल्याला 
दिली जाते शिकवण 
कधी न होऊ द्यावीत  
वेळे बाबतीत बोळवण

वेळ ही अशी असते
जाता  एकदा हातूनी
पुन्हा  परत येत नाही
ती कधीच  परतूनी 

  कार्य  करावे योग्य वेळेस
 याचा ,सदाची घ्यावा ठाव
 म्हणूनच म्हण वदती
 गरम असताच घाला धाव

  दिन कालचा जो गेला
  समजण्या व्हावे सहमत
  हवी  समजण्या हिंमत
 नाही येणार ती वेळ 
 उमजा तिची किंमत

वेळ सरतो हातातूनी
असो मग रंक वा राजा
थांबत नसे कोणासाठी
किती करा गाजावाजा 

वैशाली वर्तक




कल्याण डोंबिवली महानगर 2
उपक्रमासाठी
विषय - वेळ

        अमुल्य वेळ
कधी होते सकाळ
कसा कुठे जातो वेळ
कळतच नाही पहा
 कसा जमवू  कामाचा मेळ

पानेफुले पाहता बागेत
देव पूजन संपता वाचन
पहावे तर होते दुपार
कधी करावे. ते लिखाण

वेळ  नसतो मिळत
मिळवा तो आवडीनुसार
करा सदुउपयोग वेळेचा
हेच आहे जीवनाचे सार

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

पक्ष्यांची भरली शाळा


पक्ष्यांची भरली शाळा


होता झुंजुमुंज पहा
सुरु होतो किलबिलाट 
कोण सांगते तयांना
उठा झालीय  पहाट

होते बसले अंगणी
 लक्ष गेले झाडाकडे
चिवचिवाट करती पक्षी 
कोणाचे ऐकावे गडे

चिवचिव चिमण्यांची
चालू होती अविरत
त्यात पोपट मैनाची
साद आली दबकत

कावळा ओरडे कर्कश्श
गेला उडून क्षणात
म्हणने त्यांचे कोणी ऐकेना
राग आला त्याच्या मनात


करत होते किलबिलाट
रंगी बेरंगी लहान पक्षी
मधेच उडून जाती तेव्हा
नभात दिसे छान नक्षी

पक्ष्यांना एकच होता प्रश्न
थांबव ना. मानवा वृक्ष तोड
 पक्ष्यांनी  कुठे रहावे ?
करा काही तडजोड

वैशाली वर्तक
अहमदाबाद

रविवार, ८ जानेवारी, २०२३

म्हणीवरुन. सोनाराने टोचले कान

कल्याण डोंबिवली महानगर २
उपक्रम
विषय ...सोनाराने टोचले कान

कितीदा सांगावे समजवून
ऐकणे  जणू माहीत नाही 
गोडी गुलाबीने सांगितले
आता तरी ऐकतील काही


कधी येईल समज तयांना
दमदाटी पण  झाली देऊन 
उदाहरण देखिल दाखविले 
परिणाम पण झाले सांगून

जाणे योग्य सोनाराकडे
तोची असे मार्गदर्शक
अशा वेळी एकच उपाय  
 खरा तोची  प्रबोधक

ज्याचे काम तोची जाणे
 वदती   म्हणूनी    जन
 सोनारानेच टोचावे कान
 हेची सांगे मनोमन

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...